Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
विशेष

निरुत्तर करणारे (राजकीय) प्रश्न!
राजकारणाबद्दल आपल्या सगळय़ांच्या मनात नकारार्थी भावना का निर्माण झाली आहे. राजकारण करणाऱ्या सगळय़ा नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ते एक अतिशय विधायक कार्य वाटतं आणि राजकारण दुरून पाहणाऱ्या सगळय़ांना त्याबद्दल एक प्रकारची घृणा का वाटते? स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकारण आणि आजचं राजकारण यामध्ये असा कोणता गुणात्मक बदल झाला की, आपल्या सगळय़ांना राजकारण हे कृष्णकृत्यांनी बरबटलेलं क्षेत्र वाटतं? मतदान न करणाऱ्या जवळजवळ पन्नास टक्के लोकांना राजकारण ही एक भंकस वाटत असते. त्यांच्या मते राजकारण करणं म्हणजे पैसे खाणं आणि अनैतिक कृत्यांमध्ये सहभागी होणं. प्रत्यक्षात राजकारण करणाऱ्या किती जणांना ‘असं काही’ करण्याची संधी मिळते, हे आपण लक्षात घेत नाही.

आधुनिक कुरुक्षेत्र
कोकणात सध्या उष्मा वाढत आहे आणि त्याचबरोबर हळूहळू लोकसभा निवडणुकीचे वातावरणही तापत आहे. देशातील मतदारसंघाच्या फेररचनेमुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे राजकीयदृष्टय़ा एक झाले आहेत आणि या नव्या राजकीय कॅनव्हासवर ‘डॅशिंग’ नारायण राणे यांनी आपल्या चिरंजीवांच्या रूपाने शिवसेनेचे विद्यमान खासदार सुरेश प्रभू यांच्यापुढे केवळ कडवे आव्हान नव्हे, तर पराभवाची छाया निर्माण केली आहे. एकापरीने राणेंचे राजकीय भवितव्य पणाला लागलेल्या या निवडणुकीकडे त्यामुळेच अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पूर्वीच्या अखंड रत्नागिरी जिल्ह्याचे १९८१ मध्ये विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्हा उदयाला आला. त्यामुळे सर्वच पातळ्यांवर या परिसराला उभा छेद गेला, पण देशातील लोकसभा-विधानसभा मतदारसंघांच्या फेररचनेमध्ये लोकसंख्या हा मुख्य निकष मानला गेल्यामुळे महसुली दृष्टीने स्वतंत्र असलेले हे दोन जिल्हे राजकीयदृष्टय़ा पुन्हा एक झाले आहेत.

‘काय तात्यानू, टाटांची नॅनो बघल्यात की नाय?’
‘बाबल्या, माका म्हाताऱ्याक काय करुची आसा नॅनो’
‘तसा नाय हो, बघणाऱ्यांत काय सगळ्यांनच गाडी घेवची असा नाय. बघुक काय पैसे पडतत? आपला सध्याच्या भाषेत बोलूचा म्हणजे नॅनोचा ‘विंडो शॉपिंग’ केल्यात की नाय?’
‘मी बाबा ‘विंडो’ नाय पण ‘टी. व्ही. शॉपिंग’ केली. म्हणजे टी. व्ही.र नॅनो बघली.’
‘तात्यानू, तुमका नवीन गोष्टीचा काय आकर्षनच नाय, अहो बघा तरी काय झकास गाडी आसा’
‘तू काय घेतलस की काय?’
‘होय तर बुकिंगसाठी पैशे पण भरल्यानी’
‘नॅनो घेवन् तू करतल काय? ती ठेवतलय खय? आणि तेच्यात काय मुतलय? तेका पेट्रोल नको घालूक?’
‘तात्यानू, ह्याच तुमचा चुकता. नॅनो घेवचेसाठी मीया कर्ज घेतलंय. आमच्या चाळीतल्या व्हरांडय़ात तिका ठेवतलय आणि पेट्रोलच्या एवजी मी टाकीत मुतूचय नाय, झकपैकी पेट्रोलपंपार जावन पेट्रोल भरतलय. तुमका काय वाटला माका काय ह्या परवडूचा नाय काय?’
‘बाबल्या, नॅनो बुक केल्यापासून तू टाटा, बिर्ला झाल्यासारखोच वावरतसय’
‘या बघा तात्यानू, या आयुष्यात कर्ज काढल्याशिवाय खयचीच गोष्ट घेवक् येवची नाय. तुमी कर्ज काढूचा डेअरिंग आयुष्यात कधी केल्यात काय?’
‘नायरे बाबा, आमका गिरणीत पगारच एवढो कमी होतो, की आमका वाण्याचा बिल दिण्यासाठी पठाणाकडसून कर्ज घेवचा लागी. घर, गाडी-घोडो घेवक कर्ज घेणा ही लांबचीच गोष्ट होती.’
‘तात्यानू, आता काळ बदललोसा, सगळ्यो गोष्टी हल्ली कर्जार मिळतत. अगदी मोबायलसुद्धा घेवक कर्ज मॅळता.’
‘अरे मेल्या, म्हणजे कर्जाचो फास तुमच्याभोवती पडतासा.’
‘पण तात्यानू, कर्ज घेतल्याशिवाय आपण ह्यो सगळ्यो गोष्टी घेवक शकणोव नाय.’
‘पण ह्यो सगळ्यो गोष्टी ह्योयोच कित्याक, हांथरुण बघून पाय पसर. कर्जाचो बोजो घेवचोच कित्याक डोक्यार आणि ही कर्ज फेडता-फेडता सगळा आयुष्य संपता.’
‘तात्यानू, तुमी आता जुन्या पिढीतले झाल्यात. तुमका ह्या पटूचा नाय आणि समजूचाय नाय.’
‘मुंबयत नॅनो रस्त्यार आयल्यार कितकी गर्दी जायत तोचो अदोगर इचार कर.’
‘तात्यानू, तुमी नेहमीच असो निगेटिव्ह इचार करतास. यामुळे देशाची प्रगती जाणा नाय.’
‘देशाच्या प्रगतीचो आणि तु कर्जार नॅनो घेण्याचो संबंध काय?’
‘तात्यानू, तुमी सतत खरेदी करुक होई. कारण तुमच्या खरेदीवरच देशाची अर्थव्यवस्था वेग घेता.’
‘अरे पण मेल्या. खरेदी करण्यासाठी तू कर्ज काढतय आणि गोत्यात जातय तेचा काय? त्या एद्या मोठय़ा अमेरिकेत बघलय ना कर्जान धुमाकूळ घातल्यार काय स्थिती झालीसा ती.’
‘तात्यानू, अमेरिकेचा सोडून द्या हो. कर्ज काढण्याची ही तरुणांची भाषा तुमका समजूची नाय. तेचेसाठी तुमका पुढच्या जन्मी पुन्हा मनुष्याचोच जन्म घेवचो लागात.’
‘नुसतो मनुष्याचोच नाय, कर्ज काढणाऱ्या मनुष्याचो..’
प्रसाद केरकर
Prasadkerkar73@gmail.com