Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आवळेंची उमेदवारी लातूरकरांनी स्वीकारली - दिलीपराव
लातूर, ७ एप्रिल/वार्ताहर

 

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपब्लिकन पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार जयवंतराव आवळे यांची उमेदवारी लातूरकरांनी स्वीकारलेली आहे. हे त्यांना जिल्ह्य़ात मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून दिसून येत असल्याचा दावा क्रीडामंत्री दिलीपराव देशमुख यांनी केला.
एसएमआर स्विमिंग पूल येथे शहरातील उद्योजक, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, व्यापारी यांच्यातर्फे आयोजित सुसंवाद कार्यक्रमात श्री. देशमुख बोलत होते. ते म्हणाले की, आवळे यांनी नगरसेवक, २५ वर्षे आमदार व पाच वर्षे समाजकल्याणमंत्री म्हणून कारकीर्द गाजविली आहे. काँग्रेसने सक्षम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला आहे व मतदारांनी तो स्वीकारला असल्याचे दिसून येत आहे.
श्री. आवळे म्हणाले, ‘‘थापा मारून मते घेऊन तिकडेच जाणारा मी नाही. मी जनतेतील माणूस आहे.’’ कार्यक्रमास शिवशरणअप्पा चितकोटे, कांताप्रसाद राठी, कमल अग्रवाल, प्रकाश कासट, शैलेश लाहोटी, लक्ष्मीकांत कर्वा, डॉ. एस. एन. जटाळ, डॉ. हंसराज बाहेती, ललितभाई शहा, रमेश राठी, श्यामसुंदर भार्गव, वळसंगेअप्पा, सुनील कोचेटा, डॉ. दीपक गुगळे आदी उपस्थित होते.