Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९

एक ‘मॉब’ तलावांसाठी
मुंबईसारख्या महानगरात काही वर्षांपूर्वी सुमारे १५० लहान-मोठे तलाव होते, असं आज कोणालाही सांगितल्यावर आश्चर्याचा मोठा धक्काच बसेल. आज मात्र मुंबईत ४५ तलाव दिसून येतात. त्यातील काही भर टाकून बुजवले गेले आहेत, काही प्रदूषित झाले आहेत. मुंबई शहर व उपनगरांतील तळ्यांची ही समस्या लक्षात घेऊन रूपारेल महाविद्यालयाच्या पर्यावरणप्रेमी तरुण विद्यार्थ्यांनी २००६ साली ‘मॉब’ (मेंबर्स ऑफ ब्रदरहूड) ही संस्था सुरू केली. गिरीश डोके, अमित जठार, कल्पेश भोसले, गोपाळ पालव, दर्शन जाधव यांनी स्थापन केलेल्या ‘मॉब’चे प्राधान्यक्रम आहेत पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षण आज तरुण सर्व क्षेत्रांत काम करतात; वेगवेगळ्या समाजकार्यात हातभार लावतात. मग पर्यावरण क्षेत्रात त्यांचं योगदान काय, या प्रश्नाला ‘मॉब’ हे एक उत्तर आहे.तलावांच्या प्रश्नांवर काम करताना मॉबने २५ तलावांचा ‘सॅम्पल सव्‍‌र्हे’ केला.

मी भटकलो तेव्हा..
कॉलेजविश्वातल्या रम्य नगरीत
मी भटकलो तेव्हा..
जीवनातले ‘ते’ विलक्षण क्षण अनुभवताना
हिरव्यागर्द कॅम्पसमध्ये पहुडताना
कट्टय़ावरती जगभरातल्या गप्पा मारताना
मित्रांच्या सहवासात माझे अस्तित्व टिकवताना
स्वत:ची फिलॉसोफी इतरांसमोर मांडताना
कँटिनच्या गरम वडय़ांचा आस्वाद घेताना
करियरचे मैलाचे दगड साकारताना
त्या गर्दीत स्वत:चे शोध घेताना
त्या ‘ड्रीम गर्लची’
वाट पाहताना
ते अनुभव काव्यामध्ये रूपांतर करताना

तरुणाईचा वसंत नाटय़ोत्सव!
काय दोस्त लोक! एक्झाम फीव्हर उतरला का? तुमच्या परीक्षा चालू असताना राष्ट्रीय वसंत नाटय़ोत्सव पार पडला याची माहिती असेलच तुम्हाला.. (परीक्षा चालू असतानाही तुम्ही नाटय़ महोत्सव पाहिला आहे हे मला माहीत आहे बरं का!) मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टसला पहिल्या व दुसऱ्या वर्षांला निवडक २५-२५ विद्यार्थ्यांची बॅच असते. संपूर्ण देशभरातून निवड चाचणी होऊन हे विद्यार्थी इथपर्यंत पोहोचतात. आजची तरुण पिढी वसंत नाटय़ोत्सवाकडे कोणत्या अंगाने पाहते हे जाणून घेण्यासाठी थिएटर अ‍ॅकॅडमीने सादर केलेल्या ‘हृदय’ या नाटकाच्या टीमशी आम्ही खास बातचीत केली. शेवटच्या दिवशी होणाऱ्या प्रयोगाची रंगीत तालीम चालू असतानाच आम्ही तिथे पोहोचलो त्यामुळे सगळी टीम एकत्रच भेटली आणि गप्पांना पूर आला.

दिल से..
प्रिय मिहीर,

तुझं पत्र मिळालं. थँक्स.. परीक्षा पद्धतीची जी चीड माझ्या मनात होती ती अगदी करेक्ट शब्दांत माझ्यापुढे मांडलीस तू. प्रॉब्लेम असा आहे की, या ‘चेंज’ची निकड जे ही शैक्षणिक पद्धत ठरवतात, त्यांना जाणवतच नाही. मला माहित्येय की कुठलाच बदल एका रात्रीत घडून येत नाही. ती एक प्रोसेस असते. ते रिझल्टस् प्रत्यक्ष दिसण्यासाठी कित्येक वर्षं जावी लागतात, पण त्या बदलासाठी आपण इनिशिएटिव्ह घ्यावा असंच कोणाला वाटत नाही. आणि वाटलं तरी त्या दृष्टीने पावलं उचलली जात नाहीत आणि हेच खटकतं. असो..

पप्पू पास हो गया!
माझी परीक्षा बऱ्याचदा कठीणच जाते आणि नंतर दिवस येतो तो म्हणजे ‘द आर डे’ म्हणजेच रिझल्टचा दिवस. मग सारखं वाटत राहतं की, या वेळी आपली दांडी गुल होणार; पण नोटीस बोर्डवर नावापुढे ‘पास’ असतं आणि त्या क्षणी मी जगातला सर्वात खूश माणूस असतो. आपल्यापैकी ज्यांची अवस्था माझ्यासारखी होते त्यांना वोडाफोनची नवी जाहिरात आणि त्यातील तो मुलगा आठवत असेल. अचानक पास झाल्यावर तो ज्या रिअ‍ॅक्शन्स देतो त्या फारच अपीलिंग’ आणि ‘दिल को छू लेने वाल्या’ आहेत. हा एक्स्प्रेसिव्ह चेहरा म्हणजे नमित दास.

क्रिसॅलिस-०९
एम. जी. एम. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कामोठे, नवी मुंबई यांचा ‘क्रिसॅलिस’ हा वार्षिक तांत्रिक महोत्सव २८ ते ३० मार्च या दिवसांत संपन्न झाला. इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर्स (आयईईई)तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रोबो गेमिंगचे वैविध्यपूर्ण इव्हेन्टस येथे पहावयास मिळाले. ‘रोबोट्रिक्स’मध्ये ‘पायथन पिरॅमिड’ या कठीण ट्रॅक्सवर स्पर्धकांनी आपले रोबोटस हाताळले. सुमो रेसलिंगमध्ये आखाडय़ात रोबोटसची ताकद पणाला लागली. ‘सॉकर’ ही रोबोटसची फुटबॉल मॅच रोमांचक होती. सर्वात लांब झेप घेणारा रोबोट ‘लॉन्ग जम्प’चा विजयी ठरला. कार्यक्रमात सर्वाचे लक्ष वेधत होता तो जमीन व पाणी या दोघांवर लीलया चालणारा रोबोट- ‘अ‍ॅम्फीकार’. ‘काऊंटर स्ट्राईक’ एनएफएस मोस्ट वॉन्टेड या लॅन गेम्सवर आकर्षक पारितोषिके होती. व्हच्र्युअल स्टॉक मार्केट, टेक्निकल क्विज, सुडोकू, ट्रेजर हंटसारख्या इव्हेन्टसमध्येही विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले. संगणक, सिव्हिल, बायोमेडिकल, केमिकल या शास्त्रांमधील विविध विषयांवरील टेक्निकल पेपर प्रेझेन्टेशन्सना विद्यार्थ्यांचा उत्स्फ्रू्त प्रतिसाद मिळाला.
संकेत पाटोळे
sanket.ramchandra.ptole@gmail.com

एन.सी.सी.ची आगळीवेगळी मानवंदना
मुंबई येथील ‘सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स’च्या ३० एन.सी.सी. कॅडेट्सनी २४ मार्च रोजी डोंबिवली येथील शहीद कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकास भेट दिली. हे स्मारक डोंबिवली येथील एम.आय.डी.सी. परिसरात उभारलेले आहे. सर्व कॅडेट्सनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना मानवंदना दिली. कॅप्टन सचान हे डोंबिवलीच्या के. व्ही. पेंढारकर कॉलेजचे माजी विद्यार्थी होते. या कॅडेट्सनी केवळ स्मारकालाच भेट दिली असे नाही तर पेंढारकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचीही भेट घेतली. एन.सी.सी. कॅडेट्सबरोबर लेफ्टनंट सुनील कांबळेही उपस्थित होते. लेफ्टनंट कांबळे डोंबिवलीचे रहिवासी आहेत. लेफ्टनंट कांबळे यांनी पेंढारकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. आपल्या देशाला तरुण शूरवीरांची किती आवश्यकता आहे हे त्यांनी पटवून दिले. त्यांनी सैन्याची माहिती देणारी काही पत्रकेही वाटली. भूदल, नौदल व हवाईदल यांचे महत्त्व व देशाच्या सुरक्षिततेत त्यांचा मोलाचा वाटा यावर लेफ्टनंट कांबळे यांनी प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचे त्यांनी निरसन केले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन कॅप्टन सचान यांच्यासारखे देशसेवेत सामील व्हावे. असे झाल्यास तीच कॅप्टन सचान यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. अशा प्रकारे कॅप्टन सचान यांना दिलेली मानवंदना सर्व विद्यार्थ्यांना स्मरणात राहील.
पूनम बुर्डे
सेंट झेवियर्स कॉलेज

poonamburde@yahoo.co.in

कॅम्पसवर ‘फ्रेम्स’ अनेक असतात, पण त्या ‘क्लिक’ करणं फार थोडय़ांना जमतं. आपमे हैं वह बात? तर मग उचला कॅमेरा आणि तुम्ही काढलेले फोटोज् campusmood@gmail.com वर पाठवा. अट एकच. फोटो कॉलेजशी, कॉलेज जीवनातील ‘हट के प्रसंगांशी आणि एकंदरीतच ‘कॅम्पसच्या मूड’शी मॅच होणारे हवेत. सवरेत्कृष्ट फोटोला ‘कॅम्पस मूड’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. आणि हो! फोटोला शीर्षक तसेच फोटोबरोबर तुमचे नाव, कॉलेज व फोन नंबर पाठवण्यास विसरू नका.