Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
विविध
(सविस्तर वृत्त)

‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, १३ एप्रिल/खास प्रतिनिधी

 

देशातील २६ सर्वोत्तम पत्रकारांना विविध विभागांतील ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कारांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
२००६ साली पहिल्या रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते करण्यात आले होते, तर २००७ सालचे पुरस्कार प्रदान करण्यासाठी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रमुख पाहुणे म्हणून समारंभाला उपस्थित होते.
२००७-०८ सालच्या ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझ्म’ पुरस्कार विजेत्यांची निवड करणाऱ्या समितीत एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख, नामवंत अर्थतज्ज्ञ व आयआयएम अहमदाबादचे माजी संचालक बकुल ढोलाकिया, माजी केंद्रीय कॅबिनेट सचिव नरेश चंद्र, राष्ट्रीय कृषी आयोगाचे अध्यक्ष एम. एस. स्वामीनाथन, प्रख्यात विधिज्ञ फाली एस. नरीमन, इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती, ओएनजीसीचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुबीर राहा, आघाडीच्या मार्केटिंग सल्लागार रमा विजापूरकर, महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष केशुब महिंद्रा, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक श्याम बेनेगल, हिंदूस्थान टाईम्स मिडिया लिमिटेडच्या उपाध्यक्षा व संपादकीय संचालक शोभना भारतीया यांचा समावेश होता.
थापर यांना टेलिव्हिजनमधील, तर साईनाथ यांना प्रिंट माध्यमातील सवरेत्कृष्ट कामगिरीसाठी २००७-०८ सालचे सर्वश्रेष्ठ पत्रकाराचया पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. आज पुरस्कार पटकाविणाऱ्या अन्य विजेत्यांची नावे याप्रमाणे -
१) प्रकाश कर्दळे स्मृती नागरी पत्रकारिता पुरस्कार : सायली उदास मानकीकर (हिंदूस्थान टाईम्स)
२) अनकव्हरींग इंडिया इनव्हिजिबल (टेलिव्हिजन): मृदू भंडारी (सीएनएन-आयबीएन)
३) अनकव्हरींग इंडिया इनव्हिजिबल (प्रिंट): नीलेश मिश्रा आणि नागेंद्र शर्मा (हिंददुस्थान टाईम्स)
४) एक्सलन्स इन जर्नालिझ्म पुरस्कार (हिंदी टेलिव्हिजन): उमाशंकर सिंह (एनडीटीव्ही इंडिया)
५) एक्सलन्स इन जर्नालिझ्म पुरस्कार (हिंदी प्रिंट): पुण्यप्रसून बाजपेयी (प्रथम प्रवक्ता)
६) चित्रपट आणि टेलिव्हिजन पत्रकारिता (टेलिव्हिजन): वैशाली सूद (सीएनएन-आयबीएन)
७) एचआयव्ही/एड्सविषयक सवरेत्कृष्ट वृत्त (इंग्रजी, प्रिंट): ज्ञानेश जठार (द वीक)
८) एचआयव्ही/एड्सविषयक सवरेत्कृष्ट वृत्त (मराठी, प्रिंट): सविता विक्रम हरकरे (लोकमत)
९) पुस्तक : रामचंद्र गुहा
१०) प्रादेशिक भाषा : (टेलिव्हिजन) : एम. एस. राघवेंद्र आणि शीतल मोरजारिया (टीव्ही नाईन)
११) प्रादेशिक भाषा (प्रिंट): पी. के. प्रकाश (दैनिक माध्यमम)
१२) क्रीडा पत्रकारिता : (टेलिव्हिजन) : रुद्रनील सेनगुप्ता (सीएनएन-आयबीएन)
१३) क्रीडा पत्रकारिता (प्रिंट) : संदीप द्विवेदी (द इंडियन एक्सप्रेस)
१४) जम्मू आणि काश्मीर, ईशान्येकडील राज्यांचे वृत्तांकन (टेलिव्हिजन) : व्ही. के. शशीकुमार (सीएनएन-आयबीएन) आणि निधी राजदान (एनडीटीव्ही)
१५) जम्मू आणि काश्मीर, ईशान्येकडील राज्यांचे वृत्तांकन (प्रिंट) : मुझामिल जलील (द इंडियन एक्सप्रेस)
१६) पर्यावरणविषयक पत्रकारिता(टेलिव्हिजन): स्वाती त्यागराजन (एनडीटीव्ही)
१७) पर्यावरणविषयक पत्रकारिता(प्रिंट): सोनू जैन (द इंडियन एक्सप्रेस)
१८) वाणिज्य आणि आर्थिक पत्रकारिता (टेलिव्हिजन) : अभिषेक उपाध्याय (आयबीएन-सेव्हन)
१९) वाणिज्य आणि आर्थिक पत्रकारिता (प्रिंट) : पी. वैद्यनाथन अय्यर (बीझनेस वल्र्ड)
२०) भारतात पत्रकारिता करणारे परदेशी पत्रकार (प्रिंट) : जोसेफ जॉन्सन (फायनान्शियल टाईम्स)
२१) राजकीय पत्रकारिता (टेलिव्हिजन) : श्रीनिवासन जैन (एनडीटीव्ही)
२२) राजकीय पत्रकारिता (प्रिंट) : सुब्रत नागचौधरी आणि रविक भट्टाचार्य (द इंडियन एक्सप्रेस)
२३) संजीव सिन्हा स्मृती पुरस्कार : स्मिता नायर (इंडियन एक्स्प्रेस, मुंबई)
मालेगाव बॉम्बस्फोटाची उकल करणारी वार्तापत्रे दिल्याबद्दल स्मिता नायर यांनी हा पुरस्कार दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख दिवंगत हेमंत करकरे यांना अर्पण केला आहे.
२४) प्रिया चंद्रशेखरन स्मृती पुरस्कार (संपादनासाठी ) : अमृता दत्ता (इंडियन एक्स्प्रेस)
२५) फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन (प्रिंट) : शोमा चौधरी (तहलका)