Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९

जुन्या-नव्याचा ‘कार’नामा
‘जुने ते सोने’ ही म्हण अनेकदा वापरली जात असली तरी कालांतराने जागेच्या अडचणीमुळे अथवा इतर काही कारणाने जुन्या वस्तु विकल्या जातात किंवा वापरातून हद्दपार होतात. अनेक मुंबईकरांनी साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या विंटेज कार अजूनही जपून ठेवल्या आहेत. केवळ प्रदर्शनापुरत्या नव्हे तर आजही त्या तेवढय़ाच वर्किंग कंडिशनमध्ये आहेत. विंटेज अ‍ॅण्ड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रॅलीच्या निमित्ताने, केवळ वर्तमान आणि भविष्याशी संबंध असलेल्या मुंबईने रविवारी वैभवशाली भूतकाळ अनुभवला. तर दुसरीकडे पार्क्स सुपर कार शोच्या निमित्ताने ‘वेग’ आणि ‘श्रीमंती’ या संज्ञांचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या फेरारी, पोर्श, लॅम्बोर्गिनी इत्यादी गाडय़ांचे दर्शनही मुंबईकरांना मिळाले.

ऐन एप्रिलमध्ये एकीकडे उन्हाळा दररोज कमाल तापमानाचे नवनवे विक्रम करीत असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुकीनिमित्त राजकीय ज्वरही वाढत आहे. बदललेल्या मतदारसंघात जुने-नवे भिडू आपले नशीब आजमावू पाहत आहेत. ‘वृत्तान्त’मध्येही मुंबई-ठाणे-रायगड परिसरातील ११ मतदारसंघांमधील लढतींचा लेखाजोखा आजपासून मांडण्यात येणार आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य, उत्तर मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर मुंबई, ईशान्य मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर आणि रायगड या मतदार संघांचे चित्र वृत्तान्तमधून आजपासून प्रसिद्ध केले जाणार आहे. या ‘कॅम्पेन’मध्ये आमच्या प्रतिनिधींनी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना ‘आम्ही का उभे राहिलो’, ‘त्यांची राजकीय पाश्र्वभूमी’, ‘मतदार संघ माहिती आहे का’, ‘मतदारसंघात संपर्कात होते का’ आणि ‘त्या त्या मतदारसंघातील समस्या माहिती आहेत का’ असे पाच प्रश्न विचारले. त्यांनी दिलेल्या उत्तरांवर आधारित हे ‘महामुंबई-११’ खास वाचकांसाठी..

धावत्या जीवनशैलीपासून सावधान..
प्रतिनिधी

तुम्ही रोज वेळच्या वेळी, सकस आहार घेता का?.. घेत नसाल; तर सावधान! गेल्या दशकभरात जीवनशैलीजन्य विकारांचे प्रमाण वाढत असून, बहुतेक विकारांना जेवणाच्या अनियमित वेळा, निकस आहार कारणीभूत असल्याचे, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे. आरोग्यदायी सवयींसाठीही वेळ नाही, इतके ‘बिझी’ असलेल्या तरुणवर्गात या विकारांचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस अधिकाधिक वेगवान होणाऱ्या जीवनशैलीशी जुळवून घेताना आरोग्यासाठी हानिकारक अशा नानाविध सवयी लागतात, आणि त्यांचे पर्यवसान आरोग्यविषयक समस्यांमध्ये होते.

रुग्णसेवेचा अनोखा आदर्श
प्राजक्ता कदम

बाळचोरीसह अनेक प्रकरणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सायन रुग्णालयाने यशवंती पडवळ या महिलेच्या निमित्ताने ‘रुग्णसेवा हीच सर्वोच्च सेवा’ असल्याचे दाखवून रुग्णालयाबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या उलटसुलट चर्र्चाना पुर्णविराम दिला आहे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे रुग्णालयाचे वेगळेपण तर सर्वासमोर आलेच, पण नाव-गाव-पत्ता काहीच माहीत नसलेल्या आणि कोमात गेलेल्या यशवंतीवर उपचार करून तिला कोमातून बाहेर काढणाऱ्या डॉक्टरांनी आपल्या प्रयत्नांतून बाजारीपणाचे बळी ठरत असलेल्या वैद्यकीय क्षेत्राला त्यांच्या खऱ्या कर्तव्याची जाणीवही करून दिली आहे.

कॉ. डांगे यांची ग्रंथसंपदा मुंबई विद्यापीठाकडे
प्रसाद मोकाशी

भारतीय कम्युनिस्ट चळवळीचे भीष्माचार्य कॉ. श्रीपाद अमृत तथा एस. डांगे यांची ग्रंथसंपदा बुधवारी मुंबई विद्यापीठाकडे त्यांची कन्या कॉ. रोझा देशपांडे सुपूर्द करणार आहेत. सुमारे साडेतीन हजार पुस्तकांमध्ये अनेक दुर्मिळ तसेच ऐतिहासिक पुस्तकांचा समावेश आहे. ही पुस्तके मुंबई विद्यापीठामध्ये इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या, संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील, असा विश्वास विद्यापीठाच्या सुत्रांनी व्यक्त केला आहे.

स्वरभास्कराला मानवंदना!
प्रतिनिधी

पं. भीमसेन जोशी यांनी गेली सुमारे सात दशके आपल्या गायकीने करोडो कानसेनांना तृप्त केले. शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल अलीकडेच त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या सत्काराचा आनंद अखंड भारतीय संगीतक्षेत्राला झाला. हा आनंद साजरा करण्यासाठी गायन-वादन-नृत्य क्षेत्रातील कलाकारांतर्फे या स्वरभास्कराला मानवंदना देण्यात येणार आहे. वलय फाउंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबद्दल अधिक माहिती देताना या कार्यक्रमाचे आयोजक रतीश तागडे यांनी सांगितले की, पं. भीमसेन जोशी यांच्या गायकीबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सर्वच कलाकारांच्या मनात आदर आहे.

विश्वासघात
‘घरमें यह बेड, कपाट और बहुत सारा सामान मॅडमने दिया.. मेरे बच्चोंकी स्कूल फीस् मॅडम भर रही थी.. कभी पैसे माँगे तो मॅडमने ना नही किया.. मैने बहुत गलत किया.. ’ जसपालसिंग ऊर्फ जस्सी मालाड पोलीस ठाण्याच्या गुन्हे विभागाचे निरीक्षक दीपक फटांगरे यांना सांगत होता. परंतु आता तुरुंगाची हवा खाण्यावाचून त्याला गत्यंतर नव्हते. मालाड पश्चिम येथील अ‍ॅकमे संकुलात राहणाऱ्या संजय विझला यांच्या घरी गेल्या महिन्यात झालेल्या २७ लाख रुपयांच्या जबरी चोरीप्रकरणी जस्सी त्याच्या इतर तीन साथीदारांसमवेत तुरुंगात आहे.

पिक्स वाहिनीवर ‘पॅशन ऑफ द ख्राइस्ट’ आणि ‘क्लिफहॅँगर’
या चित्रपटात जीझस ऑफ नाझरेथच्या जीवनातील अखेरच्या बारा तासांभोवती केंद्रित झाल्याचे कथानक गुंफले आहे. अभिनेता मेल गिब्सन याने पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे. २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘दि पॅशन ऑफ द ख्राइस्ट’ या चित्रपटाला त्यावेळी ऑस्कर पुरस्कारांमध्ये तीन नामांकने मिळाली होती. पिक्स चॅनलवर येत्या शुक्रवारी दुपारी १२ वाजता हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. ‘क्लिफहंगर’ हा अमेरिकेत तिकीटबारीवर तुफान हीट झालेला १९९३ सालचा चित्रपट आहे. चोरांची एक टोळी कोटय़वधी डॉलर्सची रक्कम पळविते.

वसई-विरारचे स्कायवॉक कोणाच्या हितासाठी?
मुंबई शहराला लागून असलेल्या वसई-विरार विभागात स्कायवॉक बांधण्यासाठी एम.एम.आर.डी.ने सुमारे १० कोटी रुपये मंजूर केले आहेत. मुंबई येथील वांद्रे स्थानकात स्कायवॉक बांधल्यानंतर एम.एम.आर.डी.ने मुंबई-ठाण्यात सर्वत्र स्कायवॉक बांधण्याचा चंगच बांधला आहे. त्यासाठी स्वतंत्र विभागही निर्माण केला आहे. स्कॉयवॉक म्हणजे जनतेच्या पैशातून आणलेली सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असे बहुधा एम.एम.आर.डी.च्या आयुक्तांना वाटत असावे.

हायटेक वधू-वर मेळाव्याला उदंड प्रतिसाद
प्रतिनिधी

आजही वधू-वर मेळावा शुभमंगल विवाह संस्था आणि ‘लोकसत्ता’ यांच्या सहकार्याने मंगळवारीही युनायटेड स्पोर्ट्स क्लबचे मैदान, ठाणे पूर्व याच ठिकाणी वधू-वर मेळावा होत असून, त्यात ९६ कुळी मराठा, कुणबी, पाटील, माळी, देशमुख, भंडारी, आगरी, कोळी व तत्सम जातींमधील लोकांना सहभाग घेता येईल. सुमारे एक हजार तरुण-तरुणी त्यांचे पालक, नातेवाईक आणि शुभमंगल संस्थेचे स्वयंसेवक यांची एकच लगबग रविवारी सहप्रायोजक ‘लोकसत्ता’च्या सहकार्यातून झालेल्या हायटेक वधू-वर मेळाव्यात सुरू होती. ठाणे पूर्व येथील युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात प्रथमच ‘हायटेक’ वधू-वर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला उदंड प्रतिसाद लाभला. रविवारी सकाळी ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य संयोजक शुभमंगल संस्थेचे सु. पां. कुळकर्णी उपस्थित होते. कुळकर्णी यांचे शिक्षणक्षेत्रात भरीव योगदान आहे. प्रसंगी पदराला खार लावून समाजसेवा करण्याची त्यांची वृत्ती आहे, अशा शब्दात जोगळेकर यांनी त्यांचा गौरव केला. ‘लोकसत्ता’मधून वधू-वर मेळाव्याच्या बातम्या कटाक्षाने आम्ही टाळत आलो. मात्र शुभमंगलतर्फे अमुक एका जातीचा, पोटजातीचा वधू-वर मेळावा नाही. सर्व समाजातील लोकांसाठी हा मेळावा खुला आहे. त्यामुळे सामाजिक जाणिवेतून ‘लोकसत्ता’ या उपक्रमासोबत आल्याचे त्यांनी सांगितले. चांगले स्थळ शोधण्यासाठी पालकांना जोडे झिजवावे लागतात, मात्र सर्वसमावेशक अशा या मेळाव्याचा फायदा पालक व लग्नाच्या तयारीत असलेल्या वधू-वरांना निश्चित होईल, असे जोगळेकर म्हणाले. विविध जातींसाठी वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला होता. उद्घाटनानंतर नावनोंदणी केलेल्या उपवर, उपवधूंची माहिती देणारी पुस्तिका मेळाव्याला उपस्थित राहिलेल्यांना देण्यात आली. नंतर त्याचे वाचन करण्यात येऊन ज्या वधू-वरांची छायाचित्रे शुभमंगल संस्थेकडे होती ती सीसीटीव्हीवरून दाखविण्यात आली. सुमारे हजारभर वधू तसेच वरांची माहिती सांगताना वधू-वरांच्या पालकांकडे यादी देण्यात आली होती. जेवणाच्या सुट्टीदरम्यान टिपून घेतलेल्या क्रमांकाची यादी शुभमंगल संस्थेच्या स्वयंसेवकांकडे देऊन इच्छित वधू अथवा वरांची संपूर्ण माहिती असलेल्या सविस्तर बायोडेटाची झेरॉक्स प्रत देण्यात आली. प्रथम वर, प्रथम वधूबरोबरच पुनर्विवाहासाठीही अनेक लोक मेळाव्याला आले होते. ज्या वधू-वरांनी ३१ मार्चपूर्वी मेळाव्यासाठी नावनोंदणी केली होती, त्यांचीच नावे उपस्थितांना देण्यात आलेल्या पुस्तिकेत होती. मात्र त्यानंतरही एक, दोन तसेच अगदी मेळाव्याच्या दिवशीही सकाळपर्यंत अनेकांची नावे नोंदण्यात आली. त्यामुळे अशा वधू-वरांची माहिती संयोजकांनी अधिक सविस्तरपणे सांगितली.