Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९

‘व्होट फॉर चेंज, यूथ फॉर चेंज’ या निवडणूकविषयक मालिकेतील हे पाचवे पोस्टर.
संकल्पना व चित्र : गीता चव्हाण

दिल से..
प्रिय सावनी,

यार इटस शॉकिंग, तू आईला घरी सापडतेयस. बाय द वे काकू कशा आहेत? मी बरेच दिवस त्यांच्याशी बोललो नाही आणि आता माझी हिम्मत पण होत नाहीये त्यांना फोन करायची, नाहीतर फोनवरच ओरडा खावा लागेल. मी त्यांना विचारलंय सांग आठवणीने. अरे तू मला मागच्या पत्रात नॅनोविषयी विचारलं होतंस. नॅनो ही सामान्यांची कार होईल का? हो होईल. पण कार कशासाठी घ्यायची? फक्त एक चार चाकी गोष्ट आपल्याही दारात उभी आहे, याची टिमकी मिरविण्यासाठी की खरंच त्याची गरज आहे म्हणून? नॅनोचं लॉचिंग होताच मागच्या शुक्रवारी अनेकांनी संपूर्ण रक्कम भरून ती बुक केली आणि त्यानंतर त्यांनी मीडियाला दिलेल्या रिअक्शन्स भन्नाट होत्या.

स्टार्टअप टुडे!
तुम्हाला स्वत:चा व्यवसाय किंवा तत्सम काही सुरू करायचंय का? आणि तेही स्वत:च्या हिमतीवर? पण सुरुवात कुठून आणि कशी करायची इथेच जर तुमची गाडी भटकली असेल तर ‘हेडस्टार्ट स्वयंसेवक संस्था तुमच्या गाडीची गुरुकिल्ली बनू शकते. उदयोन्मुख आणि साहसी काम करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी युवकांनीच ‘स्टार्टअप सॅटर्डे’ ही संस्था सुरू केली आहे.
मुंबईसह दिल्ली, कोलकाता, बंगळुरू येथे या संस्थेच्या शाखा आहेत. मुंबईतील स्टार्टअप सॅटर्डेचं वेगळेपण म्हणजे हे शहर औद्योगिकदृष्टय़ा वैविध्यपूर्ण आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आहेत. त्यामुळे एकाच व्यवसायावर भर न देता इतर उद्योगांसंबंधीही येथे माहिती मिळते.

राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिले मतदानाचे पाठ
मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे, ती आपली डय़ुटी आहे, अशा शब्दांत तरुणांना मतदानाचं महत्त्व पटवून देण्यापेक्षा 'Vote its Cool' असा संदेश ‘रंग दे बसंती’ आणि ‘दिल्ली ६’ चे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी तरुणांना दिला. स्पायकर जीन्स या भारतातल्या अग्रगण्य ब्रॅण्डने जागो रे! वन बिलियन व्होट्स आणि असोसिएशन्स फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (ADR) च्या सहकार्याने सुरू केलेल्याI will VOTE या कॅम्पेनच्या लाँचच्या वेळी ते बोलत होते. यावेळी एडीआरचे अजित रानडे, जागो रे! वन बिलियन व्होट्स कॅम्पेनचे प्रशांत ननावरे व स्पायकरचे डायरेक्टर संजय वखारिया हेही उपस्थित होते.

थंडाई..
डोक्यावर तळपता सूर्य, अंगातून निथळणाऱ्या घामाच्या धारा आणि तहानेने व्याकुळलेला चेहरा. मे महिना सुरू होण्याआधीच आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळते. अशा वेळी डोळ्यासमोर तरळतात ते वेगवेगळ्या प्रकारची आणि फ्लेवरची आईस्क्रीम आणि शीतपेय, जी काही क्षणांसाठी का होईना शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. आंब्याच्या रसापासून ते अननसाच्या रसापर्यंत, कोल्ड कॉफीपासून ते कॉकटेलपर्यंत अशा अनेक पदार्थाचा आस्वाद लुटण्यासाठी सगळेच उत्सुक असतात पण जर तुम्हाला हा आनंद घरी बसूनही लुटता आला तर फक्त स्वत:साठीच नाही तर तुमच्या साऱ्या परिवारासाठी ही एक पर्वणीच ठरू शकेल.

इंटर्नशिपस्चा सीझन
मित्रांनो, इटस् समर टाइम! कॉलेजच्या परीक्षा संपल्या आणि आता दोन महिने सुटी! परीक्षेच्या त्या तणावानंतर आता आरामच आराम! उशिरापर्यंत झोपायचे, टी. व्ही. बघायचा, खायचे, आणि परत झोपून जायचे. असाच असतो आमचा दिनक्रम. मित्र-मैत्रिणींना भेटायचे, सिनेमा पाहायला जायचे आणि धम्माल करायची. मात्र असेही काही युवक असतात की, जे या सुटीचा पुरेपूर फायदा करून घेतात. कुठल्या तरी हॉबी क्लासला जातात किंवा कुठे तरी काम करताता अनेकजण या सुटीत इंटर्नशिप करतात. अशा प्रकारे इंटर्नशिप करण्यातही एक वेगळीच मजा असते. आपल्याला पुढे आपल्या करिअरमध्ये काय करायचे असते यावर आपली इंटर्नशिप अवलंबून असते. इंटर्नशिप केल्याने त्या क्षेत्रातील बरीच माहिती आपल्याला मिळते आणि अनुभवही मिळतो. या इंटर्नशिप्सद्वारे आपल्याला खूप काही शिकायला मिळते, तर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात इंटर्नशिप करायची असेल तर कुठून सुरुवात करावी ही सगळी माहिती आम्ही खास कॅम्पस मूडच्या वाचकांसाठी आणत आहोत.

कॅम्पसवर ‘फ्रेम्स’ अनेक असतात, पण त्या ‘क्लिक’ करणं फार थोडय़ांना जमतं. आपमे हैं वह बात? तर मग उचला कॅमेरा आणि तुम्ही काढलेले फोटोज् campusmood@gmail.com वर पाठवा. अट एकच. फोटो कॉलेजशी, कॉलेज जीवनातील ‘हट के प्रसंगांशी आणि एकंदरीतच ‘कॅम्पसच्या मूड’शी मॅच होणारे हवेत. सवरेत्कृष्ट फोटोला ‘कॅम्पस मूड’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. आणि हो! फोटोला शीर्षक तसेच फोटोबरोबर तुमचे नाव, कॉलेज व फोन नंबर पाठवण्यास विसरू नका.