Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९

खासगी इंग्रजी शाळांमध्ये शुल्कवाढीचा भडका
पुणे, ६ एप्रिल/ खास प्रतिनिधी

खासगी विनाअनुदानित इंग्रजी शाळांनी आगामी शैक्षणिक वर्षांसाठी सरासरी अडीच ते तीन हजार रुपये शुल्कवाढ जाहीर केली असून काही शाळांनी तब्बल आठ हजारांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरीची अनिश्चितता आणि मंदीच्या परिस्थितीमुळे कोलमडलेले आर्थिक गणित अशा कात्रीत सापडलेल्या पालकांमध्ये या शुल्कवाढीबाबत तीव्र असंतोष आहे. परंतु, पाल्याचे शैक्षणिक नुकसान होण्याच्या भीतीने याबाबत आवाज उठविण्यासाठी पुढे येण्यास कुणीही तयार नाही.

तुम्हारे गाँवसे आम आये है..
प्रचार सुरू झाला आणि भाईंनी आता गल्लोगल्ली, टेकडय़ा, सारसबाग धुंडाळायला सुरूवात केली आणि मिळेल त्याला हात जोडून मत देण्याचे आवाहन करण्यास सुरूवात केली. मग प्रचार करताना त्यांनी रविवारचा मुहूर्त साधून गुलटेकडी मार्केट यार्ड सकाळीच गाठले आणि व्यापाऱ्यांना हाताशी धरले. काही व्यापाऱ्यांसह कार्यकर्त्यांना घेऊन भाईंनी विविध ठिकाणांहून येणाऱ्या ग्राहकांसह, व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या.

बालगोपाळांची लाडकी ‘फुलराणी’ माहेरी परतणार!
विनायक करमरकर, पुणे, ६ एप्रिल

गेली पाच दशके बालगोपाळांचे आकर्षण बनून राहिलेली पेशवे उद्यानातील ‘फुलराणी’ लवकरच ‘माहेरी’ म्हणजे ‘महाऊर्जा’कडून पुणे महापालिकेकडे परतत असून येत्या उन्हाळी सुट्टीतही पेशवे उद्यानाचे मुख्य आकर्षण नटलेली, सजलेली ‘फुलराणी’ हेच राहणार आहे. पुणे महापालिकेने सारसबागेजवळ सात एकर जागेवर विकसित केलेल्या पेशवे उद्यानातील विविध प्राणी व पक्षी कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात हलविण्यात आल्यानंतर या जागेवर ‘ऊर्जा उद्यान’ विकसित करण्यात आले.

अपक्षांच्या ‘समजुती’साठी वेगवेगळ्या ‘बोली’ सुरू
पुणे, ६ एप्रिल/ विशेष प्रतिनिधी

पुण्यात तब्बल बावन्न उमेदवार उभे असल्याने प्रमुख पक्षांकडून त्यांची ‘समजूत’ घालण्याची जोरदार मोहीम सुरू झाली आहे. एका प्रमुख अपक्ष उमेदवारावर जबरदस्त दडपण येत असल्याने तो आज रात्रीपासूनच गायब झाला आहे. या उमेदवारांसाठी वेगवेगळी बोली लावण्यात येत असल्याचे समजते. लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुण्यात यंदा विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तब्बल साठ जणांनी पुण्याच्या जागेसाठी अर्ज केले. अर्जाच्या छाननीत त्यापैकी आठ अर्ज बाद ठरले. तरीही एकूण बावन्न उमेदवार उरले आहेत.

..आणि चिमू खूश झाला!
लोक तर म्हणतात..

सकाळ झाली. चिमू उठला. पेप्सोडंटनं त्यानं ब्रश केलं. सवयीप्रमाणे दुधाचा ग्लास त्यानं एका घोटात संपवला. चमचाभर च्यवनप्राश, दोन सोललेले बदाम, चार खारका असा सात्विक आहार झाला. आज शाळेला सुट्टी होती. त्याचे सवंगडी आले. पण चिमू खेळायला घराबाहेर पडेना. त्याचं सारं लक्ष फोनवर होतं. काल तो शाळेच्या हेडमॅमना भेटायला गेला होता. पण हेडमॅमनं त्याला काही भेटायला बोलावलंच नाही. शेवटी तो एका टंकलेखकाकडे गेला. शाळेत ‘प्रेयर’ म्हणण्याचा मान कायम सुरेशला मिळतो, मला एकदा तरी तो मान द्या, असं त्याचं म्हणणं होतं. त्याने बराच आरडाओरडा केला, तेव्हा टंकलेखक म्हणाला, ‘रागावू नको. मी तुझं म्हणणं हेडमॅमच्या कानावर घालतो आणि तुला फोन करतो.’

माणसं चॉकलेट का खातात?
सर्वसाधारणपणे एखाद्या वस्तूची लोकप्रियता वाढवायची असली की त्या वस्तूमुळे पौरुष वाढतं असं म्हटलं की कार्यसिद्धी होते. बटाटा आणि टोमॅटो जेव्हा युरोपात प्रथम आले तेव्हा ते फारसे लोकप्रिय नव्हते. त्यांच्याकडे काहीसं संशयानं बघितलं जायचं. पुढे कधीतरी बटाटा हा कामप्रेरक असल्याची अफवा पसरली. बटाटा लोकप्रिय झाला तरी टोमॅटो मात्र फारसा खपत नसे. तो खायला चर्चचीसुद्धा मान्यता नव्हती. दरम्यान, कुणीतरी टोमॅटो हा वाजीकरणासाठी योग्य असल्याचं दुसऱ्या कुणाला तरी सांगितलं. त्यानंतर टोमॅटो इतका खपू लागला की आज ती जगातली सर्वाधिक खपाची भाजी बनली आहे. टोमॅटो अमेरिकेचं अनधिकृत राष्ट्रीय फळ आहे.

यंत्रमानवाने लावला छोटासा शोध
कृत्रिम बुद्धिमत्ता हा विज्ञान क्षेत्रात भविष्यकाळातही महत्वाचा विषय ठरणार आहे. त्या दिशेने अलीकडेच एक पाऊल पडले आहे. केंब्रिज विद्यापीठ आणि अबेरियस्वेथ विद्यापीठ या दोन विद्यापीठातील वैज्ञानिकांनी यंत्रमानवरूपी वैज्ञानिक तयार केला आहे. एक छोटासा वैज्ञानिक शोधही या यंत्रमानव वैज्ञानिकाने लावला असून ही अतिशय मोठी कामगिरी मानली जात आहे. अशाप्रकारे स्वत:ची बुद्धिमत्ता वापरून शोध लावणारे हे पहिलेच यंत्र आहे. या रोबोट म्हणजे यंत्रमानवाचे नाव आहे अ‍ॅडम. ही एक संगणक प्रणाली आहे त्यात स्वयंचलित पद्धतीने सर्व वैज्ञानिक प्रक्रिया होते.

द्युफे आणि इतर
कहाणी बिनतारी संदेशवहनाची झ्र् ५

फेनं आपल्या सुरुवातीच्या प्रयोगामध्ये एक सोन्याचा वर्ख घेतला. त्यात त्यानं एक बुचाचा तुकडा गुंडाळला. मग हा बूच असलेला वर्ख त्यानं एका रेशमी दोऱ्याला बांधून छताला लटकवला. मग त्यानं एका धातूच्या विजेनं भरलेल्या काडीनं त्या वर्खाला स्पर्श केला, त्यामुळे तो वर्खही विजेनं भारला गेला. म्हणजेच त्यात वीज आली. मग त्यानं असंच दुसऱ्या सोनेरी वर्ख, बुचाचा तुकडा आणि रेशमी दोरा यांच्या बाबतीत करून पहिल्या तुकडय़ापासून थोडय़ा अंतरावर छताला टांगला.

हेड स्पेस तंत्रज्ञान
अलीकडेच आपण एका शोधाचा सुवर्णमहोत्सव व शोधकाची जन्मशताब्दी साजरी केली . तो शोध आहे रकत-मद्यार्कतंत्र व शोधक कै. डॉ. महल. न्यायसहायक विज्ञान प्रयोगशाळेचे ते पहिले संचालक होते. आज आपण अशाच एका नवीन तंत्राचा परिचय/ माहिती करून घेऊ या! या तंत्राचे नाव हे इंग्रजी आहे. त्याचे मराठी रुपांतर करणे अवघड व ते तसे इंग्रजीतच जास्त परिचित, त्यामुळे त्याचे मराठी नाव आपणच ठरवावे.

दोन ते साडेतीन तासांची शहरात आज वीजकपात
पुणे, ६ एप्रिल/ प्रतिनिधी

टाटा पॉवर कंपनीकडून अतिरिक्त वीज उपलब्ध होणार नसल्याने उद्या (सोमवारी) पुणे व िपपरी- चिंचवड शहरामध्ये दोन ते साडेतीन तासांची वीजकपात होणार आहे. टाटा पॉवर कंपनीकडून मागील तीन दिवसांपासून अतिरिक्त वीजच मिळत नसल्याने शहरामध्ये नियोजित वेळेनुसार पूर्ण वीजकपात करण्यात येत आहे. त्यानुसार कोथरूड, शिवाजीनगर, पद्मावती व पर्वती या गटामध्ये दोन तास, बंडगार्डन, रास्ता पेठ, नगररोड व भोसरी या गटात पावणेतीन तास, तर िपपरी विभागात साडेतीन तासांची वीजकपात होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

लष्कर न्यायालयातून कागदपत्रांची चोरी
पुणे, ६ एप्रिल/प्रतिनिधी

लष्कर न्यायालयाच्या रेकॉर्ड विभागाच्या खिडकीचा पत्रा उचकटून निकालाची कागदपत्रे चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. २००६ मधील फेब्रुवारी, मार्च आणि सप्टेंबर महिन्यांतील कागदपत्रे चोरी झालेली आहेत. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री सुरू होते. लष्कर न्यायालयात घडलेल्या या चोरीच्या प्रकारामुळे पुन्हा एकदा न्यायालयातील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर न्यायालयाच्या रेकॉर्ड विभागाच्या मागील बाजूस असलेल्या एका खिडकीचा पत्रा उचकटून अज्ञात व्यक्तीने काही कागदपत्रे चोरी केली आहेत. २००६ मधील फेब्रुवारी, मार्च आणि सप्टेंबर महिन्यात लागलेल्या निकालांशी संबंधित ही कागदपत्रे आहेत.

एम फोर्जच्या कामगारांचे बेमुदत उपोषण
पिंपरी, ६ एप्रिल/प्रतिनिधी

कामगार आयुक्त अरविंद कुमार यांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी व जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचा थकित पगार द्यावा, या मागण्यांसाठी एम फोर्ज कंपनीतील कामगार प्रतिनिधींनी आज (सोमवार) सकाळपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली सुरेश चाळके, प्रकाश ढवळे, आर.पी. काला, अशोक उत्तेकर, अशोक शिंदे व बाळासाहेब शेडगे हे पदाधिकारी सोमवारी सकाळी बेमुदत उपोषणास बसले आहेत, अशी माहिती भारतीय मजदूर संघाचे सचिव अर्जुन चव्हाण यांनी दिली. जानेवारी महिन्यात आर्थिक मंदीच्या झळा तीव्र झाल्याने व्यवस्थापनाने कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे सुमारे २५० कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

डॉ. छाया जाधव यांना मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार
वाडा, ६ एप्रिल/वार्ताहर

राजगुरुनगर येथील प्राध्यापिका डॉ. छाया जाधव यांना पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर झाला असून, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते पुणे येथे येत्या २७ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे. डॉ. छाया जाधव आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील बी. डी. काळे महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करताना सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कार्यरत आहे. ‘होय मी सावित्रीबाई बोलतेय’ या एकपात्री प्रयोगाचे लेखन करून सादरीकरण करत आहेत. ‘आदिवासी विकास योजना अभ्यास-मूल्यमापन’ या विषयावर पीएच.डी. केली आहे. पुणे आकाशवाणी केंद्रावर अनेक कार्यक्रमात सहभाग घेऊन सादरीकरण केले आहे. डॉ. जाधव यांचे विविध संस्था, शिक्षक, मित्र परिवाराने पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

पुरंदरमध्ये काँग्रेस स्वतंत्र यंत्रणा राबवून सुळेंचा प्रचार करणार
सासवड, ६ एप्रिल/वार्ताहर

बारामती लोकसभा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा काँग्रेस पक्षाचे वतीने स्वतंत्र यंत्रणा राबवून प्रचार करण्याचा निर्णय पुरंदर तालुका काँग्रेस मेळाव्यात घेण्यात आला असून, काँग्रेस आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवणार असल्याचे युवकनेते संजय जगताप यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. सासवड येथे राजेंद्र कॉम्प्लेक्स भवनात लोकसभेच्या प्रचारासंबंधीचा नियोजित मेळावा रविवारी दुपारी आयोजित करण्यात आला.