Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
व्यापार-उद्योग

न्यूमरिक पॉवर सिस्टीम्सचे तामिळनाडूत लवकरच सौर ऊर्जा फार्म
व्यापार प्रतिनिधी:
अखंडित वीज पुरवठय़ासाठी ‘यूपीएस’ उत्पादनांची विस्तृत श्रेणी प्रस्तुत करणारी देशातील आघाडीची कंपनी न्यूमरिक पॉवर सिस्टीम्स लिमिटेडने तामिळनाडूत कोईम्बतूर जिल्ह्याात साधारण २५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून एक मेगाव्ॉट क्षमतेचा सौर ऊर्जा फार्म विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सौर तसेच पवन ऊर्जा निर्मिती उपकरणे आणि एलईडी लाइटिंग प्रणालीच्या क्षेत्रात प्रवेशाचा निर्णय घोषित केला आहे. या आपल्या नव्या उपक्रमासाठी न्यूमरिकने अलीकडेच १०० टक्के मालकी असलेली उपकंपनी ‘न्यूमरिक सोलर एनर्जी प्रा. लि.’ या नावाने स्थापित केली आहे. या कंपनीतर्फे लघू व मध्यम आस्थापनांना त्यांच्या उद्य्ोग-व्यवसायाच्या गरजेपुरती (कॅप्टिव्ह यूसेज) सौर ऊर्जेची उत्पादने आणि सौर-प्रणालीची अंमलबजावणी या कंपनीतर्फे करण्यात येईल.

‘डेल’तर्फे भारतात ग्लोबल स्मॉल बिझनेस एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड्स
व्यापार प्रतिनिधी:
डेलने आज आपल्या स्मॉल बिझनेस एक्सेलेन्स अ‍ॅवॉर्डस्च्या भारतातील सुरुवातीची घोषणा केली आणि आपल्या २००९ डेल स्मॉल बिझनेस एक्सेलेन्स अ‍ॅवॉर्डस्साठी प्रवेशिका मागवलेल्या आहेत. या पुरस्काराचे युनायटेड स्टेटस्मध्ये हे सहावे आणि जागतिक स्तरावर दुसरे वर्ष आहे. ग्राहकांना अधिक चांगली सेवा प्रदान करण्यासाठी तंत्रज्ञानाचा अभिनव पद्धतीने वापर करणाऱ्या लघु उद्यमांना हा पुरस्कार डेल सोल्युशन्समध्ये यूएस डॉलर ५०,०००जिंकण्याची आणि डेलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मायकेल डेल यांना भेटण्याची संधी देतो.

व्यापार संक्षिप्त
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ राज्यात आणखी १५०० केंद्रे सुरू करणार

व्यापार प्रतिनिधी: ‘एमएससीआयटी’च्या माध्यमातून संगणक साक्षर होण्याची संधी विद्यार्थी, गृहिणी व नोकरदारांना मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने (एमकेसीएल)ने संपूर्ण राज्यभर आणखी १५०० सॅटेलाइट प्रशिक्षण केंद्रे नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ष २००८ मध्ये एमकेसीएलची मान्यताप्राप्त एकूण ३६०० केंद्रे राज्यात कार्यरत होती, तर नव्या केंद्रांची भर पडून वर्ष २००९ अखेपर्यंत एकूण केंद्रांची संख्या ५,००० जाणे अपेक्षित आहे. १०वी -१२वीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत या प्रशिक्षण केंद्रांचा ‘एमएससीआयटी’ उत्तीर्ण होण्यासाठी वापर करता येईल. हे प्रशिक्षण सध्या इंग्रजी, हिंदी व मराठी अशा तीनही भाषांमधून दिले जाते.

डेट्रॉइटच्या ढाके इंडस्ट्रीजचे भारतीय बाजारपेठेवर लक्ष
व्यापार प्रतिनिधी:
पेंट आणि कोटिंग क्षेत्रातील अग्रेसर बहुराष्ट्रीय कंपनी ढाके इंडस्ट्रीजने भारतीय बाजारपेठेत दमदारपणे प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत डेट्रॉइट येथे मुख्यालय असलेल्या ढाके इंडस्ट्रीज ही जनरल मोटर्स, फोर्ड, टोयोटा आणि अन्य बडय़ा वाहन निर्मात्यांसाठी पेंट व कोटिंग्ज नियमित पुरवठादार असून, अमेरिकेत या क्षेत्रातील तंत्रज्ञानात्मक नाविन्यता अत्युच्च मानदंड तिने प्रस्थापित केला आहे. अमेरिकेनंतर ब्राझील, व्हिएतनाम, चीन, मलेशिया आणि अन्य दक्षिण आफ्रिकी देशांमध्ये ढाके इंडस्ट्रीजने प्रवेश केला असून, आता आपला होरा भारताकडे वळविला आहे. भारत पदार्पणाची तीन मुख्य कारणे असल्याचे कंपनीचे सीईओ बी. जी. ढाके यांनी सांगितले. एक तर अमेरिका व युरोपात वाहन उद्योगांची मागणी प्रचंड रोडावली आहे, तर दुसऱ्या बाजूला भारतात रस्ते व दळणवळणाच्या पायाभूत सुविधांच्या विस्ताराबरोबर वाहने व दुचाकींची मागणी विलक्षण वाढत आहे. शिवाय या महत्वाच्या व जिव्हाळ्याच्या बाजारपेठेत आपले अस्तित्व निर्माण करण्याचे मूळ भारतीय असलेल्या कौटुंबिक व्यवसायाचे कैक वर्षांपासूनचे स्वप्नही होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

आल्स्टॉम आणि डाऊ यांच्यात सामंजस्याचा करार
व्यापार प्रतिनिधी:
अमेरिकेमधील पश्चिम व्हर्जिनियातील दक्षिण कार्लस्टनमध्ये असलेल्या डाऊच्या मालकीच्या उत्पादनकेंद्रात कोळशावर आधारित बॉयलरमधून निघणाऱ्या फ्लू गॅसमधील कार्बनडायऑक्साईड (सीओ २) वर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे डिझाइन आणि बांधकाम करत असल्याची वीजनिर्मितीत जगभरात आघाडीवर असलेले आल्स्टॉम आणि जागतिक वायूप्रक्रिया उद्योगात आघाडीवर असलेली दि डाऊ केमिकल कंपनी यांनी घोषणा केली. आल्स्टॉमच्या वतीने या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे डिझाईन, बांधकाम आणि काम केले जाणार असून आल्स्टॉम आणि डाऊचे अत्याधुनिक अ‍ॅमाईन तंत्रज्ञान वापरून फ्लू गॅसपासून बाहेर पडणाऱ्या १८०० टन सीओ२वर दरवर्षी नियंत्रण मिळविणे शक्य होईल, अशी अपेक्षा आहे. डाऊच्या वतीने या प्रकल्पाकरता साईट तसेच सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील त्याचबरोबर रसायने आणि अ‍ॅमाईन तंत्रज्ञानही पुरवले जाईल. २००९ च्या तिसऱ्या तिमाहीपासून हा महत्त्वपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे.

मायक्रोटेक्नॉलॉजीजचा दक्षिण आफ्रिकेत व्यावसायिक विस्तार
व्यापार प्रतिनिधी:
मायक्रोटेक्नॉलॉजीज इंडियाने दक्षिण आफ्रिकेत टीडब्ल्यूआय इंटरनॅशनल पीटीवाय लिमिटेड या कंपनीसह ६० लाख अमेरिकन डॉलरचे व्यापारी सामंजस्य करून तेथे आपला व्यवसाय फैलावण्याच्या निर्णयाची घोषणा केली आहे. मायक्रो फँटम या वाहन सुरक्षा प्रणालीच्या यशस्वितेनंतर, ‘ट्रेनिंग विदिन इंडस्ट्री इंटरनॅशनल (टीडब्ल्यूआय)’ या कंपनीने मायक्रो टेक्नॉलॉजीजबरोबर सुरू असलेल्या आपल्या व्यवसायाच्या कक्षा रूंदावून मायक्रो टेक्नॉलॉजीजच्या अन्य सुरक्षा प्रणालीही दक्षिण आफ्रिकी बाजारपेठेत वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण आफ्रिकेत वितरीत केल्या जाणाऱ्या अन्य उत्पादनांमध्ये मायक्रो लॉस्ट मोबाइल ट्रॅकिंग सिस्टीम्स, मायक्रो मोबाइल कंट्रोलर सिस्टीम, मायक्रो बडी ट्रॅकिंग सिस्टीम, मायक्रो अ‍ॅक्सेस कंट्रोलर सिस्टीम, मायक्रो लॉस्ट नोटबूक ट्रॅकिंग सिस्टीम, मायक्रो बाइक सिक्युरिटी सिस्टीम और मायक्रो एनर्जी ब्लॅक बॉक्स आदींचा समावेश आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या गरजांनुसार मायक्रो टेक्नॉलॉजीज या उत्पादनांमध्ये वेळोवेळी अद्य्यावत बदल करीत राहील. मायक्रो टेक्नॉलॉजीजद्वारे या उत्पादनांशी संलग्न आवश्यक प्रशिक्षण आणि तांत्रिक पाठबळ टीडब्ल्यूआयला दिले जाईल; तर या उत्पादनांच्या दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेतील वितरणासह, त्यांच्या जाहिराती आणि प्रोत्साहनात्मक उपक्रम त्याचप्रमाणे विक्रीपश्चात सेवेची जबाबदारी टीडब्ल्यूआयद्वारे पार पाडली जाईल.

मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनीत ‘स्टँडर्ड चार्टर्ड इक्विटी’ची गुंतवणूक
व्यापार प्रतिनिधी:
स्टँडर्ड चार्टर्ड प्रायव्हेट इक्विटी कंपनीने मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीत खासगी गुंतवणूक केल्याचे जाहीर केले आहे. मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन ही अत्यंत वेगाने विकसित होत असलेली बांधकाम सेवा कंपनी आहे. निवासी व व्यापारी गाळे, औद्योगिक इमारती व खास करून बंदर बांधकाम क्षेत्रात मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीकडे विशेष प्राविण्य आहे.
मॅन इन्फ्रा कंपनीने मस्र्क व डीपी वल्र्ड यासारख्या जगद्विख्यात गोदी प्रचालक कंपन्यांसाठी या आधी प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. तसेच रहेजा, जिंदाल्स, प्राज इंडस्ट्रीज व सरकारी संस्थासाठीसुद्धा या कंपनीने अनेक प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. मॅन इन्फ्रा लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक पराग शहा म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या व्यवसायाचा विस्तार करीत असून महाराष्ट्रातील लोकॉस्ट हौसिंग प्रकल्पासह अनेक प्रकल्प कंपनीच्या हाती आहेत. तसेच कंपनीसाठी सुयोग्य ठरेल असे एखादे संपादन करण्याची सुद्धा तयारी करीत आहोत. आमच्या व्यावसायिक योजना पूर्णत्वास नेण्यासाठी स्टँडर्ड चार्टर्ड प्रायव्हेट इक्विटी धोरणात्मक दृष्टय़ा उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे.

एस. के. दास यांना पदोन्नती
व्यापार प्रतिनिधी:
बँक ऑफ बडोदाच्या महाराष्ट्र व गोवा विभागाचे उपसरव्यवस्थापक एस. के. दास यांची सरव्यवस्थापक म्हणून पदोन्नती झाली आहे. दास यांनी २१२ शाखा असलेल्या महाराष्ट्र व गोवा विभागाची सूत्रे मे २००७ मध्ये हाती घेतली. या विभागाने गतवर्षी १० हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार केला असून, या वर्षीची व्यावसायिक उलाढाल १३ हजार कोटी रुपयांवर गेली आहे.