Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९

पायाभूत सुविधांमध्ये वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य
प्रश्न जिव्हाळ्याचे; दृष्टी उमेदवारांची

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ‘नाशिक वृत्तान्त’च्या माध्यमातून केंद्र सरकारशी संबंधित स्थानिक पातळीवरील विविध प्रलंबित प्रश्नांकडे ‘प्रश्न जिव्हाळ्याचे’ या मालिकेतून लक्ष वेधण्यात आले. पण, केवळ प्रश्न मांडून उपयोग नाही, स्थानिक खासदारांकडून याबाबत पाठपुरावा झाला तरच नाशिकच्या विकासाला नवा आयाम मिळू शकतो. हे लक्षात घेता, लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा प्रस्तुत प्रश्नांकडे पहाण्याचा दृष्टीकोन कसा आहे, प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांच्या काही योजना आहेत का, या विषयी जाणून घेतलेली त्यांची मते, त्यांच्याच शब्दात..

रेणके आयोगाची राजकीय पक्षांकडून उपेक्षा
भटके-विमुक्त साहित्य संमेलनात मान्यवरांचे मत
नाशिक / प्रतिनिधी
भटक्या-विमुक्तांच्या कल्याणासाठी शिफारशी करणारा रेणके आयोग सर्व राजकीय पक्षांकडून उपेक्षित आहे, अशी खंत येथे आयोजित भटके-विमुक्त राज्यस्तरीय साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड यांनी व्यक्त केली. याप्रसंगी स्वागताध्यक्ष सुरेश मेणे, सहस्वागताध्यक्ष निर्मला गोसावी व्यासपीठावर उपस्थित होते. केंद्र शासनाने अनुसूचित जाती-जमाती आयोगाप्रमाणेच रेणके आयोगाला अधिकार द्यावेत आणि त्यांच्या शिफारशी त्वरीत अमलात आणाव्यात यासह पाच ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आले.

नाथपंथी गोसावी समाज संघटित होण्याची गरज
मेळाव्यातील सूर
नाशिक / प्रतिनिधी
समाजातील सर्व घटक संघटित झाल्याशिवाय नाथपंथी गोसावी समाजाच्या समस्या सुटणार नाहीत, असा विचार येथील पंडित पलुस्कर सभागृहात नाथपंथी समाजातर्फे आयोजित राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याप्रसंगी मांडण्यात आला. नाथपंथी समाज शैक्षणिक क्षेत्रात अद्यापही मागे असल्याने त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मतही विविध मान्यवरांनी व्यक्त केले.

नाशिकमध्ये पवारांचा षटकार, मनसेचा चौकार तर..
नाशिक / प्रतिनिधी

राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्यासाठी शरद पवार, छगन भुजबळ, आर. आर. पाटील, अजित पवार, विलासराव देशमुख, अरूण गुजराथी, नबाब मलिक यांसह इतर नेत्यांच्या सभांचे आवर्तनावर आवर्तन सुरू असताना आणि मनसेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी राज ठाकरे यांनी सभांचा चौफेर धडाका उडविला असताना नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार दत्ता गायकवाड हे जाहीर सभांच्या आयोजनात पिछाडीवर पडल्याचे चित्र दिसत आहे. विरोधी पक्षनेते रामदास कदम या एकमेव बडय़ा नेत्याची सभा युतीसाठी झाली आहे.

डॉ. आंबेडकरांच्या मते संसदीय शासन पध्दती सर्वोत्कृष्ट
१९२९ च्या मे महिन्यात सायमन कमिशनने त्यांच्या अहवालात मुंबई प्रांतापासून कर्नाटक प्रांत वेगळा काढावा, अशी सूचना केली होती. ब्रिटीश सरकारच्या हेतूबद्दल शंका घेवून डॉ. आंबेडकरांनी या कारस्थानास विरोध केला. त्यांनी एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेला आपल्या देशात एकात्मतेच्या दृष्टीने किती महत्व दिले होते, हे त्यांच्या पुढील विधानांवरून स्पष्ट होते.

जागरूकपणे मतदान करा !
सुमारे १०१ कोटी लोकसंख्या असलेल्या खंडप्राय भारत देशात पंधराव्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. घोषणा आणि आश्वासनांचा भडीमार केला जात आहे. विकासाच्या विविध भूलथापा दिल्या जात आहेत. देशाचे आम्हीच हितकर्ते आहोत असे सर्वच प्रचार सभांमधून आवर्जून सांगितले जात आहे. मतदारांना निरनिराळ्या प्रलोभनांतून आकर्षित करण्याची अहमहमिका लागली आहे. मतदारांना नमस्कार करून तू आम्हाला पाव अशा प्रार्थना उमेदवार करीत आहेत. एकूणच प्रचार आरोप-प्रत्यारोपांनी रंगात आला आहे.

बाबुलाल अहमद सय्यद यांचे निधन
नाशिक / प्रतिनिधी

आडगाव येथील प्रगतीशील शेतकरी व आडगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी संचालक बाबुलाल अहमद सय्यद यांचे ६५ व्या वर्षी निधन झाले. अन्वर अहमद सय्यद यांचे वडील बंधू असलेले बाबुलाल अहमद सय्यद यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.