Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

धाणेगावात तापाची साथ
सोयगाव, ६ एप्रिल/वार्ताहर

 

यंदाच्या उन्हाळ्यात वाढते तापमान, दूषित पाणी यामुळे तापाची साथ हिवरी गावाजवळील धाणेगाव गावात पसरली आहे.
हिवरी येथे संपूर्ण गावाला विळख्यात घेणारी तापाची साथ आटोक्यात आली तरी पाच किलोमीटरअंतर्गत असणारी मोलखडा, टिटवी, धाणेगाव या गावांत आरोग्य विभागाचे लक्ष होते. विशेष म्हणजे हिवरीत वैद्यकीय कर्मचाऱ्याचे एक पथक तळ ठोकून आहे.
रात्री सावळतबारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खडके यांना मोलखेडा गावातून गावकऱ्यांनी दूरध्वनी करून गावात ताप व सर्दीचे मोठय़ा प्रमाणावर रुग्ण आहेत. तेव्हा डॉ. खडके व डॉ. संजय वऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथक धाणेगाव येथे दाखल झाले.
गावात ८५ रुग्णांची तपासणी केली, त्यात सात रुग्णांना मलेरियाचा संशय आला म्हणून त्यांचे रक्तनमुने घेतले आहेत. डॉ. खडके यांनी सांगितले की, तापाचे स्वरूप कमी आहे तरी सर्दीचे प्रमाण जास्त आहे. तरीही काळजी म्हणून घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी केली आहे. हिवरी गावाजवळच मोलखेडा गाव असल्याने तापाची साथ इतर गावांत पसरत असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत.