Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

चौल-आग्राव येथील कोळी समाजात तणाव
अलिबाग, ६ एप्रिल/प्रतिनिधी

 

कोळी समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या वेहेरगाव येथील एकवीरा देवीच्या पालखी आणि बकऱ्याचा परंपरेने मान, एकवीरा देवीचे माहेर असणाऱ्या अलिबाग तालुक्यातील चौल-आग्राव येथील कोळी समाजाचा असताना, गेल्या २ एप्रिल रोजी पालखीच्या वेळी एकवीरा देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी चौल आग्रावकरांना मज्जाव करून अरेरावीने दमदाटी करून वाद निर्माण केल्याने, कोळी समाजात तणाव निर्माण झाला आहे. राज्य शासनाने या प्रसंगाची माहिती घेऊन शेकडो वर्षांची ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून व पालखी उत्सव शांततेने पार पाडावा यासाठी या बाबतीत चौल आग्राव कोळी समाजाला न्याय द्यावा आणि यापुढे असे वाद होऊ नयेत यासाठी श्री एकवीरा देवी देवस्थान ट्रस्टवर चौल-आग्राव येथील कोळी समाजाचेही प्रतिनिधी नियुक्त करावेत, अशी तक्रार एका निवेदनाद्वारे, चौल-आग्राव कोळी समाजाचे प्रतिनिधी दत्ताराम लोदीखान, विश्वनाथ डोयले, यशवंत धरणकर, कमळाकर शाहीर, तुळशीदास ठेबरी यांनी आज रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून राज्य शासनास केली आहे. एकवीरा गडावरील श्री एकवीरा देवीच्या चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी शिळेवरील बकऱ्याचा मान चौल-आग्राव येथील कोळी बांधव पिढय़ान्पिढय़ा शेकडो वर्षे देत आले आहोत़ चैत्र शुद्ध सप्तमीच्या दिवशी एकवीरा देवीच्या पालखीचा मानसुद्धा वंशपरंपरेने चौल आग्राव कोळीवाडा ग्रामस्थांचा आह़े चौल आग्राव हे श्री एकवीरा देवीचे माहेर असून, तसा उल्लेख प्राचीन धर्म ग्रंथामध्ये असून आज ही भवानी माता (भगवती चौल), हिंगळुजा देवी (चौल भोवाळे), काळ भरव (चौल बेलाई) ही देवस्थाने इतिहासाची साक्षीदार आहेत़ चौल आग्राव येथील कोळी समाजाकडे श्री एकवीरा देवीची चंदनाची पालखी उपलब्ध असून, पालखीवर तसा कोरीव उल्लेखसुद्धा आह़े याच पालखीत देवीचा सुवर्ण मुकुट स्थापित करून चैत्र शुद्ध सप्तमीच्या दिवशी सायंकाळी एकवीरा गडावर पालखी उत्सव साजरा केला जातो़ शेकडो वर्षांच्या परंपरेचा हा उत्सव असून चौल आग्राव कोळी समाजबांधव ही परंपरा जपत आला आह़े चैत्र शुद्ध अष्टमीचे शिळेवरील बकऱ्याचा मान आग्राव व पेण वाशीकर यांना १६ एप्रिल १९२९ पासून मामलेदार मावळ यांच्या सही-शिक्क्याने सामाईक करून दिला असून, या पुराव्याच्या प्रतिदेखील निवेदनासोबत जोडण्यात आल्या आहेत.