Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९

रेल्वेसाठी सगळ्यांचेच ‘सुपर फास्ट’ इरादे
प्रश्न जिव्हाळ्याचे;दृष्टी उमेदवारांची

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ‘नाशिक वृत्तान्त’च्या माध्यमातून केंद्र सरकारशी संबंधित स्थानिक पातळीवरील विविध प्रलंबित प्रश्नांकडे ‘प्रश्न जिव्हाळ्यांचे’ या मालिकेतून लक्ष वेधण्यात आले. पण, केवळ प्रश्न मांडून उपयोग नाही, स्थानिक खासदाराकडून याबाबत पाठपुरावा झाला तरच नाशिकच्या विकासाला नवा आयाम मिळू शकतो. हे लक्षात घेता, लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा प्रस्तुत प्रश्नांकडे पहाण्याचा दृष्टीकोन कसा आहे, प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांच्या काही योजना आहेत का, या विषयी जाणून घेतलेली त्यांची मते त्यांच्याच शब्दांत ..

बेशिस्त रिक्षाचालकांविरूध्दची कारवाई केवळ एक फार्स
ग्राहक पंचायत समितीचा आरोप

नाशिक / प्रतिनिधी

शहरात बेशिस्त रिक्षाचालकांविरूध्दच्या मोहिमेत पोलिसांना केवळ दिडशेच्या आसपास रिक्षा सापडाव्यात, याबद्दल नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत समितीने आश्चर्य व्यक्त केले असून सर्वसामान्यांना रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा जागोजागी दिसत असताना वाहतूक पोलिसांच्या नजरेस तो कसा पडत नाही, असा प्रश्नही समितीने उपस्थित केला आहे. पोलीस व रिक्षा संघटना यांच्या संगनमतामुळे अनेक रिक्षाचालक शहरात बेशिस्त, गैरकायदेशीर कामे करतात, याचा अनुभव प्रवाशांना नित्याने येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय चिंतन
आर्थिक मंदीच्या सावटाखाली देशात सर्वत्र लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. एकविसाव्या शतकातील माहिती-तंत्रज्ञानाच्या युगाकडे वाटचाल करीत असताना भारतात अज्ञान-अंधकार, भ्रष्टाचार, दहशतवाद, भूकबळी, पर्यावरण, धर्म आणि जातींचे राजकारण, राजकीय पक्षांची वाढती सत्ता स्पर्धा इत्यादी अनेक मूलभूत प्रश्ने मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त या सर्व पाश्र्वभूमीवर बाबासाहेबांचे राजकीय विचार कसे होते हे पाहणे महत्वपूर्ण ठरेल.

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम
प्रतिनिधी / नाशिक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यानिमित्त मंगळवारी शहर व परिसरात विविध संघटनांतर्फे व्याख्याने, मनोरंजनात्मक कार्यक्रम, निबंध व वकृत्व स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, राजकीय पक्षांनीही आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. शहरात ठिकठिकाणी निळे झेंडे लावून वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे. शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रोषणाई व सुशोभीकरण करण्यात आले आहे. परिसराची साफसफाई आणि रंगकामही करण्यात आले आहे. या ठिकाणी अभिवादनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे नियोजन करण्यात आले आहे. रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन पँथर्स, भीमशक्ती-शिवशक्ती संघटना, रिक्षाचालक-मालक सेना यांच्यावतीने मंगळवारी शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रम, निबंध व वकृत्व स्पर्धा, मान्यवरांची व्याख्याने आदींचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजकीय पक्षांनीही जयंती उत्सव भव्य दिव्यपणे साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. यावेळच्या मिरवणुकीत सामाजिक प्रबोधन करणाऱ्या देखाव्यांवर अधिक भर देण्यात येणार असल्याची माहिती जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. ग्रामीण भागातही ठिकठिकाणी जयंती उत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई-शिर्डी एक्स्प्रेस दैनंदिन करण्याची मागणी
प्रतिनिधी / नाशिक

मुंबई-शिर्डी ही मनमाडमार्गे असणारी साप्ताहिक एक्स्प्रेस प्रवासी बांधवांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेवून दैनंदिन करावी, अशी मागणी महसूल विभाग वाहतूक समितीचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बुरड यांनी मध्यरेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. आठवडय़ातून एकदा म्हणजे शुक्रवारी सुटणाऱ्या या गाडीचा मनमाड व नाशिक येथील प्रवाशांना लाभ होत आहे. मुंबई ते शिर्डी हा प्रवास सहा तासात पूर्ण होतो. प्रवाशांचा या गाडीचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या पाश्र्वभूमीवर, रेल्वे प्रशासनाने ही गाडी दैनंदिन सुरू होईल याचे नियोजन करणे गरजेचे आहे. साप्ताहिक गाडी दैनंदिन स्वरूपात रूपांतरीत झाल्यास रेल्वेच्या महसुलातही वाढ होईल याकडे बुरड यांनी लक्ष वेधले. दरम्यान, सध्या या मनमाड व नाशिक दोन्ही स्थानकांतून दररोज सुमारे ६० रेल्वेगाडय़ांची ये-जा होते. परंतु, त्यापैकी किती रेल्वेगाडय़ांचा स्थानिकांना लाभ होतो, याचा खुलासा रेल्वेने करावा असे निवेदनात म्हटले आहे. बहुतांश रेल्वेगाडय़ांमध्ये तिकीट तपासनीस प्रवास करण्याची परवानगी नसल्याचे सांगून जबरदस्तीने दंड वसूली करतात. एक्स्प्रेस गाडय़ांच्या बोगीचे आरक्षण मनमाड व भुसावळच्या पुढील स्थानकांचे असते. तिथपर्यंत या मेल एक्स्प्रेसमधून नाशिकच्या प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा देण्याची आवश्यकता असल्याचे बुरड यांनी नमूद केले आहे.

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम
प्रतिनिधी / नाशिक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यानिमित्त मंगळवारी शहर व परिसरात विविध संघटनांतर्फे व्याख्याने, मनोरंजनात्मक कार्यक्रम, निबंध व वकृत्व स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, राजकीय पक्षांनीही आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. शहरात ठिकठिकाणी निळे झेंडे लावून वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे. शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रोषणाई व सुशोभीकरण करण्यात आले आहे. परिसराची साफसफाई आणि रंगकामही करण्यात आले आहे. या ठिकाणी अभिवादनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे नियोजन करण्यात आले आहे. रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन पँथर्स, भीमशक्ती-शिवशक्ती संघटना, रिक्षाचालक-मालक सेना यांच्यावतीने मंगळवारी शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रम, निबंध व वकृत्व स्पर्धा, मान्यवरांची व्याख्याने आदींचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजकीय पक्षांनीही जयंती उत्सव भव्य दिव्यपणे साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. यावेळच्या मिरवणुकीत सामाजिक प्रबोधन करणाऱ्या देखाव्यांवर अधिक भर देण्यात येणार असल्याची माहिती जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. ग्रामीण भागातही ठिकठिकाणी जयंती उत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेचे २६ एप्रिल रोजी उद्घाटन
नाशिक / प्रतिनिधी

अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्रातील पहिल्या शाखेचे उद्घाटन येथे २६ एप्रिल रोजी होणार आहे. दुपारी चार ते सहा या कालावधीत पंचवटी सार्वजनिक वाचनालयात हा कार्यक्रम होणार असून यानिमित्ताने कवी संमेलनही होणार आहे.कवी संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी कोणत्याही भाषेतील दोन रचना १७ एप्रिलपर्यंत ‘अखिल भारतीय साहित्य परिषद, नाशिक शाखा’ या नावाने शाखेकडे पोहोचत्या करणे गरजे आहे. याकरिता शीला डोंगरे (९४२०५८८१०४), डॉ. धर्मेद्र मुल्हेरकर (९८८१२००७४७) आणि उज्वला आगासकर (९३७१३८६९२५) यांच्याकडे संपर्क साधावा. इतर भाषांमधील काव्याचा हिंदी अनुवाद सोबत जोडणे आवश्यक आहे. या संमेलनात उत्तर महाराष्ट्रातील कवी-कवयित्रींनी सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. भास्कर गिरीधारी यांनी केले आहे. दरम्यान अखिल भारतीय साहित्य परिषद या राष्ट्रीय संस्थेचे सहसंघटन मंत्री श्रीधर पराडकर यांच्या नाशिक दौऱ्यामध्ये ‘आपली परंपरा व संस्कृती ’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी काव्य, संगीत, शास्त्र आदि विषयांमधील तज्ज्ञ व्यक्तींनी उपस्थित राहून चर्चेमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमास डॉ. विद्या चिटको, प्रा. डॉ. गिरिधारी, प्रा. यशवंत पाटील, मधुकर झेंडे, श्यामशरण शर्मा, अ‍ॅड. नंदकुमार भूतडा उपस्थित होते.