Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
राज्य

दुर्मिळ चित्रसंग्रहाला मिळणार अखेर हिरावलेले घर!
देवरुख चित्रविक्री प्रकरण
सचिन पटवर्धन
देवरुख, ७ एप्रिल

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे पर्यायाने देवरुखचे सांस्कृतिक वैभव असणारा अत्यंत दुर्मिळ चित्रसंग्रह सभासदांच्या एकजुटीच्या अथक लढय़ामुळे अखेर परतणार आहे. तसे आज पत्रकार परिषदेद्वारे स्पष्ट करण्यात आले. संस्थेच्या गतवैभवाला मिळणारी झळाळी, अक्षम्य अन् बेजबाबदार कार्यपद्धतीला बसलेला लगाम या दोन्हींसाठी चित्रांचे परतणे जितके महत्त्वपूर्ण तितकेच बहुमानाचे आहे.

फ्रेंडशिप क्लबच्या नावाखाली तरुणाला गंडा; टोळीचा शोध
सोलापूर, ७ एप्रिल/प्रतिनिधी

स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन नोकरी मिळवून देण्याचे तसेच फ्रेंडशिप क्लबचे सदस्य करण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला आर्थिक गंडा घालणाऱ्या चौकडीचा शोध सोलापूर शहर पोलिसांनी लावला असून, त्यापैकी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
जगदेव हणमंत हेगडे (वय २४, रा. हिळ्ळी, ता. अक्कलकोट) व मथुरा ऊर्फ वनिता शहाजी जाधव (वय २७, रा. आंबेगाव, जि. पुणे) अशी या गुन्हय़ात अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

नागरी सुविधांचा अभाव
पुनर्वसनग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार

कारंजा (घाडगे), ७ एप्रिल / वार्ताहर

येथील खैरी पुनर्वसनमधील नागरी सोईसुविधा पूर्ण करण्यास लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याच्या निषेधार्थ येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकून मतदान न करण्याचा निर्णय खैरी पुनर्वसनमधील नागरिकांनी घेतला आहे. कारंजा येथून १३ किलोमीटरवर असलेल्या कार नदी प्रकल्पामुळे ९ वर्षांपूर्वी धरणातील बुडीत क्षेत्रामुळे खैरीवासीयांचे पुनर्वसन कारंजा शहरालगत करण्यात आले.

वरूडजवळ विचित्र अपघात
मिनी ट्रक उलटून पाच ठार, चार जखमी
वरूड, ७ एप्रिल / वार्ताहर
वरूड-नागपूर मार्गावर दादाजी धुनीवाले मठाजवळ सोमवारी रात्री झालेल्या विचित्र अपघातात पाच ठार, चार जखमी झाले. या घटनेने वरूड तालुक्यात शोककळा पसरली आहे. वरूडवरून रात्री १० वाजता चांदस वाठोडा येथे जाणारी टाटा सुमो झाडावर आदळली. त्यात चालक भूषण कनाटे हा किरकोळ जखमी झाला. त्याने अपघाताची सूचना वरूड पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी भूषणला वरूडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ही घटना भूषणच्या मित्रांना कळल्याने त्यांनी भूषणची विचारपूस करीत घटनास्थळ गाठले.

अमरिश पटेल यांच्या अर्जावर आज निकाल
शांतीगिरी महाराजांचा अर्ज वैध

नाशिक, ७ एप्रिल / प्रतिनिधी

धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार अमरिशभाई पटेल यांनी प्रतिज्ञापत्रात दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याची तक्रार विरोधी उमेदवाराने केल्यामुळे राखून ठेवण्यात आलेल्या त्यांच्या अर्जावर बुधवारी निर्णय जाहीर केला जाणार आहे. पटेल यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती सत्य असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदार यादीत नाव असल्याचे प्रमाणपत्र सादर मंगळवारी दुपापर्यंत सादर केल्याने शांतीगिरी महाराजांचा अर्ज वैध ठरविण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक
अंतिम चित्र आज स्पष्ट होणार
रत्नागिरी, ७ एप्रिल/खास प्रतिनिधी

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उद्या (बुधवार) अखेरचा दिवस असून संध्याकाळी या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव डॉ. नीलेश आणि विद्यमान खासदार सुरेश प्रभू यांच्यातील लढतीमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. या दोन प्रमुख उमेदवारांखेरीज डॉ. जयेन्द्र परुळेकर (बसपा), विलास खानविलकर (हिंदू महासभा), राजेश सुर्वे (राष्ट्रीय समाज पक्ष), अजय जाधव (क्रांतिकारी जयहिंद सेना), सुरेन्द्र बोरकर (तिसरी आघाडी), सिराज कौचाली (भारिप- आंबेडकर गट) आणि कॅप्टन अकबर खलिफे यांच्यासह नऊ जणांचे अर्ज छाननीमध्ये वैध ठरले आहेत. त्यापैकी कॅप्टन खलिफे काँग्रेसचे बंडखोर असून आपल्यावर अन्याय झाल्याची त्यांची भावना आहे. बसपातर्फे निवडणूक लढवित असलेले डॉ. परुळेकर राजकारणात नवखे आहेत, पण कोकणातील पर्यावरण रक्षणाचा मुद्दा आणि बसपाची आकर्षणक्षमता यामुळे आपण या निवडणुकीत प्रभावी ठरू, असा त्यांचा दावा आहे. अन्य उमेदवारांपैकी कितीजण निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम राहतात, हे उद्या दुपारी तीन वाजता स्पष्ट होणार आहे.