Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयामुळे काँग्रेसला फायदा - राधाकृष्ण विखे
औरंगाबाद, ७ एप्रिल/खास प्रतिनिधी

 

केंद्र आणि राज्य सरकार यांनी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होईल, असा विश्वास औरंगाबादचे संपर्कमंत्री आणि राज्याचे शालेयमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला.
जिल्ह्य़ातील सर्व ग्रामीण काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक श्री. विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत ते बोलत होते. औरंगाबादमध्ये काँग्रेस पक्षाला अनुकूल वातावरण आहे. काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचे काम पक्षाने माझ्यावर सोपविले आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसचाच उमेदवार निवडून येईल, असा दावाही श्री. विखे पाटील यांनी केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिस्त आणि सूचना पाळाव्यात असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश मुगदिया, सचिव अरुण मुगदिया, माजी मंत्री अनिल पटेल, माजी मंत्री नामदेव गाडेकर, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, काँग्रेसचे उमेदवार उत्तमसिंह पवार आणि आमदार राजेंद्र दर्डा उपस्थित होते. रोजगार देणारे शहर म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे. आता ही ओळख कुठे तरी हरविली आहे. ती परत मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे श्री. उत्तमसिंह पवार म्हणाले. बंद पडलेल्या कारखान्यांना नवीसंजीवनी देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.