Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
विशेष

‘तरलते’ची उणीव
सध्याच्या मंदीच्या वातावरणावर मात करण्यासाठी जगभरातील सारेच देश कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग म्हणजे खासगी मागणीला प्रोत्साहन देणे. पण सध्याच्या वातावरणात ते सहजसाध्य निश्चितच नाही. यावर उपाय म्हणून सरकारी मागणीचे आणि सरकारी गुंतवणुकीचे प्रमाण वाढवणे यावर जोरदार भर दिला जात आहे. खासगी मागणीवर सरकारचे नियंत्रण असू शकत नाही; पण सरकारी मागणी तर त्याच्याच हातात असते. या अर्थाने अशी ‘तरलता’ सोपी असते. दुर्दैवाने ती तुलनेने सोपी असली तरी ती दीर्घकाळात प्रभावी तर सोडाच; साधी उपयोगीही ठरत नाही असाच आजपर्यंतच्या आर्थिक इतिहासाचा अनुभव आहे.

‘आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक’

इ.स. २००७ मध्ये भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात जवळजवळ सहा महिने मुक्काम ठोकून परतली. अंतराळातलं तिचं निवासाचं ठिकाण होतं- आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक. यामुळे सर्वसामान्य भारतीयांना या अवकाश स्थानकासंबंधी विशेषच कुतूहल निर्माण झालं. ‘अंतराळात’ म्हणजे नेमकं कुठे आहे हे स्थानक? तेथे किती अंतराळवीर असतात? किती मोठे आहे हे स्थानक- असे अनेक प्रश्न तेव्हापासून विचारले जात आहेत.
हे स्थानक आहे अंतराळात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३५० कि.मी. उंचीवर. गंमत म्हणजे या स्थानकाची ‘बांधणी’ अंतराळातच करण्यात येत असून, हे काम १९९८ साली सुरू झालं आणि २०११ मध्ये ते पूर्ण होईल अशी योजना आहे. हे स्थानक म्हणजे एक कृत्रिम उपग्रहच असून, तो आतापर्यंतच्या कोणत्याही कृत्रिम उपग्रहापेक्षा खूप मोठा आहे.

‘काय हो तात्यानू, काय झाला हो मोठा राजकारण तुमच्या रविवारच्या चाळीच्या मिटिंगीत?’
‘काय जातला, मारामाऱ्यो-हाणामारी झाल्यानी.’
‘अहो, ह्या तर नेहमीचाच आसा, मिटिंग म्हटली म्हणजे भांडणा जातलीच. पण यावेळी तुमची मिटिंग खूपच गाजल्यानी. निषेधाचो नवीन प्रकारय दिसलो, असा मी एैकला ता खरा काय?’
‘हा. म्हणजे तुका काय म्हणूचा आसा ता ओळखला म्यॉ.’
‘ओळखल्यात मा. मग सांगा काय ता.’
‘अरे बाबा, आमच्या चाळीची मिटिंग सुरु असताना रम्या सुवरे खसकन उठसो आणि त्येनी सेक्रेटरीच्या दिशेन निषेध व्यक्त करीत बूट फेकलो. त्याबरोबर एकच हाहाकार माजल्यानी.’
‘मग पुढे काय झाल्यानी?’
‘पुढे काय जातला, जेचेर बूट फेकललो तो तडकून उठलो आणि त्येनी सुव्र्यार आपलो बूट फेकलो. तो बूट त्येका लागूक नाय आणि त्याच्या शेजारी असलेल्या बबन्या मानकराच्या तोंडार आदळल्यानी.’
‘मग पुढे काय?’
‘मग पुढे काय जातला, परस्परार बूट फेकण्याची स्पर्धाच सुरु झाली. एकमेकाच्येर लोक बूटा फेकूक लागले. चाळीची मिटिंग आसा की बूट बाजार ताच समजूक नाय. बुटाचो हो ढिग जमा झाल्यानी. माझो शेजारी विज्या नायक बाबडो चप्पल घालून आयललो. त्येनी संधी साधून बूट नाय तर चप्पल तरी मारया म्हणून चप्पल भिरकवल्यानी. त्येचेर काही लोकांनी बोंबाबोंब केल्यानी-- चप्पल नाय फेकणत. निषेध करताना बूटच फेकूचो असो जागतिक नियम आसा.’
‘जागतिक नियम म्हणजे, त्या बुश सायबार फेकलो तोय बूटच होतो आणि दिल्लीत चिदूवर सरदारान फेकल्यानी तोय बूटच होतो. म्हणून तुमी ह्यो जागतिक नियम केल्यात की काय?’
‘तसा नाय आजवर जगात निषेध करताना सगळ्यांनी बूटच फेकले. कुणीच चप्पल फेकूक नाय. म्हणून आमकाय वाटता बूटच फेकूचो.’
‘तसा नाय फॉरेनाकय काय, नाय तर दिल्लीत काय, बूट फेकणारे हे चप्पल घालणाऱ्यातले नव्हते. ते बूटच घालीत. ते चपल्ला घालणारे असते तर त्येंनी फेकली असती चपल्ला.’
‘अरे बाबा, आमच्या कडे कोकणात चपल्लाकय मोठो मान असता. ती अशी फेकणत नाय. वेतोबाच्या देवळात नवस फेडताना देवाक चपलाच दितत.’
‘काय म्हणतात तात्यानू’
‘खरा आसा. तू जर कोकणातल्या वेतोबाच्या देवळात गेलय तर मोठय़ो आकारातल्यो चपलो दिसतत. लोक आपलो नवस फेडताना वेतोबाक चपलाचो जोड दितत. असा म्हणतत ह्योच चपला घालून वेतोबा रात्री गावच्या वेशीर फिरता आणि गावाचा रक्षण करता.’
‘काय जग आसा बघा, आपल्याकडे वेतोबाक चपलो दिवन् नवस फेडतत तर फॉरेनाक बूट फेकून निषेध व्यक्त करतत.’
‘त्यो जगातल्यो गजाली माका सांगू नकात हो. माका सांगा शेवटी मिटिंगात झाला काय?’
‘काय जातला, शेवटी सगळ्यांनी राजीनामे दिले आणि नवीन चाळ कमिटी नेमल्यानी’
‘कित्येक वर्षां आमचो प्रयत्न चल्ललो या समितीक हाकलूचो. मात्र मुंगळो जसो गुळाक चिकाटता तसे पदार चिकटून बसलेले.’
‘पण आता बरा झाला, नको होती ती समिती गेली शेवटी. मात्र त्येंका हाकलवूक बूट फेकूचो लागलो.’
‘आता माका दिसता, बूट फेकूची लाटच येयत.’
‘रोजच्यो मात्र बूट फेकूच्यो घटना झाल्यो तर कोण नाय एैकूचो. मगे बूट खाणारोय कोडगो जायत.’
‘पुढचा जावंदेत, सध्या तरी आमची समिती गेल्यान म्हणून आमी खुषीत आसोव.’
प्रसाद केरकर
prasadkerkar73@gmail.com