Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९

काँग्रेससाठी अडथळ्याची शर्यत
जयप्रकाश पवार

काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादीकृत बंडाने चांगलाच हल्लकल्लोळ उडविला आहे. परंपरेनुसार या खेपेलाही लोकसभेमध्ये नवव्यांदा प्रतिनिधित्वाची तयारी करणाऱ्या माणिकराव गावितांना उपरोक्त बंडाने सळो की पळो करून सोडले असले तरी दोघांचे भांडण अन् तिसऱ्याला लाभ या म्हणीप्रमाणे तशा संधीचा फायदा उचलण्यासाठी गतनिवडणुकीत संधी हुकलेले भाजपचे डॉ. सुहास नटावदकर सज्ज झाले आहेत.

साऱ्यांची भिस्त ‘क्रॉस कनेक्शन’वरच!
अभिजीत कुलकर्णी

मतदारसंघ पुनर्रचनेमुळे प्रदीर्घ कालावधीनंतर खुल्या झालेल्या धुळे मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक असणे स्वाभाविकच होते. त्यातच नव्या रचनेत या लोकसभा मतदारसंघातले तीन विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्य़ातले तर तीन धुळे जिल्ह्य़ातले, म्हणजे ‘फिप्टी-फिप्टी’ अशी विभागणी झाली. परिणामी, दोन्ही जिल्ह्य़ातल्या नेतेमंडळींच्या आकांक्षांना घुमारे फुटले असून त्यामुळेच की काय, येथे दोन आजी व दोन माजी आमदारांनी एकमेकाविरोधात शड्डू ठोकले आहेत. त्यातच काँग्रेसमधील गटबाजीमुळे ही निवडणूक चर्चेचा विषय बनली आहे.

अवधच्या लढाईतही सपाला झळ बसणार
सुनील चावके

उत्तर प्रदेशात येत्या २३ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील १७ जागांसाठी होणाऱ्या मतदानात अवधच्या लढाईचा पूर्वार्ध रंगणात आहे. अमेठी, सुलतानपूर, प्रतापगढ, बांदा, कौशांबी, फुलपूर, अलाहाबाद, फैजाबाद, आंबेडकरनगर, कैसरगंज, श्रावस्ती, गोंडा, डुमरियागंज, बस्ती, संत कबीरनगर, जौनपूर आणि भदोही या बहुतांश अवध प्रांतातील लोकसभा मतदारसंघांमध्ये समाजवादी पार्टीचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी बसप, भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार चुरस आहे. नेहमीप्रमाणे ठाकूर विरुद्ध ब्राह्मण किंवा ठाकूरविरुद्ध मुस्लीम, दलित, ओबीसी, कुर्मी असेच या लढाईला स्वरुप लाभणार आहे.

आई-बाबा मतदान करा
शेकडो मुलांचे पालकांना आवाहन

मुंबई, १४ एप्रिल/ खास प्रतिनिधी

आई-बाबा तुमचे मोलाचे मत या लोकसभा निवडणुकीच्या वेळी देण्यास विसरू नका..पाच वर्षांतून एकदाच ही संधी मिळत असते. आमच्या उद्याच्या भवितव्यासाठी चांगले उमेदवार निवडून देणे हे तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही जर मतदान केले नाही तर त्याचा परिणाम उद्या आमच्यावर होऊ शकतो.. विविध शाळांतील शेकडो मुले आपल्या आई-वडिलांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी पत्र लिहिणार आहेत. कोणीही निवडून आले तरी आपल्या परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही. सारेच चोर आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करू
छगन भुजबळ यांचे मराठा आरक्षण समन्वय समितीला आश्वासन
नाशिक, १४ एप्रिल / प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला कधीही विरोध नव्हता, केवळ ओबीसींच्या आरक्षणास धक्का न लावता ते दिले जावे एवढाच मुद्दा आपण मांडला असून आरक्षण मिळवून देण्याकरिता आपण स्वत प्रयत्न करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

आठवणीतल्या निवडणुका..
‘कालिफिक्सन’वाले!

टीव्हीवर चहाची एक जाहिरात नेहमी लागते. निवडणुकीत मत मागण्यासाठी दारात आलेल्या ‘रउऌडडछ ऊफडढ-डवळ’ उमेदवाराला सुशिक्षित, सुसंस्कृत तरुण मतदार धीटपणे विचारतो- ‘‘व्होट मांगने आए हो.. देश चलाना हैं आपको.. क्या क्वालिफिकेशन हैं आपकी?’’
त्यावर उमेदवाराचा पंटर म्हणतो- ‘‘क्या कालिफिक्सन? अरे, दस साल का राजनीतीका अनुभव हैं..!’’

तिसऱ्या आणि चौथ्या आघाडीला मतदान करून मत वाया घालवू नका -राजीव शुक्ला
मुंबई, १४ एप्रिल / खास प्रतिनिधी

आतापर्यंतच्या सर्वच मतदानपूर्व सर्वेक्षणात यूपीए आघाडीवर असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले असून, तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीला मतदान करून आपले मत वाया घालवू नये, असे आवाहन काँग्रेसचे प्रवक्ते खासदार राजीव शुक्ला यांनी आज केले. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीच्या उमेदवारांना मतदान केल्यास धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होईल. त्यापेक्षा या आघाडय़ांना मतदान करू नये, असे मत खासदार शुक्ला यांनी पत्रतार परिषदेत व्यक्त केले. लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी या दोघांनाही दहशतवादाच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही. कारण मोदी यांनी हिंसाचाराला उत्तेजनच दिले होते व अशा मोदींना अडवाणी यांनी पाठीशी घातल्याचा आरोप शुक्ला यांनी केला. लालकृष्ण अडवाणी हे सातत्याने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर दुबळे व कमकुवत पंतप्रधान अशी टीका करीत होते. यामुळेच पंतप्रधानांनी अडवाणी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिल्याचे शुक्ला म्हणाले. आयपीएलच्या सामन्यांना केंद्र सरकारने परवानगी नाकारली नव्हती. फक्त सुरक्षेच्या मुद्दय़ावर तारखांचा मेळ जमत नव्हता. त्यामुळे हे सामने आता भारताबाहेर आयोजित करण्यात आल्याची माहिती शुक्ला यांनी दिली.