Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मुलांचा इमोशनल कोशंट वाढविण्यासाठी ‘भावनांक शिबीर’
प्रतिनिधी

मुलांचा आयक्यू म्हणजेच इंटेलिजन्ट कोशंट किती आणि कसा आहे याकडे अधिक लक्ष दिले जाते मात्र त्यांचा इमोशनल कोशंट (इक्यू) किंवा भावनांक वाढविणे हे मुलांच्या यशासाठी आवश्यक आहे. म्हणूनच इक्विप किड्स या इक्यू इन्स्टिटय़ूट फॉर चिल्ड्रेन संस्थेतर्फे १० ते १५ वयोगटातील मुलामुलींसाठी २७ एप्रिलपासून नावीन्यपूर्ण असे भावनांक शिबीर आयोजित करण्यात

 

आले आहे.
राग, भीती, अपेक्षाभंग यांसारख्या भावना आपल्या मनात का आणि कशा निर्माण होतात, त्यांचा सामना कसा करायचा? स्वयंप्रेरणा, आशावाद स्वत:मध्ये कसा जागृत करायचा? हे भावनांबद्दलचे मूलभूत शिक्षण या शिबिरातून मुलामुलींना मिळावे हा या भावनांक शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
मुलांचे ८० टक्के यश हे त्यांच्या भावनांकावर आधारित असते असे गेल्या दशकभरात जगभर झालेल्या विश्लेषणांतून आढळून आले आहे.
भावनांक आणि बुद्धय़ांक यांचा सुयोग्य समतोल साधणे प्रत्येक व्यक्तीसाठी खूप आवश्यक असते. हे लक्षात घेऊन या शिबिरात विविध मनोरंजक खेळांद्वारे परस्पर संवाद कौशल्ये तसेच विविध प्रयोगांद्वारे भावनांक कौशल्ये मुलांना शिकविली जातील. भावनांक विशेषज्ञ डॉ. संदीप केळकर या शिबिरात मार्गदर्शन करणार असून हे शिबीर २७ एप्रिल ते १ मे दरम्यान दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत नितीन कंपनीजवळील कौशल्य हॉस्पिटल ऑडिटोरियममध्ये भरविण्यात येणार आहे. पालकांसाठीही ‘मुलांचा भावनांक आणि पालकत्व’ या विषयावर ३ मे रोजी एकदिवसीय कार्यशाळा घेतली जाणार आहे.
सभासद नोंदणीसाठी इच्छुक पालकांनी अश्विनी हॉस्पिटल, परफेक्ट ड्रायव्हिंग स्कूलशेजारी संध्याकाळी ५ ते ७ अथवा श्रीप्रथमेश हॉस्पिटल, वर्तक नगर येथे सकाळी १० ते २ या वेळेत संपर्क साधावा. तसेच नावनोंदणीसाठी संपर्क - ९९६७४७७७५४ अथवा ९८२०१२७९३८.