Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

निवडणुकीत दोन विचारसरणीतील लढाई -भुजबळ
गोंदिया, १३ एप्रिल / वार्ताहर

एकीकडे धर्मनिरपेक्षतेच्या विचारांचा काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष, तर दुसरीकडे जाती धर्माच्या नावावर लोकांना आपसात लढवून आपली राजकीय पोळी शेकणारा पक्ष अशा दोन परस्पर विरोधी विचारसरणीत या निवडणुकीत संघर्ष होत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी

 

येथे केले.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्या निवडणूक प्रचार सभेत काटी येथे भुजबळ बोलत होते. याप्रसंगी ते म्हणाले की, योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी बसविण्यास विकास कामांना गती मिळते. जिल्ह्य़ात उद्योगांची स्थापना करून बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारे प्रफुल्ल पटेल यावेळी रिंगणात आहे.
ग्रामीण क्षेत्राचा विकास करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे शाहू, आंबेडकरी विचारसरणीच्या नागरिकांनी प्रफुल्ल पटेल यांना विजयी करावे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष नागरीकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. के.आर. शेंडे, राकाँ जिल्हा अध्यक्ष विजय राणे, ओमप्रकाश भक्तवर्ती, संजय टेंभरे, नरेंद्र तुरकर, धनंजय तुरकर, रोहिदास कावरे, भारत पाचे, अशोक तिवारी, आनंद तुरकर, माधो तुरकर, कांता पाचे, बंटी बानेवार, सनम कोल्हटकर, गणेश बरडे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. के.आर. शेंडे यांना समाज विकासाचा रथ हाकण्याचे कार्य करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला सहकार्य करण्याचे आवाहन केले.