Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आवळे यांच्याकडे अडीच कोटी, गायकवाड यांच्याकडे ४९ लाखांची मालमत्ता
लातूर, ६ एप्रिल/वार्ताहर

 

लातूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार जयवंत आवळे यांच्याकडे २ कोटी ४८ लाख ६५ हजार ८७ रुपयांची तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुनील गायकवाड यांच्याकडे ४९ लाख ९ हजार ९०५ रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी लिहिलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे.
जयवंत आवळे यांच्याकडे विविध बँकांमध्ये सुमारे २० लाखांच्या ठेवी आहेत. सव्वा लाखाचे शेअर्स आहेत. ८६ लाख रुपयांचे देणे आहे. आवळे यांच्या नावावर एक कोटी ९३ लाख ८१ हजार २३९ रुपयांची तर त्यांची पत्नी शकुंतला आवळे यांच्या नावावर ५४ लाख ८३ हजार ८४८ रुपयांची मालमत्ता आहे. त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे (कंसातील आकडे त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे) : रोकड ५१ लाख ७८७ (१७१), बँकेतील ठेव १८ लाख ६० हजार ३ (एक लाख ३३ हजार २९७), जडजवाहिर ९० हजार (३ लाख), शेतजमीन १८ लाख ८ हजार ८८८ (६ लाख ७१ हजार), बिगर शेती ४१ लाख ४९ हजार ५६० (४१ लाख ५६ हजार ३८०), इमारती ८० लाख ७४ हजार २५० (२ लाख २३ हजार), घर ६५ लाख, रिव्हॉल्व्हर ३ लाख ४० हजार ३९८ रुपये, स्कोडा गाडी १० लाख, रोखे १ लाख २७ हजार, विविध बँकांतील ठेवी २० लाख, यंत्रमाग २ लाख २५ हजार अशी मालमत्ता आहे.
डॉ. सुनील गायकवाड यांच्याकडे ४९ लाख ९ हजार ९०५ रुपयांची मालमत्ता आहे. ही मालमत्ता त्यांची पत्नी व भागिदारी व्यवसायातील आहे. डॉ. गायकवाड यांच्या नावे बँकेत ४७ हजार ८० रुपये आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावे ५ लाख ७२१ रुपये आहेत. डॉ. गायकवाड यांच्या मालकीचे ४ लाख रुपये किमतीची मोटरगाडी, ३५ हजार रुपयांची एक जुनी जीप आहे. त्यांच्या पत्नीकडे सव्वाआठ लाख रुपयांचे दागिने आहेत. पत्नीच्या नावावर मुंबईतील मुलुंड भागात १५ लाख ४२ हजार ५५० रुपये किमतीचा एक तर विक्रोळी भागात साडेतीन लाख रुपयांचा दुसरा फ्लॅट आहे. लातूर येथील वत्सला बळीराम प्रकाशन केंद्र व दै. अस्तित्वाचा शोध घेणारा सुपुत्र या नोंदणीकृत भागीदार व्यवसायातील ८ लाख ८९ हजार ५५४ रुपयांची मालमत्ता आहे. यात प्लॉट, स्टॉक, इमारत, भागीदारी खात्यावरील शिल्लक, शासकीय जाहिरातींचे येणे आदींचा समावेश आहे. देणींमध्ये डॉ. गायकवाड यांना सरलेल्या आर्थिक वर्षांतील वैयक्तिक ८४ हजार १० रुपये तर भागीदारी व्यवसायातील ५ हजार रुपयांचा आयकर देणे आहे.