Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राजलक्ष्मी बँकेस ८१ लाखांचा नफा
नाशिक / प्रतिनिधी

येथील राजलक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेस २००८-०९ या आर्थिक वर्षांत ८१ लाखांचा ढोबळ नफा झाला असून तो रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियमानुसार ४७.२१ लाख रुपये इतका निव्वळ

 

नफा आहे, अशी माहिती उपाध्यक्ष परमानंद गुजराथी यांनी येथे पत्रकाव्दारे दिली.
बँकेचे सभासद संख्या ६,७९४ वर पोहचली असून अधिकृत भागभांडवल व स्वनिधी तीन कोटी ५३ लाख आहे. बँकेच्या ठेवी ३६ कोटी एक लाख असून त्यात मागील वर्षांचे तुलनेत २० टक्के वाढ झालेली आहे.
बँकेने २३ कोटी तीन लाखाचे कर्जवाटप केले आहे. एकूण गुंतवणूक १३ कोटी ५० लाख केलेली आहे.
उत्कृष्ट वसुली करून एन. पी. ए. चे प्रमाण ३.०८ टक्के राखण्यात यश मिळविले आहे.
त्यामुळे बँकेच्या प्रगतीत लक्षणीय वाढ झालेली आहे, असेही गुजराथी यांनी सांगितले.
बँकेने ग्राहक सेवेच्या दृष्टीने यावर्षी सर्व शाखांमार्फत दूरध्वनी व वीज बील भरणा केंद्र सुरू केलेली आहेत.
पुढील आर्थिक वर्षांकरिता बँकेचे ५० कोटींइतके ठेवींचे लक्ष्य असून सी. डी. रेशो ७० टक्के व एन. पी. ए. प्रमाण शून्य टक्के राखण्याचा बँकेचा मानस आहे, असे कार्यकारी संचालक बाळासाहेब मगर यांनी सांगितले.