Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
क्रीडा

गर्जा जयजयकार ‘क्रांती’चा

वेलिंग्टन, ७ एप्रिल / पीटीआय

अपेक्षेप्रमाणे आलेल्या पावसामुळे न्यूझीलंडमध्ये २-० फरकाने मालिका जिंकण्याच्या आणि भारताच्या क्रिकेट इतिहासातील १००वा कसोटी विजय मिळविण्याच्या ‘टीम इंडिया’च्या स्वप्नावर पाणी फेरले गेले. पण हॅमिल्टनची पहिली कसोटी जिंकून घेतलेल्या १-० आघाडीच्या जोरावर तब्बल ४१ वर्षांनी न्यूझीलंडच्या मातीत कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास धोनीच्या भारतीय संघाने घडविला. १९६८मध्ये मन्सूर अली खान पतौडी यांच्या भारतीय संघाने ३-१ असा विजय साकारला होता, तशीच क्रांती धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये घडविली. अखेरच्या कसोटीत विजय हुकल्याची चुटपूट मात्र क्रिकेटरसिकांना लागून राहिली. अखेरच्या दिवशी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता आणि ती शक्यता अखेर खरी ठरली.

भारताने आम्हाला पूर्णपणे निष्प्रभ केले - व्हेटोरी
वेलिंग्टन, ७ एप्रिल / पीटीआय

तब्बल ४१ वर्षांनी किवीच्या भूमीवर कसोटी मालिकाजिंकत इतिहास रचणाऱ्या धोनीच्या शिलेदारांवर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षांव होत आहे. त्यात यजमान संघाचा डॅनिअल व्हेटोरीही आघाडीवर आहे. भारतीय खेळाडूंनी आम्हाला निष्प्रभ केले, अशा शब्दात व्हेटोरीने भारतीय क्रिकेट संघाची स्तुती केली. तो म्हणाला, ‘‘तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने शेवटपर्यंत निर्विवाद वर्चस्व राखले. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सर्वात प्रतिस्पध्र्याचाच बोलबाला होता.

पावसाने घात केला; वेळ अपुरा पडला नाही - धोनी
वेलिंग्टन, ७ एप्रिल/वृत्तसंस्था

न्यूझीलंडचा दुसरा डाव गुंडाळण्यासाठी ११० ते १२० षटके पुरेशी होती. त्यामुळे पावसाच्या व्यत्ययाचा अंदाज वर्तविण्यात आल्यानंतर आमच्या पूर्वनियोजित योजनेत बदल करण्याची गरज नव्हती असे भारताच्या कप्तान महेंद्रसिंग धोनीने तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. कसोटी अनिर्णित राहिल्याचे खापर धोनीवर फोडताना प्रसिद्धी माध्यमांनी डाव उशिरा सोडला. असा आरोप केला होता.

‘टीम इंडिया’तील प्रत्येकाला १५ लाखांचा बोनस
नवी दिल्ली, ७ एप्रिल / पीटीआय

न्यूझीलंडमध्ये तब्बल ४१ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकणाऱ्या तसेच त्याआधी, एकदिवसीय सामन्यांची मालिका खिशात घालणाऱ्या भारतीय संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट बोर्डाने संघातील प्रत्येक खेळाडूला १५ लाख रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही ३-१ असा विजय मिळवून न्यूझीलंडमधील पहिलावहिला मालिका विजय नोंदविला होता. भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी ही घोषणा करताना संघाच्या सपोर्ट स्टाफला प्रत्येकी १० लाख देण्यात येतील, असेही जाहीर केले.

१९ वर्षांखालील क्रिकेट:कॅप्टन्स नॉक
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या विजयात कर्णधार मनेरिया चमकला

मेलबर्न, ७ एप्रिल/ पीटीआय

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या १९ वर्षांखालील भारतीय संघाने पहिल्याच एकदिवसीय सामन्यात सात विकेट्सने विजय मिळविला तो कर्णधार अशोक मनेरियाच्या नाबाद ६३ धावांच्या अफलातून खेळीमुळे. मनेरीयाच्या अर्धशतकी खेळीमुळेच भारतीय संघाला पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला सामना जिंकणे शक्य झाले आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना ४८ षटकांमध्ये १६८ धावाच करता आल्या.

आशियाई बिलीयर्ड्स व स्नूकर स्पर्धा पुण्यात ११ एप्रिलपासून
पुणे, ७ एप्रिल/प्रतिनिधी

महाराष्ट्र बिलीयर्ड्स व स्नूकर संघटनेने आयोजित केलेली आशियायी वरिष्ठ गट बिलीयर्ड्स अजिंक्यपद व २१ वर्षांखालील गटाची आशियाई स्नूकर स्पर्धा येथे ११ ते १९ एप्रिल या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेचे रेवाळे उद्योग समूह मुख्य प्रायोजक असून ऑईल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन हे सहप्रायोजक आहेत, असे रेवाळे उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. के. मित्रा व संयोजन समितीचे उपाध्यक्ष राजन खिंवसरा यांनी सांगितले.

ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर
ओरम, स्टायरीसचे संघात पुनरागमन
वेलिंगटन, ७ मार्च/ पीटीआय
दुखापतीने भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेला मुकलेल्या अष्टपैलू जेकब ओरम आणि फॉर्मात नसलेल्या स्कॉट स्टयरीस यांची आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंडच्या संघात निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ब्रेन्डन दिआमन्ती या नवोदित खेळाडूलाही पंधरा जणांच्या अंतिम संघात स्थान देण्यात आले आहे. तर अष्टपैलू गॅ्रन्ट एलियट आणि वेगवान गोलंदाज टीम साऊथी यांना या संघातून वगळण्यात आलेले आहे. दिआमन्तीची स्थानिक सामन्यांमधील कामगिरी पाहून त्याला ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंडच्या संघात घेण्यात आले आहे.

ऑलिम्पिक सुवर्ण शोध मोहिमेतून कोलते, गौडा, गुरू साई दत्त यांना मदतीचा हात
मुंबई, ७ एप्रिल/क्री.प्र.

महान क्रीडापटू प्रकाश पदूकोन आणि गीत सेठी संचलित क्रीडा फाऊंडेशनच्या ‘ऑलिम्पिक सुवर्ण शोध’ मोहिमेच्या माध्यमातून फ्लायवेट बॉक्सर संजय कोलते, विकास गौडा (गोळाफेक) आणि गुरू साई दत्त (बॅडमिंटन) यांना मदत करण्याचे ठरविले आहे. माजी राष्ट्रीय विजेता टेबल टेनिसपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेता नीरज बजाज हादेखील या फाऊंडेशनच्या संचालक मंडळावर आला असून तोदेखील पी.टी. उषाच्या केरळमधील शाळेतील १६ प्रशिक्षणार्थी मुलींना मदत करतो आहे. या तीन महान खेळाडूंनी मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

इंग्लंडपुढे अ‍ॅशेस मालिका जिंकण्याचे आव्हान!
अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ, केविन पीटरसन यांच्यावर इंग्लंडची भिस्त
लंडन, ७ एप्रिल/पीटीआय

ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूंकडून स्फूर्ती घेत इंग्लंडचा पुरुष संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अ‍ॅशेस मालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्लेन मॅकग्रा व शेन वॉर्न यांच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ काहीसा कमकुवत वाटत होता. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियन मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. तथापि, ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेत जाऊन या पराभवाची परतफेड केली. या विजयामुळे पुन्हा ऑस्ट्रेलियाची बाजू बळकट झाली आहे.इंग्लंडने २००५ मध्ये स्वत:च्या मायभूमीत ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली होती. नऊ मालिकांनंतर प्रथमच त्यांनी हा विजय नोंदविला होता. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व रिकी पॉन्टिंग करणार आहे. अतिशय यशस्वी कर्णधार म्हणून त्याची ख्याती आहे. या संघातील फिलीप हय़ूजेस याच्यासह अनेक खेळाडू इंग्लंडच्या खेळाडूंना अपरिचित आहेत. इंग्लंडची मदार प्रामुख्याने ग्रॅमी स्वान व मॉन्टी पानेसर या फिरकी गोलंदाजांवर आहे. फिरकी गोलंदाजांबाबत ऑस्ट्रेलियापेक्षा इंग्लंडची बाजू वरचढ मानली जात आहे. अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ, केविन पीटरसन यांच्यावरही त्यांच्या गोलंदाजीची भिस्त आहे.

मलेशियाविरूद्धच्या सामन्यात भारतासाठी ‘करो या मरो’
इपोह, ७ एप्रिल/ पीटीआय
येथील अझलन शाह हॉकी स्पर्धेतील नवोदित इजिप्तविरूद्धचा पहिलाच सामना आनिर्णीत राखल्याने उद्या यजमान मलेशियाम्विरूद्ध होणाऱ्या दुसऱ्या साखळी सामन्यात भारतापुढे ‘करो या मरो’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताविरूद्धचा पहिला सामना इजिप्तला २-२ असा अनिर्णीत राखण्यात यश मिळाले होते. प्रतिस्पर्धी मलेशियाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर ३-२ तर दुसऱ्या सामन्यात इजिप्तवर ४-१ असा विजय संपादन केल्याने अंतिम फेरीतील स्थान त्यांनी निश्चीत केले आहे. या स्पर्धेत जर भारताला टिकून राहायचे असेल तर उद्याचा सामना जिंकणे त्यांना अनिवार्य असेल. कारण न्यूझीलंडचा सामना नवोदित इजिप्तशी उद्या होणार असून हा सामना त्यांनी जिंकल्यास भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. हा सामना अनिर्णीत राखला तरी भारताला कोणताच फायदा होणार नसून हा सामना त्यांना जिंकावाच लागेल. यावेळी भारताचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग म्हणाले की, उद्याच्या सामन्यातील विजय हा अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. मलेशियाविरूद्ध आम्ही या पूर्वीही खेळलेलो असल्याने त्यांच्या संघाबद्दल आम्हाला पुरेशी माहिती आहे. उद्याच्या सामन्यात आक्रमण करण्याावरच आमचा अधिकाधिक भर असेल त्याचबरोबर गेल्या सामन्यांतील चुकांची पुनरावृती कशी टाळता येईल यावरही आमचे लक्ष असेल.

चेतन आनंद, पी.कश्यप यांचे आव्हान संपुष्टात
जोहर बोरु, ७ एप्रिल/ पीटीआय
भारताच्या चेतन आनंद, पी.कश्यप, थॉमस कुरियन यांना आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत आज पराभव पत्करावा लागला. मलेशियाच्या ली चोंग वेई याने सरळ लढतीत आनंदवर २१-१४, २१-१४ अशी मात केली. त्याने ड्रॉप शॉट्स व रॅलीजचा कल्पकतेने उपयोग केला. आनंदने दुसऱ्या फेरीत माकरेस विजाना (इंडोनेशिया) याला पराभूत केले होते. इंडोनेशियाच्या सिमोन सान्तोसो याने थॉमस कुरियन याच्यावर २१-१६, २१-१४ अशी मात केली. पी.कश्यप यालाही पराभवाचा धक्का बसला. कोरियाच्या जुंग युआंग याने त्याला १८-२१, २१-१५, २१-१२ असे पराभूत केले. चीनच्या चेन युई या अव्वल मानांकित खेळाडूने चौथ्या फेरीकडे वाटचाल केली. त्याने मलेशियाच्या सैरुल अमीर आयूब याचा २१-१५, २१-९ असा सहज पराभव केला.

सानियाचे आव्हान सलामीलाच संपुष्टात
फ्लोरिडा, ७ एप्रिल / पीटीआय

भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाला येथे सुरू असलेल्या एमपीएस ग्रुप टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाची चव चाखावी लागली. अॅलोना बोन्डारेन्कोने तिला सरळ सेटमध्ये पराभूत केले.युक्रेनच्या बोन्डारेन्कोने ही लढत ६-४, ६-३ अशी जिंकली.