Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९

जातीच्या राजकारणातून बाहेर पडण्याचे दिव्य
अविनाश पाटील

‘हरिभाऊ’ नाव घेताच मनामध्ये अशा व्यक्तिमत्वाविषयी जे चित्र निर्माण होते, त्या चित्रातील एकही रंग फिका पडणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेणारे वास्तव रूप म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार खा. हरिभाऊ जावळे. विरोधकांची कठोर भाषेत हजेरी घेताना हरिभाऊंना मितभाषी, मृदू स्वभावाची आडकाठी होत असल्याने प्रचारात त्यांचा अधिक भर आपण कोणती विकास कामे केली हे सांगण्यावर अधिक. जळगाव लोकसभा मतदारसंघातून २००७ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत युतीचे उमेदवार म्हणून विजय मिळविल्यानंतर हरिभाऊंची ओळख संपूर्ण जिल्ह्य़ास झाली असली तरी पक्षाशी एकनिष्ठ म्हणून भाजप कार्यकर्त्यांबरोबर त्यांची नाळ कधी जुळली हे त्यांनाही सांगता येणे अवघड.

माघारीतला पुढाकार!
भाऊसाहेब :
अर्ज भरन्याचा वख्त संपला ना रे भावराव..
भाऊराव : कसले अर्ज?
भाऊसाहेब : आता घ्या, निवडनुकीच्या मोसमात तुला आनखी कोन्ता अर्ज वाटला..
भाऊराव : तसं नाही, माझे अर्ज-फाटे सारखे सुरू असतात ना, कधी सात-बारा साठी, कधी शेती विम्यासाठी, कधी पाणी पुरवठा योजनेसाठी, झालच तर कधी माहितीच्या अधिकारासाठी.. कधी काही अडचण आली की, घे कागद अन् खरड अर्ज हे आपलं आवडत काम. त्यामुळे नेमक्या कुठल्या अर्जाबद्दल बोलताय ते चटकन ध्यानात नाही आलं.

‘कार्यक्षमता तपासणे गरजेचे’
लोकशाही ही एक उत्तम शासनपध्दती आहे. ती सर्वोत्तम होण्यासाठी मतदारांनी जागृत रहायला हवे. आपले मत योग्य उमेदवाराला दिले जाईल याची दक्षता घ्यायला हवी. उमेदवाराचे वय किती आहे, त्याच्यात संघटन कौशल्य आहे का, त्याने पूर्वी कोणती विकासाची कामे केली आहेत, त्याचे शिक्षण किती, तो किती कार्यक्षम आहे.. अशा अनेक प्रश्नांची होकारार्थी उत्तरे जास्तीत जास्त ज्याच्याकडून येतील अशाच उमेदवारास मत द्यावे. नाशिक लोकसभा मतदार संघातून पूर्वी स्व. यशवंतराव चव्हाण आणि गो. ह. देशपांडे निवडून गेले होते. त्यांच्या कार्याचा ठसा अजूनही आहे.

झोपडपट्टीमुक्त शहरासाठी लोकप्रतिनिधींत समन्वयाचा अभाव
प्रश्न जिव्हाळ्याचे

प्रतिनिधी / नाशिक

‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांच्या समस्यांचे वास्तव पुढे आले असताना काही निवडक शहरांमध्ये संबंधितांना घरकुल उपलब्ध करून ‘स्लम एरिया’ संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने खुद्द केंद्र सरकारने एखादी योजना राबविली तर अशा योजनेवर सर्वाच्या उडय़ा पडणे स्वभाविक आहे. तथापि, नाशिक शहरात अशा स्वरुपाच्या राबविल्या जाणाऱ्या घरकुल योजनेला अनेकांनी प्रखर विरोध दर्शवून त्याकडे चक्क पाठ फिरवल्याचे विपरित चित्र दिसत आहे.

बँक बचाव समितीचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
प्रतिनिधी / नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून भरमसाठ आश्वासने दिली जात असली तरी अडचणीत आलेल्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्याच्या विषयावर कुणी बोलण्यास तयार नसल्याची तक्रार बँक बचाव समितीने केली आहे. नाशिक शहरातील अनेक संस्थांमध्ये तब्बल ६० हजार ठेवीदारांच्या १०० कोटीहून अधिक रकमेच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. या ठेवी परत मिळवून देण्याकरिता उमेदवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा बँक बचाव समितीने दिला आहे.

नाशिक वसंत व्याख्यानमालेच्या वसंतोत्सव अध्यक्षपदी राधाकिसन चांडक
नाशिक/ प्रतिनिधी

शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या वसंत व्याख्यानमालेला एक मेपासून सुरूवात होत असून मालेच्या वसंतोत्सवाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ उद्योगपती राधाकिसन चांडक यांची निवड करण्यात आली आहे. व्याख्यानमालेची वार्षिक सर्वसाधारण सभा मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांच्या अध्यक्षतेखाली श्री दुर्गा मंगल कार्यालयात झाली. या सभेत ही निवड करण्यात आली. एक ते ३१ मे या काळात नाशिकच्या गोदा घाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर ही व्याख्यानमाला होणार आहे. मालेचे यंदाचे ८८ वे वर्ष आहे. मालेच्या वसंतोत्सवाच्या ध्यक्षपदासाठी चांडक यांच्या नावाची सूचना जयप्रकाश जातेगावकर यांनी मांडली. सदस्य रमेश जाधव यांनी अनुमोदन दिले. मालेचे ज्येष्ठ सभासद चंदुलाल शाह यांच्या हस्ते चांडक यांचा सत्कार करण्यात आला. मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजूर करणे, २००८-०९ या वर्षांच्या खर्चास मंजुरी, २००९-१० या वर्षांच्या अंदाजपत्रकास मंजुरी, व्याख्यानांविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्व विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले. बैठकीस मालेचे उपाध्यक्ष विश्वास ठाकूर, सरचिटणीस अशोक देशमुख, खजिनदार अरूण शेंदुर्णीकर, रमेश जुन्नरे आदि उपस्थित होते.

राजकीय जाहीरनाम्यात पर्यावरणाचा समावेश करण्याची मागणी
नाशिक / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षांकडून जाहीरनामे प्रसिध्द करण्यात येत आहे. या जाहीरनाम्याद्वारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांची खैरात करण्यात येत असतांना दिवसेंदिवस ऱ्हास होत असलेल्या पर्यावरण विषय मात्र दुर्लक्षित करण्यात आला आहे.
एका बाजूला पर्यावरणाचे रक्षण करण्यासंदर्भात राजकीय पुढाऱ्यांकडून जाहीर कार्यक्रमामध्ये संदेश देण्यात येतो तर दुसरीकडे वृक्ष तोडीच्या बातम्या सरार्स बघायला मिळतात. पर्यावरणाच्या ऱ्हासाशी संबधित इतर अनेक विषय असुन पिण्याच्या पाण्याची समस्याही या प्रश्नाशी निगडीत आहे. वृक्ष तोडीमुळे डोंगर उघडे बोडके होत असून गावोगावी पाण्याचे साठे कमी होत आहेत. औद्योगिक विकासाच्या नावाखाली अनेक बडे कारखाने शहरांमध्ये येत आहे. परंतु या कारखान्यांमुळे पर्यावरणास निर्माण होणारा धोका कोणी लक्षात घेण्यास तयार नाही. बहुतांशी राजकीय नेत्यांना आपल्या भागात किती जंगले आहेत याचीही कल्पना नसते. जंगल जगले तरच शहर पण जगेल हे ध्यानात घेणे गरजेचे आहे. पर्यावरण हा विषय अतिशय गौण समजून आपल्या जाहीरनाम्यातून सर्वच राजकीय पक्षांनी हा विषय जणु काही हद्दपारच केला आहे. शहराच्या विकासाबरोबरच पर्यावरणाचा विकास न केल्यास होणारे परिणाम दिर्घकालिन टिकणारे आहेत. त्यामुळेच राजकिय पक्षांनी या विषयालाही महत्व देत आपल्या जाहिरनाम्यांमध्ये त्याचा सहभाग करावा अशी मागणी नेचर क्लब ऑफ नाशिकचे प्रा. आनंद बोरा यांनी केली आहे.