Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
  पर्याय अनेक, निर्णय मात्र एक!
  प्राध्यापकापेक्षा प्राथमिक शिक्षक होणे अवघड
  भूगोलाची व्याप्ती अमर्याद
  डीलिंग रूम ऑपरेटर
  बी एम्पॉवरमेंट!
  संशोधन अभिकल्पातील पूर्वग्रह
  ब्युटी इंडस्ट्रीतील व्यवसायाची संधी..
  एअरक्राफ्ट मेटेनन्स इंजिनीअरिंग
  एच. आर. मनुष्यबळ क्षेत्रातील उत्तुंग करिअर
  उद्योग क्षेत्रातल्या व्यवस्थापनातील दरी

 

दहावीनंतर किंवा बारावीनंतर पाहिजे असलेल्या शाखेत अ‍ॅडमिशन मिळायला हवी आहे..! किंवा नक्की कोणती निवडावी हेच समजत नाही.. किंवा पी. जी. एंट्रन्स एक्झामसारख्या (पदव्युत्तर प्रवेश परीक्षा) स्पर्धात्मक परीक्षांमध्ये खूप छान स्कोअर हवा आहे..! किंवा पहिल्यापासून ठरवलंय खरं, व्यवसायातच पडायचं! पण.. इत्यादी यासारख्या अनेक घटना आपल्याला, आपल्या मनासारख्या घडायला हव्या असतात. पण कित्येकदा होत काय की, प्रत्यक्षात पाहिजे तेवढी अपेक्षित उंची साधता येत नाही. किंवा काही वेळा असेही होते की, द्विधा मनस्थिती, परिस्थितीचा दबाव, ताण, होईल की नाही याची भीती, चिंता, निराशा, औदासिन्य, नाउमेद इत्यादी गोष्टींनी मन घेरले जातं आणि मग शेवटी यश लांबच राहातं. अप्राप्य ठरतं!
तेव्हा या नकारात्मक गोष्टींचे बादल मनातून मनापासून हटवायचे असतील तर बी-एम-पॉवरमेंट (बॉडी- माइंड- पॉवरमेंट) तथा मेंटल ट्रेनिंग हे विशिष्ट शास्त्र जादूसारखे काम करते.
रात्रीचा अंधार- अंधारातील गडद सावल्यांचा खेळ जसा सूर्याचा पहिला किरण पडताच नाहीसा होतो तसेच बी-एम-
 

पॉवरमेंटने होते. हे ऊर्जेचेच शास्त्र आहे. या बी-एम-पॉवरमेंटची आताच एवढी गरज का निर्माण झाली? याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आजच्या जगाचा वाढलेला प्रचंड ‘स्पीड!’
शेती व त्यानंतरच्या यंत्र युगापासून आतापर्यंत जग ५० पटींनी वेगवान बनलंय! विज्ञानाने बहाल केलेल्या ‘कळ (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) युगा’त नॉलेज वर्कर्स आणि माहितीचा महापूर उसळलाय.
आजच्या जगातील सर्वात नाशवंत चीज जर कोणती असेल तर ती फळे, भाजीपाला, दूध हे नसून ‘ज्ञान’ हे ठरले आहे. कालचे ज्ञान आज निरुपयोगी ठरतंय. रोज नवीन काहीतरी निर्माण होतंय. एकीकडे अत्यंत जलद, प्रगत युगाचे आपण ‘साक्षीदार’ ही एक प्रचंड सुखद भावना आहे. तर दुसरीकडे त्याचबरोबर पुन्हा या ५० पटींनी वाढलेल्या वेगाला सामोरे जाणे, हे आव्हानपण पेलायचं आहे. नाही तर आपण कोपऱ्यात फेकले जाऊ.
शिवाय आणखी प्रचंड नवीन शोध येऊ घातले आहेत. ‘भूक’- अन्नधान्याच्या टंचाईवर आंब्याच्या झाडासारखी गव्हाच्या धान्याची झाडे निर्माण करण्यावर संशोधन चालू आहे आणि बहुतांश प्रमाणात ते यशस्वी होत आले आहे. आपण एका अद्भुत जगात प्रवेश करीत आहोत. उद्याचे जग हे यंगस्टार्सचे तरुण पिढीचे आहे. त्यांच्यामुळे भारत महासत्ता बनणार आहे आणि ते स्वप्न काही फार दूर राहिलेले नाही.
सुरुवात तर व्हायलाच लागली आहे. ऑलिंपिकमध्ये भारताला जवळजवळ १०-१५ वर्षांनी सुवर्णपदक मिळाले आहे. ते मिळवणारा अभिनव बिंद्रा त्याच्या मुलाखतीत म्हणाला ५० टक्के बी.एम. पॉवरमेंट आणि ५० टक्के शूटिंगचा सराव यांच्या एकत्रीकरणातूनच हे सोनेरी यश संपादन करणे शक्य झाले.
आजच्या जगाचा सक्सेस पासवर्ड बी-एम पॉवरमेंट हा बनला आहे. आता इ.ट.ढ. म्हणजे नक्की काय? ही संकल्पना थोडक्यात पाहू!
माणसाचा मेंदू हे निसर्गाकडून आपल्याला लाभलेले एक अद्भुत असे सर्वश्रेष्ठ वरदान आहे. निसर्गाची ती नितांतसुंदर भेट आहे.
हा मेंदू खरं तर इतर प्राणिमात्रांपेक्षा वेगळा ठरलाय, सरस ठरलाय तो त्यातील ‘निओकार्टेक्स’ या विकसित भागामुळे! हा भाग मुख्यत: विचार करणे, घटना समजावून घेणे, त्यानुसार निर्णय घेणे याच्याशी निगडित आहे. म्हणजेच बुद्धिमत्तेशी संबंधित व विचार करणे ही या भागाची खासियत!
तर चिम्बिक सिस्टिममध्ये भावनांशी संबंधित क्रिया-प्रक्रियेचे कार्य चालते. हिप्पोकॅम्पसमध्ये लाँग टर्म मेमरी, थॅलॅमस हे रिले सेंटर सेरेब्रमशी निगडित तर हायपोथॅलॅमस-ऑटोनॉमिक नव्‍‌र्हस सिस्टिम आणि अ‍ॅण्डोक्राईनशी संबंधित!
खरे तर इतके खोलात शिरण्याचे कारण असे की, विचार हे आपल्या मेंदूतील दुधारी शस्त्र आहे. विचारांमुळेच आपण एकीकडे प्रचंड प्रगती साधली आणि विचारांद्वारेच दुसरीकडे.. अधोगती..!
..तर विचार केल्यामुळे मेंदूमध्ये सूचना क्रिया-प्रतिक्रिया-निर्णय इ. क्रिया कार्यान्वित होतात. वेगवेगळ्या भावनांचे, स्मृतींचे विश्लेषण मेंदूत होत असते. हे होत असताना शेकडो न्यूरोट्रान्समीटर्स कमी-जास्त प्रमाणात मेंदूत वेगवेगळ्या ठिकाणी सक्र्युलेट होत असतात.
डोपामिन आणि सिरोटोनिन वा न्यूरोट्रान्समीटर्सवर सगळ्यात जास्त संशोधन झालेले आहे. आणि त्याचा निष्कर्ष असा आहे की, ‘डोपामिन’ वाढले तर स्किझोफ्रेनियासारखे आजार व कमी झाले तर पार्किन्सोनिझमसारखे आजार.
तर ‘सिरोटोनीन’ कमी झाले तर डिप्रेसिव्ह मूड होतो. सायकिअ‍ॅट्रिस्टकडून बऱ्याच वेळा औषधे दिली जातात. सिरोटोनीन आणि डोपामिनच्या बॅलन्ससाठीच इतके याचे महत्त्व आहे.
आणि या न्यूरोट्रान्समीटर्सचे संतुलन राखणे या महत्त्वाच्या कार्याचे एक कारण विचारांवर अवलंबून असते.
म्हणजेच इथे ‘विचारांच्या विचारांवर विचारांनी नियंत्रण मिळविणे’, हे प्रचंड आवश्यक ठरते. आणि इथे येते बी. एम. पॉवरमेंट!
हे उर्जेचे, उर्जेच्या नियमनाचे शास्त्र! विचारांमुळे ऊर्जा निर्माण होते. ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. निगेटिव्ह ऊर्जा प्रगतीत अडथळा आणते. मनाचे सामथ्र्य खच्ची करते व अंती आजारांना आमंत्रण करते. कसे आणि काय ते आपण मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर्सच्या इनबॅलन्समुळे हे आपण पाहिलेच!
तेव्हा भावना आणि विचार यांचा योग्य मेळ राखणे व त्याद्वारे मनाचे प्रचंड सामथ्र्य ईप्सित साध्य करण्यासाठी वापरणे बी. एम. पॉवरमेंटचे मुख्य उद्दिष्ट!
आपल्याला माहीतच आहे की, आत्तापर्यंत ह्य़ुमन ब्रेन ४ह्ण ते ५% इतकाच वापरला गेलाय. म्हणजेच ९०% ते ९५% मेंदू अजून वापरायचाय!
तर बी. एम. पॉवरमेंटमधील विशिष्ट ब्रिदिंग एक्सरसाईझ कार्यक्षमता वाढविण्यासाठी फार उपयोगी पडतात. तसेच कॉम्प्युटरला जसे विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर किंवा प्रोग्रॅम फिड केला जातो. तसाच विशिष्ट गोल किंवा ध्येय साध्य करण्यासाठी इ-ट-पॉवरमेंटमधील काही खास मुद्दे आहेत जसे की,
१) स्वयंसूचना तंत्र, (याचा उपयोग बहुतेक टेनिस प्लेअर व मोनिका सेलेस जास्त करत होती.) २) पिक्चरायझेशन ३) पंचसूत्री योजना ४) सहा रंगांचे रूमाल ५) सेल्फ कॉन्व्हरसेशन ६) स्वीट कॉन्व्हरसेशन ७) मास्टर की ८) काईझेन टेक्निक ९) लाईट हाऊस १०) सक्सेस थिअर ११) टाईम मॅनेजमेंट १२) यशो-शिखराच्या दिशेने इत्यादी.
या माइंड प्रोग्रॅमिंगमुळे आपण मनाचे कंडिशनिंग तोडू शकतो. भीती, वाईट
स्मृती, द्विधा मनोभूमिका, मेंटल स्ट्रेस इ. आपल्या प्रगतीत अडथळा आणणाऱ्या गोष्टींना आपण सहजपणे बाजूला सारून एका सुंदर जीवनमार्गाकडे वाटचाल करू शकतो.
सविता वैद्य