Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नववर्ष स्वागतयात्रेसाठी कायमस्वरूपी निधी उभारण्याचे आवाहन
ठाणे/ प्रतिनिधी

गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेसाठी कायमस्वरूपी निधी उभारण्यासाठी ठाण्यात राहणाऱ्या कलाकारांनी एखादा कार्यक्रम करावा, असे आवाहन कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे करण्यात आले. नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी झालेल्या उत्कृष्ट चित्ररथास

 

तसेच छायाचित्रकारास पारितोषिक देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.
कौपिनेश्वर मंदिराच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास शोभायात्रेचे निमंत्रक अरविंद जोशी, स्वागताध्यक्ष दिलीप देहेरकर, अच्युतराव वैद्य, माजी अध्यक्ष मुकेश सावला, मा. य. गोखले, शंकरराव मठ, नरेंद्र पाठक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
उत्कृष्ट नियोजनबद्ध चित्ररथाचे पाहिले पारितोषिक जगद्गुरू नरेंद्रमहाराज संस्थेला मिळाले, त्यांनी दहशतवादावर आधारित चित्ररथ साकारला होता. द्वितीय पारितोषिक ठाणे महापालिका शिक्षण मंडळाच्या ‘सर्व शिक्षण अभियान’ चित्ररथाला, तृतीय पारितोषिक संगीता एज्युकेशन अॅकॅडमीच्या शिवराज्याभिषेक चित्ररथाला मिळाले. मराठा मंडळ, विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट, श्री माँ बाल निकेतन शाळा यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाली. उत्कृष्ट वेशभूषेबद्दल विजय साधले, यज्ञा महाजन, उदय आगाशे, देवीदास ठोमरे यांना पारितोषिक मिळाले. फोटो सर्कल सोसायटी, ठाणे यांनी स्वागतयात्रेनिमित्त आयोजित केलेल्या छायाचित्र स्पर्धेत निलय पाटील यांना प्रथम पारितोषिक मिळाले, तर गजानन दुधाळकर यांना द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
वरुण गाडे व सुजित म्हात्रे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.