Leading International Marathi News Daily
रविवार, १२ एप्रिल २००९

प्रश्न कमी होतील
पंचमात शनी, दशमात गुरू, सोमवारी सूर्य राशीस्थानी प्रकट होत आहे. यातूनच मेष कार्यपथावरील प्रश्नांची संख्या वेगाने कमी होऊ लागेल. शनिवारच्या बुध-शनी नवपंचम योगापर्यंत प्रकरणे मार्गी लागतील. योजना कृतीत येतील. यामधील उत्साह व्यापार, कला, साहित्य, राजकारण यामध्ये प्रभाव प्रस्थापित करण्यास उपयुक्त ठरेल. तरीही मंगळाचे राश्यांतर अर्थकारणाची चिंता निर्माण करते. मंगळ-हर्षलाच्या युतीमुळे अपघात आणि वाद याचा त्रास होणार नाही, यासाठी सावध राहावे लागेल.
दि. १५ ते १८ शुभ काळ.
महिलांना : मार्ग सापडतील, प्रसन्न राहाल.

साहस टाळा, सतर्क राहा
भाग्यात गुरू, राहू, मीन, शुक्र आणि मंगळाचे राश्यांतर यांच्यातून काही प्रश्न सुटतील. काही पुढे सरकवता येतील. परंतु मंगळ, हर्षल युती होत असताना साहस टाळायचे असते. सतर्कता आवश्यक असते. प्रवास, परिचय, प्रकृती, प्रपंचाचा त्यात समावेश करावा लागतो. रवी-नेपच्यून शुभयोग परमेश्वरी चिंतनातून आनंद देईल. अचानक संधीतून नवी कार्ये उभी करता येतील. व्ययस्थानी रवी असेपर्यंत पाहुणे आणि खर्च यावर नियंत्रण अवघड असते. श्री मारुतीची उपासना मन:शांतीची अडचण दूर करणारी ठरू शकेल.
दि. १३, १४, १७, १८ शुभ काळ.
महिलांना : हुशारीने कार्यभाग साधता येईल, अवघड कृती टाळा.

सबुरी आवश्यक
रवी-मंगळाच्या राश्यांतरातून मिथुन व्यक्तींच्या विचारांचा वेग वाढेल आणि कृतीला यशही मिळू लागेल. बुधवारची मंगळ-हर्षल युती संपेपर्यंत काही विभागात श्रद्धा सबुरीचा मंत्र उपयुक्त ठरेल. त्यातून गुरू-राहूचे अशुभ परिणामही कमी होतील. यातून बढती, बदली, सावकारी, उधारी, शासकीय प्रकरणे, भागीदारीतले प्रश्न यासंबंधी ठोस पावलं उचलता येऊ शकतील. शनिवारचा बुध-शनी नवपंचम योग अवघड उपक्रमातील यशाने प्रभाव निर्माण करील.
दि. १४, १५, १६ शुभ काळ.
महिलांना : दडपणे कमी होतील, संधी साधता येतील.

आगेकूच सुरू होईल
सप्तमात गुरू-राहू, सोमवारी सूर्य दशमात येत आहे. मंगळवारी अष्टमातील मंगळाची अनिष्टता संपेल आणि बुधवारपासून रवी-नेपच्यून शुभयोगाच्या सहकार्याने आगेकूच सुरू होईल. साडेसाती मंगळ-हर्षल युती यांच्या दुष्परिणामांवर लक्ष मात्र ठेवा. त्यात वाहनांचा वेग, आरोग्याच्या तक्रारी, मौल्यवान वस्तू यांचा समावेश राहील. नियमित उपक्रमातील समस्या दूर होतील. प्रतिष्ठितांशी संपर्क येतील. व्यापारी गाडी रुळावर येईल. कला-साहित्यात कर्क व्यक्ती आघाडीवर राहतील.
दि. १३, १४, १७, १८ शुभ काळ.
महिलांना : कर्तृत्व प्रकाशमान करणारे यश मिळणार आहे.

समीकरण अवघड
साडेसाती मंगळ अष्टमात प्रवेश करीत आहे. गुरू-राहू नाराज अशा काळात व्यवहार, प्रयत्न, यश यांचे समीकरण अवघड असते. ठरवलेल्या कार्यपद्धतीने बदल करावेच लागतात. सोमवारी मेष राशीत प्रवेश करीत असलेला सूर्य भाग्यात बुध यांचा आधार काडीचा असला तरी वाचवणारी शक्ती त्यामध्ये निश्चित राहील. पैशाचा उपयोग जपून करा, व्यापारी घोळ टाळा, शासकीय नियमांचे विस्मरण नको. हीच पथ्ये समस्या कमी करण्यात उपयुक्त ठरतील.
दि. १३, १४, १७, १८ संयम सोडू नका.
महिलांना : प्रपंचात शांत राहा. समाजकार्यात धावपळ होईल. स्पर्धा नको.

सावध राहा
साडेसाती अष्टमात सूर्य, बुध आणि पंचमात गुरू, राहू सप्तमात शुक्र-मीन राशीत मंगळाचा प्रवेश अशा ग्रहकाळात शिकस्तीचे प्रयत्न तसेच कृतीमध्ये कुशलता यातून निर्णयात्मक यशापर्यंत पोहोचता येते. मंगळ-हर्षल युतीमुळे धावपळीत घाईगर्दीत सावध राहणे फायद्याचे ठरते. श्री मारुतीची उपासना आराधना मन:शांतीची अडचण दूर करणारी ठरू शकेल. मंगलकार्ये ठरतील. परिचित मंडळींचे सहकार्य मिळेल. अधिकारी खूश होतात आणि तणाव कमी होतो.धावपळ घाईगर्दीत प्रकृतीकडे दुर्लक्ष मात्र नको.
दि. १३, १४, १७, १८ येथे त्याची प्रचीती येईल.
महिलांना : कष्टसाध्य यशाचा काळ आहे. खुश राहाल.

पुढे सरकता येईल
लाभांत शनी सोमवारी सूर्य मेष राशीत प्रवेश करील. मंगळवारी षष्ठांत मंगळाचे आगमन होईल आणि तुला व्यक्ती नव्या विश्वासाने शत्रू आणि समस्यांशी सामना करीत पुढे सरकू लागतील. यामध्ये गुरू, राहूचा असंतोष आपण कमी करू शकाल. व्यापार, राजकारण, शिक्षण, साहित्य यामध्ये शनिवारच्या बुध-शनी नवपंचम योगापर्यंत बरीच मोठी मजल मारता येईल. रवी नेपच्यून शुभयोग शोधकार्ये धार्मिक कृती यातून आनंद देणारा आहे. प्रवास कराल.
दि. १३ ते १६ शुभकाळ
महिलांना : यशस्वी प्रयत्नांचा आनंद देणारी ग्रहस्थिती आहे.

प्रगतीने चमकाल
पराक्रमी गुरू राहू दशमांत शनी सोमवारी सूर्य मेष राशीत येईल मंगळवारी मंगळाचे राश्यांतर होईल. वृश्चिक व्यक्तींच्या कार्यक्षितिजावर प्रगतीचा नवा प्रकाश दृष्टिपथांत यावा अशी ग्रहस्थिती आहे. व्यापारांत भरभराट होईल. दूरचे प्रवास होतील. न्यायालयीन प्रकरणांत यश मिळेल. बौद्धिक वर्तुळांत प्रभाव वाढेल. कलावंत चमकतील. क्रीडा मैदान गाजवाल. अशा शुभकाळात मंगळ हर्षल युतीने अपशकून करू नये यासाठी शब्द कृती निर्णय यामध्ये शनिवारच्या बुध- शनी नवपंचम योगापर्यंत संयमच आवश्यक राहील.
दि. १४ ते १८ शुभकाळ
महिलांना : प्रपंचात शुभकार्ये ठरतील. आकर्षक खरेदी व्हावी. समाजात चमकाल.

समस्या सुटतील
भाग्यात शनी आणि गुरू राहूचे सहकार्य सोमवारी पंचमात येत असलेला सूर्य याच ग्रहांमधून धनू व्यक्तींना समस्या सोडवून घेता येतील. नवीन क्षेत्रात प्रवेश करता येईल आणि बडी बडी मंडळी बैठकीत बसू लागतात. बुधवारच्या रवि नेपच्यून शुभयोगाच्या आसपास याचा अनेक प्रांतात ठसठशीत प्रत्यय येऊ शकेल. व्यापार, राजकारण, कला, शिक्षण यामध्ये शनिवारच्या बुध- शनी नवपंचम योगापर्यंत पक्की बैठक बसवता येईल. संयमाने मंगळ हर्षल युतीची अनिष्टता नियंत्रित करू शकाल.
दिनांक : १५ ते १८ शुभकाळ
महिलांना : प्रपंच खूष राहील.

कार्यपथ निर्वेध होतील
राशीस्थानी गुरू, राहू, मीन, शुक्र मंगळवारी पराक्रमी मंगळ येणार आहे. कार्यपथ निर्वेध होऊ लागतील. अडखळत असलेल्या प्रवासाला वेग मिळेल. सहकार्याचे अनेक हात पुढे येऊ लागतील. चतुर्थात सूर्य अष्टमांत शनी- मंगळ- हर्षल युती यांचे दुष्परिणाम, वाद, स्पर्धा, प्रलोभन टाळून संपवता येतील. रवी नेपच्यून शुभयोग धार्मिक उपक्रमातून आनंद देणारा आहे. धावपळ घाईगर्दीत प्रकृतीकडे दुर्लक्ष मात्र नको. सामाजिक, सांस्कृतिक वर्तुळात यश मिळेल.प्रवास कराल.
दिनांक : १३, १४, १७, १८ शुभकाळ
महिलांना : कल्पना कृतीत येतील, श्रेष्ठत्व सिद्ध होईल.

दडपणे दूर होतील
सूर्य मंगळाची राश्यांतर आणि शनिवारच्या बुध- शनी नवपंचम योग कुंभ व्यक्तींची दडपणे दूर करणारी ग्रहस्थिती आहे. व्यवहाराला नवी कलाटणी मिळेल आणि स्थगित योजनांना वेग देता येईल; परंतु प्रलोभन, साहस, स्पर्धा असले प्रकार कटाक्षाने टाळा. बाराव्या गुरू- राहूचा त्रास त्यामुळे निश्चित कमी होईल, मीन शुक्र प्रापंचिक प्राप्ती यातल्या समस्या दूर करील. मेष रवी प्रतिष्ठेला नवी चमक देणार आहे.आप्तांच्या भेटी होतील.
दिनांक : १२ ते १६ अशा घटनांचा काळ आहे.
महिलांना : बौद्धिक प्रांतात, प्रपंचात कला क्षेत्रात अपेक्षित मार्ग सापडतील.

विजय मिळेल
लाभात गुरू, राहू सोमवारी सूर्य मेष राशीत येणार आहे. मंगळवारी शुक्र-मंगळ सहयोग सुरू होईल आणि मीन व्यक्तींचा प्रयत्नरथ विजय मिळवीत नवीन क्षेत्रांतून पुढे सरकत राहील. बुधवारच्या रवी-नेपच्यून शुभयोगाच्या आसपास विज्ञान आणि धर्मकृतीमधून चमत्कार घडून येतील. प्रगतीच्या नवीन प्रवासात मंगळ-हर्षल युतीने अपघात घडवून आणू नये यासाठी कृती आणि वेग यावर लक्ष ठेवावे. पैसा मिळेल, मंगल कार्य ठरेल, आप्तांच्या भेटी होतील. बढती बदली संभवते. व्यापारांत पैसा मिळेल.
दिनांक : १३ ते १५ शुभकाळ.
महिलांना : नवे बदल नेत्रदीपक यशाचे ठरतील.