Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

गडचिरोलीत मतदार जागृती मिरवणूक
गडचिरोली, १३ एप्रिल / वार्ताहर

‘जागरूक मतदार हाच लोकशाहीचा आधार’, ‘मतदार राजा जागा हो’, ‘मतदान केलेच पाहिजे’, या घोषणा देत शहरात मतदार जागृती मिरवणूक काढण्यात आली. कॅम्प भागातील शहीद अजय उरकुडे यांच्या घरासमोरील पटांगणावरून निघालेली ही मिरवणूक शहरातील शिवाजी महाविद्यालय, भातगिरणी परिसर, राम मंदिर, विठ्ठल मंदिर, गांधी चौक, त्रिमूर्ती चौक मार्गाने इंदिरा गांधी चौकात

 

पोहचल्यावर मिरवणुकीचा समारोप झाला.
समारोपप्रसंगी मतदान का आवश्यक आहे? याविषयी अनेकांनी आपले विचार मांडले. लोकशाहीत मतदानाला किती महत्त्व आहे; एक मत भारताच्या निर्माणसाठी उपयुक्त ठरेल, आमिषाला बळी न पडता मतदान करा. जात, पात, धर्म, पंथ, पक्षपात विसरून स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना निवडून आणा, मतदानातून आपला लोकप्रतिनिधी आपल्या व देशाच्या विकासासाठी निवडा, असा सूर यावेळी वक्तयांनी काढला.
या मिरवणुकीत भारत स्वाभिमान ट्रस्ट, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रणीत गुरूदेव सेवा मंडळ, लॉयन्स क्लबचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
भारत स्वाभिमान ट्रस्टचे समन्वयक सत्यम चकीनारप, चंद्रशेखर भडांगे, सुधा सेता, शंकरराव विट्टूरवार, माधुरी दहीकर, अ‍ॅड. विजय गोरे, संतोष दहीकर, वर्षां मोडक, प्रवीण मोडक, विवेक चडगुलवार, एस.बी. धात्रक, लॉयन्स क्लबचे अध्यक्ष शेषराव येलेकर, अरविंद पटेल, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर चन्नावार, पंडित पुडके, गजानन राऊत, नत्थुजी चिमुरकर, अनिरुद्ध निलेकार, संदीप कांबळे, कोमेश कत्रोजवार, विजय उरकुडे, तारा आवारी सहभागी झाले होते.
समारोप कार्यक्रमात चंद्रशेखर भडांगे, सलम चकीनारप, गजानन राऊत, पंडित पुडके आदींनी मार्गदर्शन केले. सुधा सेता यांनी आभार मानले. वंदेमातरम् गीताने मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.