Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना हवे ते प्रश्न विचारा. फक्त प्रश्न व्यक्तिगत, आरोप करणारे नसावेत, एवढे नक्की. प्रश्न कोणाला विचारायचा आहे, याचा उल्लेख करून नेमक्या शब्दांत प्रश्न विचारा. आपले प्रश्न ‘लोकसत्ता’च्या औरंगाबाद कार्यालयात पाठवा. प्रश्नकर्त्यांचे संपूर्ण नाव व पत्ता अवश्य द्यावा. ’‘lokmtv@gmail.com या पत्त्यावरही प्रश्नांचे ‘इ-मेल’ पाठवता येईल.

 

लोकसभेच्या परभणी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांना प्रश्न
*आपण परभणी जिल्ह्य़ातील अनेकांचे राजकारण दगाबाजी करून संपविले, आता त्यांच्याकडूनच सहकार्याची अपेक्षा कशी करता?
सुरेश जाधव, गंगाखेड
औरंगाबाद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना.
*खासदार या नात्याने आपण गेल्या दहा वर्षांत आपल्या निधीतून किती रुपयांची, कोणती आणि कोठे विकासकामे केली?
पांडुरंग पाटील, उस्मानपुरा, औरंगाबाद.
लातूर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील गायकवाड यांना.
*केंद्रात भा. ज. प.प्रणीत आघाडीची सत्ता होती, तेव्हा राममंदिर उभारणी का झाली नाही? आता पुन्हा पक्षाच्या जाहीरनाम्यात राममंदिराचा मुद्दा आला. मतदारांनी कसा विश्वास ठेवावा?
बापू गायखर, लोहा.
*आपण कोणत्या प्रमुख मुद्दय़ांवर मतदारांना आवाहन करणार? जाहीरनामा जनतेला देणार काय?
हिंदराज घोरबांड, लोहा.
बीड मतदारसंघातील भा. ज. प.चे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांना.
*आपणास ऊसतोड कामगारांचे नेते म्हणून ओळखले जाते. बीड जिल्ह्य़ातील मजूर ऊस तोडणीसाठी दर वर्षी मोठय़ा प्रमाणात स्थलांतरित होतात. त्यांचे स्थलांतर थांबविण्यासाठी काय उपाययोजना करणार?
परमेश्व आडागळे, सोनीमोहा (धारूर.)
*बीड जिल्हा माहिती-तंत्रज्ञान प्रशिक्षणात मागासलेला आहे. त्यासाठी पाठपुरावा करणार का?
प्रमोद मिसाळ, धारूर.
लातूरमधील काँग्रेस उमेदवार जयवंतराव आवळे यांना.
*लातूर मतदारसंघ आपल्या-साठी लादलेला. आपण निवडून आला तर मतदारांना कुठे भेटणार?
पांडुरंग राहटकर, लोहा.
औरंगाबाद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार उत्तमसिंह पवार यांना.
*आपल्या अधिपत्याखाली स्थानिक केबल नेटवर्क आहे. आपली उमेदवारी जाहीर होण्याआधीपासून त्याचा वापर फक्त आपल्या प्रचारासाठी करण्यात येत असल्याचे स्पष्ट जाणवते. प्रसारमाध्यमाचा असा एकतर्फी वापर आपणास योग्य वाटतो का?
सुनील व्यवहारे, जाधववाडी, औरंगाबाद.
नांदेड व लातूर मतदारसंघांतील काँग्रेसच्या उमेदवारांना.
*केंद्र सरकारने महाविद्यालयीन प्राध्यापक-कर्मचाऱ्यांसाठी चड्डा आयोग लागू केला. राज्य सरकार त्याची केव्हा अंमलबजावणी करणार?
प्रा. माधव केंद्रे, लोहा.