Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नाथपंथी गोसावी समाज संघटित होण्याची गरज
मेळाव्यातील सूर
नाशिक / प्रतिनिधी

 

समाजातील सर्व घटक संघटित झाल्याशिवाय नाथपंथी गोसावी समाजाच्या समस्या सुटणार नाहीत, असा विचार येथील पंडित पलुस्कर सभागृहात नाथपंथी समाजातर्फे आयोजित राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याप्रसंगी मांडण्यात आला. नाथपंथी समाज शैक्षणिक क्षेत्रात अद्यापही मागे असल्याने त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मतही विविध मान्यवरांनी व्यक्त केले.
मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक विकास आयुक्त प्रकाश चव्हाण, जिभाऊ गुंजाळ, कला भ्रमंती संस्थेचे शरद उगले, श्रावणी इव्हेंट मॅनेजमेंटचे ईश्वर जगताप, माधवी जाधव, अरूण पवार, संचालक सचिन गायकवाड, हिराबाई गायकवाड, मुक्ता इंगळे आदी उपस्थित होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी शिवाजी शिंदे होते.
यावेळी नाथपंथी समाजाच्या ‘आदेश’ या अनियत कालिकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांचा हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नाथपंथी गोसावी समाजाच्या माध्यमातून समाजातील अडीअडचणी सोडविण्यासह समाज संघटीत करणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवाजी शिंदे, जिभाऊ गुंजाळ, प्रकाश चव्हाण, मुक्ता इंगळे आदींची भाषणे झाली. मेळाव्यात १०१ वधू-वरांनी परीचय करून दिला. प्रास्तविक सचिन गायकवाड यांनी केले. सूत्रसंचलन माधवी जाधव व योगेश बर्वे यांनी केले.