Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

निवडणूक निरीक्षकांकडे समस्या मांडण्याचे आवाहन
प्रतिनिधी / नाशिक

लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नाशिक व दिंडोरी मतदारसंघात निवडणूक आयोगातर्फे निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणुकीसंदर्भातील अडचणी, तक्रार, गैरप्रकार मांडण्यासाठी किंवा इतर माहिती मिळविण्यासाठी

 

नागरिकांनी निवडणूक निरीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक पूर्व भागासाठी सुभाष राजन बिश्वास (०९४३३६०४७०४, ९४०३६९७२७१, ०२५३-२५८२५०६) यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून आर. पी. मराठे (०२५३-२३८३२०२/ ९८६७८५९९९५) हे काम पाहणार आहेत. नाशिक पश्चिम भाग व देवळाली परिसरासाठी सय्यद अली मुरताझ रिझवी (०९७०१११०६१६, ९४०३६९७२७२, ०२५३-२५८२५०८), संपर्क अधिकारी जे. टी. राजपूत (०२५३-२३८३२०२/ ९२२५११२६९०), सिन्नर, इगतपुरी विभागासाठी पी. रवींद्रबाबु (०९९८६००६९२५, ९४०३६९७२७३/ ०२५३- २५८२५०५), संपर्क अधिकारी शरद जरे (०२५३-२५९१५५५,२३१३५३१, ९९२२९५१५०५) हे काम पाहणार आहेत. दिंडोरी मतदारसंघासाठी येवला आणि निफाड विभागात डी. उथीरकुमारन (०९४४४३८०४८७, ९४०३६९७२७४, ०२५३-२५८२५०४), संपर्क अधिकारी आर. एस. दराडे (०२५३-२५०३२२२, ९८९०१३२१०७), नांदगाव व चांदवड विभागासाठी के. सी. जेना यांची नेमणूक झाली असून ०९४३०४६६४२९, ९४०३६९७२७५, ०२५३-२५८२५०३ या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा. दीपक चौधरी - ०२५३-२५९८५६०, ९४२००००३४७ हे संपर्क अधिकारी आहेत. कळवण, दिंडोरीसाठी संध्या शर्मा यांची नेमणूक झाली असून त्यांच्याशी ९४०३६९७२७६, ०२५३-२५८२५०७ या क्रमांकावर संपर्क साधावा. अलका वाघ ०२५३-२३१९३९५, ९४२२४५८७६३ संपर्क अधिकारी आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी पी. वेलरासु यांनी दिली.