Leading International Marathi News Daily

सोमवार , ६ एप्रिल २००९

क्रीडा

कसोटीत आम्हीच बाजी मारू -गंभीर
वेलिंग्टन, ५ एप्रिल, वृत्तसंस्था

सहाशेपेक्षा अधिक धावांचे उद्दिष्ट असेल तर ही कसोटी न्यूझीलंड जिंकण्याची सुतराम शक्यता नाही. एवढे मोठे उद्दिष्ट असेल तर न्यूझीलंडला ही कसोटी जिंकण्यासाठी नव्हे तर वाचविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सहाशे धावांपेक्षा अधिक उद्दिष्ट न्यूझीलंडपुढे ठेवले जाणार असल्याने या कसोटीत आम्ही बाजी मारू, असा विश्वास भारताचा सलामीवीर गौतम गंभीर याने आज व्यक्त केला. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गंभीर म्हणाला की, सहाशेपेक्षा अधिक धावांचे उद्दिष्ट असेल तर ही कसोटी न्यूझीलंड जिंकण्याची सुतराम शक्यता नाही. एवढे मोठे उद्दिष्ट असेल तर न्यूझीलंडला ही कसोटी जिंकण्यासाठी नव्हे तर वाचविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

दी ग्रेट गंभीर शो!
भारताकडे ५३१ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी
गंभीरने साकारले मालिकेतील सलग दुसरे शतक
राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मणची अर्धशतके

वेलिंग्टन, ५ एप्रिल / पीटीआय

गौतम गंभीरने सकाळपासूनच आक्रमक पवित्रा स्वीकारत टीम साऊदीला स्ट्रेट ड्राइव्हची नजाकत पेश केली. त्यानंतर साऊदीलाच आणखी एक चौकार मारल्यावर ख्रिस मार्टिनला स्क्वेअर ड्राइव्ह, ओ’ब्रायनला कव्हर ड्राइव्ह मारून गंभीरने चौफेर वर्चस्व प्रस्थापित केले.

व्हिक्टोरिया बनली
टेनिसची नवी सम्राज्ञी
मयामी टेनिस स्पर्धा

मयामी, ५ एप्रिल/ पीटीआय

बेलारूसची युवा खेळाडू विक्टोरिया अझारेन्का ही टेनिसची नवी सम्राज्ञी म्हणून अवघ्या टेनिस विश्वासमोर उदयास आली आहे. तिने मयामी मास्टर्स खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सला नमवून कारकिर्दीतले पहिले जेतेपद पटकाविले आहे. हार्ड कोर्टवर झालेल्या अंतिम फेरीत तिने सेरेनाला ६-३, ६-१ अशी धूळ चारत टेनिस विश्वाला एक जबरदस्त धक्का दिला आहे. या पराभवाने सेरेनाची जेतेपदाची हॅट्ट्रिक मात्र हुकली आहे.

परतफेड!
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर सात विकेट राखून दणदणीत विजय
स्टेन-पार्नेलकडून कांगारूंचा १३१ धावांत खुर्दा ऑस्ट्रेलियाची दुसरी निचांकी धावसंख्या

सेंच्युरियन, ५ एप्रिल/ वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिकेने आज येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सात विकेट राखून पराभव करीत पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. डेल स्टेन आणि वेन पार्नेल यांच्या वेगवान माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा डाव ४० षटकांत अवघ्या १३१ धावांत कोसळला. विजयासाठी आवश्यक असलेल्या १३२ धावा दक्षिण आफ्रिकेने २६.२ षटकांत तीन विकेटस्च्या मोबदल्यात करून अपेक्षेप्रमाणे सहज विजयाची नोंद केली. आठ षटकांत अवघ्या २५ धावांच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाचे चार बळी घेणाऱ्या वेन पार्नेल याला सामन्याचा मानकरी म्हणून निवडण्यात आले.

अ‍ॅन्डी फ्लॉवर यांना कायमस्वरूपी प्रशिक्षक नेमावे!
लंडन, ५ एप्रिल/पीटीआय
इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार अ‍ॅण्ड्रय़ू स्ट्रॉस व अष्टपैलू खेळाडू अ‍ॅण्ड्रय़ू फ्लिंन्टॉफ यांनी संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे अ‍ॅण्डी फ्लॉवर यांच्याकडे कायमस्वरूपी सोपवावी, असा आग्रह धरला आहे. कर्णधार केव्हिन पीटरसनशी मतभेद झाल्यानंतर इंग्लंडचे प्रशिक्षक पीटर मूर्स यांना पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर फ्लॉवर यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरही वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका इंग्लंडने १-० ने गमावली होती.

सायना जियांगशी करणार दोन हात
अशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आजपासून

नवी दिल्ली, ५ एप्रिल/ वृत्तसंस्था
भारताची अव्वल मानांकित महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल उद्यापासून कोरियामध्ये सुरू होणाऱ्या अशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यामध्ये चीनच्या जियांग यानजियाओशी दोन हात करणार आहे. सातव्या मानांकित सायनाकडून इंडियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून फार मोठय़ा अपेक्षा होत्या. पण या स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत तिला जुलिया पेई जियानने पराभूत केले होते.

उम्मीद पे ‘मोल्स’ कायम है!
वेलिंगटन, ५ एप्रिल/ वृत्तसंस्था

न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीमध्ये ५३१ धावांची आघाडी घेऊन कर्णधार महेंदसिंग धोनीचा भारतीय संघ ४१ वर्षांनंतर इतिहास रचण्याच्या उंबरठय़ावर असला तरी यजमान देशाचे प्रशिक्षक अ‍ॅन्डी मोल्स यांना सामना अनिर्णित राहण्याची आशा वाटते आहे. संघातील खेळाडूंची मला माहिती असून हा सामना न्यूझीलंड अनिर्णित राखेल यावर माझा विश्वास आहे, असे मोल्स यांनी आज सामन्याच्या तिसऱ्या दिवसानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

इजिप्त-भारत सामना अनिर्णीत
सुलतान अझलन शाह हॉकी
इपोह (मलेशिया), ५ एप्रिल/ पीटीआय
सुरुवातीला १-० असे पिछाडीवर असताना नंतर २-१ ने आघाडी घेतल्यानंतरही प्रतिस्पर्धी इजिप्तच्या हॉकीपटूंनी जिगरबाज खेळ केल्याने सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेतील भारताविरुद्धचा पहिला सामना अनिर्णित अवस्थेत संपला.