Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

हिंगण्यात हनुमान जयंती उत्साहात
हिंगणा, १३ एप्रिल / वार्ताहर

हनुमान जयंतीनिमित्त तालुक्यातील वागदरा, तेलगाव (मांडवघोराड) येथील प्राचीन हनुमान मंदिरासह तालुक्यात अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसाद वितरण कार्यक्रम पार

 

पडले.
वागदरा हनुमान मंदिरात बाबा आष्टणकर यांच्या हस्ते अभिषेक व महाप्रसाद वितरण करण्यात आले. यावेळी हिंगणा पंचायत समितीच्या सभापती रेखा आष्टणकर, मारोतराव हजारे, खेमसिंग जाधव, माजी सभापती नरेंद्र पाटील, सतीश मिनियार, हरिभाऊ नाईक, राजेंद्र इटनकर, प्रकाश उमरेडकर आदी उपस्थित होते. येथे दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम झाले.
मोंढा शिवारातील हनुमान मंदिरात अन्न व नागरी पुरवठा मंत्री रमेश बंग यांच्या उपस्थितीत अभिषेक व महाप्रसाद कार्यक्रम झाला. यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद बंग, महेश बंग, राजेंद्र वाघ, गोवर्धन प्रधान, जयकिसन बंग, सतीश बंग, डॉ. दिलीप पन्नासे, भोजराज बारापात्रे आदी उपस्थित होते.
िहगणा येथील वेणा व दुर्गा नदीच्या निसर्गरम्य संगमावर बसलेल्या हनुमान गडावर धार्मिक कार्यक्रम झाले. तेलगाव (मांडवघोराड) येथील प्राचीन मंदिरातही धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी मारोतराव हजारे, शेषराव कसोधन, अंकुश अजबैले, देवराव बेलेकर, बळीराम रंदई, चिंधू चवणे, रामकृष्ण उखीणकर, मनोज गोहणे, रामदास चौके, नारायण वारकरी आदी उपस्थित होते.
डिगडोह देवी, महाजनवाडी, माळूपुरा, रायपूर, कान्होलीबारा, टाकळघाट, मोहगाव, उमरी, वाघ, वानाडोंगरी, हिंगणा आदी परिसरात हनुमान जयंती कार्यक्रम झाले.