Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९

औरंगाबाद येथील ‘स्वयंसिद्धा’ या संस्थेतर्फे चालविण्यात येत असलेल्या ‘विवेक सिंग स्कूल फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रेन’च्या विस्तारीकरणासाठी किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात ‘समरसिया’ हा उस्ताद रशीद खान आणि पाश्र्वगायक शंकर महादेवन यांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गीतकार जावेद अख्तर, अभिनेता अभिषेक बच्चन, अभिनेत्री असीन यांच्यासह वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त हरीश बैजल. या शाळेशी संबंधित असणारे बैजल आणि अनिल इरावणे यांच्या प्रयत्नाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संस्थेतर्फे कर्करोगाने पिडीत असलेल्या मयुरी भिवंडकर यांना ५० हजार रुपयांची तर १२२ अनाथ मुलींचे पालकत्व स्वीकारलेल्या शंकरराव पापडकर यांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदतही या कार्यक्रमात करण्यात आली.

‘मुंबई आणि महाराष्ट्राची बाजू लोकसभेत मांडेन’
गेली ३७ वर्षे मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय आहे. भूमिपूत्रांना रोजगार मिळावा यासाठी मी यापूर्वी लढलो आहे. अनेक स्थानिक समस्यांविरुद्ध आंदोलने करीत त्या समस्या सोडविल्या आहेत. एखाद्या प्रश्नाचा सखोल अभ्यास करून मी ते प्रश्न शासनदरबारी मांडतो. त्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाने मला ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार देऊन गौरविले आहे. माझ्या मतदारसंघात सुमारे १५ लाख ७० हजार मतदार आहेत. प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या समस्या आहेत.

मुंबईच्या विकासात पोलिसांचे घर उन्हातच!
विकास नाईक

महाराष्ट्राची किंबहुना भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहरातील कायदा आणि सुव्यवस्था जपणाऱ्या अध्र्या अधिक पोलिसांना शासनाकडून अद्याप घर मिळू शकलेले नाही. ज्यांना ते मिळाले आहे त्याची अवस्था कोंडवाडय़ासारखी आहे. ‘नॉन-प्रॉडक्टिव्ह’ खाते असल्यानेच शासन वर्षांनुवर्षे दुर्लक्ष करीत असल्याची पोलिसांची भावना झाली आहे. ‘बॉलीवूड’, ‘दलाल स्ट्रीट’ सोने आणि हिरे व्यवसाय, सिद्धिविनायक, हाजीअलीचा दर्गा यासारखी धार्मिक तर आयआयटी, व्हीजेटीआय, यूडीसीटीसारखी विद्यापीठे येथे आहेत. इथेच बीएआरसी, टीआयएफआर, टीआयएसएससारखी संशोधन केंद्रे, तर टाटा, केईएमसारखी नावाजलेली रुग्णालये आहेत.

राजकीय पक्षांचे ‘गणपती बाप्पा मोरया’
प्रतिनिधी

मुंबईतल्या विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत वर्षभर काहीना काही उपक्रम सुरू असतात. सध्या निवडणुकांचा हंगाम असल्याने आपल्या प्रचारासाठी राजकीय पक्षाच्या उमेदवांरांनी या उपक्रमांचा फायदा करून घेतला नसता तर नवलच. इतरवेळी कदाचित या उपक्रमांची राजकीय पक्षांकडून दखलही घेतली गेली नसती. मात्र निवडणुकांच्या निमित्ताने अनेक राजकीय पक्ष गणेशोत्सव मंडळांशी जवळीक करू लागले आहेत. या मंडळांतील ‘युवा-शक्ती’चा वापर त्यांना आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी करायचा आहे. प्रचारासाठी एकीकडे राजकीय पक्षांनी चित्रपट अभिनेत्यांशी जवळीक साधली आहे तर स्थानिक पातळीवर गणेशोत्सव मंडळांचे सहकार्य मागितले आहे.

नोकरानेच केला घात
एकेकाळी उच्च न्यायालयात वकिली करणारे चरणसिंग कुंदनानी (७९) हे वृद्धापकाळामुळे अंथरुणाला खिळले होते. त्यांना पक्षाघाताचा झटका आल्याने ते हतबल झाले होते. त्यांची काळजी घेण्याची ताकद वयोवृद्ध पत्नी कमळा (६९) हिच्यात नव्हती. तीही आजारी असल्याने अमितकुमार या १७ वर्षांंच्या अल्पवयीन मुलाला त्यांची काळजी घेण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. इमारतीच्याच पहारेकऱ्याने कुंदनानी दाम्पत्याला अमितला या कामासाठी दिले होते. त्यामुळे या दाम्पत्याकडे त्याचे छायाचित्र वा अन्य कुठलाही तपशील नव्हता. अल्पवयीन अमितवर हळूहळू त्यांचा विश्वासही बसला. तोही कुंदनानी दाम्पत्याच्या सेवेत गुंतला होता.

पालिका शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सहा वर्षे गणवेशच नाही
संदीप आचार्य

महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याच्या लंब्याचवडय़ा बाता गेल्या अनेक वर्षांमधील प्रत्येक महापालिका आयुक्तांनी मारल्या आहेत. त्याचप्रमाणे सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजपनेही शाळांमधील गळती रोखण्यापासून विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी चांगले उपक्रम राबविण्याच्या अनेक गप्पा मारल्या असल्या तरी प्रत्यक्षात मराठी शाळा बंद पडणे, विद्यार्थ्यांची गळती आणि खालावणारा शिक्षणाचा दर्जा या चिंतेच्या बाबी बनल्या आहेत.

मतदारयाद्या आणि ओळखपत्रातील घोटाळे
भारतातील मतदारांना ओळखपत्र देण्याचा टी. एन. शेषन हे मुख्य निवडणूक आयुक्त असतानाच्या काळात निर्णय घेण्यात आला. यथावकाश योजनेची अंमलबजावणीसुद्धा चालू झाली. पण भारतात कोणतेच काम कधी व्यवस्थित करायचेच नाही असा आपल्या सरकारी यंत्रणांनी पणच केला असल्याने या चांगल्या योजनेचे धिंडवडे कसे निघत आहेत हे आपण पाहत आहोत. आजही अनेक लोकांना मतदार कार्ड मिळाली नसल्याचे दिल्लीहून आलेल्या आमच्या तीन मुख्य आयुक्तांपैकी एका मुख्य आयुक्तांनी कबूल केले आणि मतदान कार्डाव्यतिरिक्त कोणतेही कार्ड वापरण्यास ते परवानगी देण्याच्या विचारात आहेत असे कळते.

भाव दाटले मनी अनामिक..
मराठी भावसंगीतात लतादीदी, आशा भोसले, सुमन कल्याणपूर या बिनीच्या गायिकांची कामगिरी अफलातूनच आहे. पण याच रसिकांच्या हृदयाला साद घालणाऱ्या काळात मालती पांडे, वाणी जयराम, कुंदा बोकील, निर्मला बापट, कृष्णा कल्ले, पुष्पा पागधरे यांनाही जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्याही यादगार गीते गाऊन गेल्या आहेत. इतर प्रतिष्ठित गायिकांपेक्षा त्यांची गाणी आकाशवाणीवर कमी वाजली तसेच सुरुवातीच्या म्हणजे ७२-७५ च्या काळात दूरदर्शनवरूनही कमी दाखविली गेली.

कलावंतांसंगे जाऊया ‘पिकनिक’ला
मराठी सिनेमा सध्या फॉर्मात आहे. नव्या धाटणीचे, नव्या पद्धतीने गोष्ट सांगणारे, तद्दन गल्लाभरू, कौटुंबिक, ग्रामीण बाजाचे असे विविध प्रकारचे मराठी चित्रपट येऊ लागले आहेत. एकीकडे मराठी सिनेमाची घोडदौड जोरात सुरू असताना मराठी वाहिन्याही एकमेकांशी तीव्र स्पर्धा करीत टीआरपी सतत वाढता ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत हे दररोज नवं काहीतरी देऊन टीव्ही दर्शकांना टक लावून टीव्ही पाहण्यासाठी खेचून आणण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहेत.

निर्जिवाचा संग..
प्रतिनिधी

मनीष वाघधरे यांच्या शिल्पकृतींचे प्रदर्शन १३ ते १९ एप्रिल दरम्यान जहांगीर कला दालनात भरविण्यात आले आहे. मुळचा मुंबईकर असलेल्या मनीषने जे.जे. कला महाविद्यालयातून शिल्पकलेचे शिक्षण घेतले. त्यानंतर आता मुंबईतच तो कार्यरत आहे. वर्षांनुवर्षे माणसाची गरज भागविणाऱ्या निर्जीव वस्तूंचा गोतावळा मनीषने या प्रदर्शनाच्या माध्यमातून रसिकांपुढे मांडला आहे. १९८९ मध्ये जे. जे. कला महाविद्यालयाच्या वार्षिक प्रदर्शनात त्याच्या कलाकृतीला प्रथम पारितोषिक मिळाले. अशा रितीने महाविद्यालयीन जीवनापासूनच मनीषने आपल्या कलागुणांशी चुणूक दाखवायला सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कला संचालनालयाने भरविलेल्या प्रदर्शनातही १९९१ मध्ये त्याला रोख पारितोषिक मिळाले होते. द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटी, यशवंतराव प्रतिष्ठान कला दालन, इंडियन ऑईल आर्ट एक्झिबिशन इत्यादी ठिकाणी त्याच्या कलाकृतींनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याप्रमाणेच अमेरिका, फ्रान्स आदी देशांमध्येही त्याच्या कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. आता या नव्या प्रदर्शनामध्ये त्याने टाळे-चावी, कॅमेरा, शिलाई मशीन, इस्त्री इत्यादी दैनंदिन आयुष्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू शिल्पकृतींद्वारे साकारल्या आहेत. वरवर पाहता या सर्व वस्तू निर्जीव आणि काळानुरुप कालबाह्य होत असल्या तरीही माणसाचे त्यांच्याशी एक अनामिक नाते तयार होते. त्या नात्याचा शोध घेण्याचा प्रयत्न मनीषने आपल्या कलाकृतीद्वारे केला आहे.

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी संवाद
प्रतिनिधी

‘सुदृढ मन सर्वासाठी’ हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून औद्योगिक क्षेत्रातील उच्च अधिकाऱ्यांपासून ते गडचिरोली जिल्'तील आदिवासींपर्यंत आणि स्क्रेझोफ्रेनियासारख्या आजाराच्या रुग्णांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम येत्या २३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता परळ येथील दामोदर नाटय़गृहात आयोजित करण्यात आला आहे. ‘बाराखडी दिलसे’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ‘अंतरंगात डोकावताना’ या विषयावर संपदा जोगळेकर-कुलकर्णी डॉ. आनंद नाडकर्णी यांची मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीत डॉ. नाडकर्णी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या कार्याचा वेध घेण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘बकुळफुलं’ या पुस्तकाचे व ‘काचापाणी’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. अधिक माहिती व प्रवेशिकांसाठी अतुल (९८१९०००२५१), उल्हास (९८२१०३३७३६) किंवा सुवर्णा (९८९२०२०६३२) यांच्याशी संपर्क साधावा.

‘अट्रॉसिटी आणि दलितांचे मानवी हक्क’ विषयावर अनुभव कथन
प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती दिनी, आज, १४ एप्रिल रोजी ‘अॅट्रासिटी आणि दलितांचे मानवी हक्क’ या विषयावर गणपत भिसे यांचे अनुभव कथन होणार आहे. ‘ओम्नी डेव्हलपमेंट रिलीफ फंड’ (ओडिआरएफ ) या संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ओडिआरएफ ही संस्था अमेरिकेतील आंबेडकरवादी तरुणांनी स्थापन केली आहे. या संस्थेची शाखा महाराष्ट्रात स्थापन करण्यात येत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन होणार आहे. ओडिआरएफ या संस्थेने जातीभेद आणि वर्णभेद व्यवस्था नष्ट करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. महाराष्ट्रातही ही संस्था आता दलितांच्या मानवी हक्काबाबत कार्य करणार आहे, असे संस्थेच्या वतीने दीपक पंझाडे यांनी सांगितले. हा कार्यक्रम आंबेडकर भवन, दादर (पूर्व) येथे संध्याकाळी साडेचार वाजता होणार आहे. आंबेडकरवादी जनेतेने या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भाव दाटले मनी अनामिक..
मराठी भावसंगीतात लतादीदी, आशा भोसले, सुमन कल्याणपूर या बिनीच्या गायिकांची कामगिरी अफलातूनच आहे. पण याच रसिकांच्या हृदयाला साद घालणाऱ्या काळात मालती पांडे, वाणी जयराम, कुंदा बोकील, निर्मला बापट, कृष्णा कल्ले, पुष्पा पागधरे यांनाही जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्याही यादगार गीते गाऊन गेल्या आहेत. इतर प्रतिष्ठित गायिकांपेक्षा त्यांची गाणी आकाशवाणीवर कमी वाजली तसेच सुरुवातीच्या म्हणजे ७२-७५ च्या काळात दूरदर्शनवरूनही कमी दाखविली गेली. त्यामुळे त्यांची अनेक गाणी रसिकांच्या लक्षात नाहीत व ती विस्मृतीमध्ये जाऊन पडली आहे. एचएमव्ही-सारेगामा या कंपनीने ‘अनमोल गाणी’ या मालिकेत अशाच काही अन्य कलावंतांची गाणी सादर केली. सुरुवातीला त्यामध्ये मन्ना डे, महेंद्र कपूर आणि मोहम्मद रफी या हिंदीतील मोठय़ा कलाकारांनी मराठीत जी कामगिरी केली आहे त्याचा आढावा घेणाऱ्या सीडी सादर केल्या गेल्या. त्यानंतर याच मालिकेत वाणी जयराम, अनुराधा पौंडवाल, सुरेश वाडकर या कलाकारांची भर पडली. आता याच मालिकेत एचएमव्हीने कृष्णा कल्ले, सुषमा श्रेष्ठ व गायक-संगीतकार सी. रामचंद्र यांच्या सीडी सादर केल्या आहेत. विशेषत: कृष्णा कल्ले यांच्या सीडीत त्यांनी गायलेली २० गाणी निवडण्यात आली आहेत. काही गीते वगळली तर इतर गीते आता ऐकायला सुध्दा मिळत नाहीत. संगीतकार श्रीनिवास खळे यांनी मराठीत जी अप्रतिम बालगीते बांधली त्यातली अनेक गाणी त्यावेळच्या बालकलाकार सुषमा श्रेष्ठ यांनी गायली व ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. संगीतकार सी. रामचंद्र यांच्याबाबत बोलायचे झाल्यास हा प्रतिभावंत कलाकार हिंदीत जेवढा तेजाळला त्या तुलनेत मराठीत त्यांचा तसा प्रभाव पडला नाही. तरीही त्यांच्या कलाजीवनात त्यांनी मराठीत जी गाणी गायली ती त्यांच्यावरील सीडीत संकलित झाली आहेत. पण काहीही असले तरी या अनमोल गाणी मालिकेतील या सीडींना निश्चितच काही मूल्य आहे.