Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
  पर्याय अनेक, निर्णय मात्र एक!
  प्राध्यापकापेक्षा प्राथमिक शिक्षक होणे अवघड
  भूगोलाची व्याप्ती अमर्याद
  डीलिंग रूम ऑपरेटर
  बी एम्पॉवरमेंट!
  संशोधन अभिकल्पातील पूर्वग्रह
  ब्युटी इंडस्ट्रीतील व्यवसायाची संधी..
  एअरक्राफ्ट मेटेनन्स इंजिनीअरिंग
  एच. आर. मनुष्यबळ क्षेत्रातील उत्तुंग करिअर
  उद्योग क्षेत्रातल्या व्यवस्थापनातील दरी

 

फार पूर्वीपासूनच सौंदर्याला विशेष महत्त्व दिले जात होते आणि आजही त्याचे महत्त्व तसेच टिकून आहे. पूर्वी सौंदर्यवृद्धीकरिता विशेष साधने उपलब्ध नव्हती. पण आधुनिकीकरणाने, बदलत्या जीवनशैलीमुळे सौंदर्यवृद्धीकरिता अनेक साधने बाजारात उपलब्ध झाली आहेत व सौंदर्यवृद्धीकरिता बाहेर जाणाऱ्या विशेषत: ऑफिसला, कामाला जाणाऱ्या स्त्रियांचा ओघ हा ब्युटीपार्लरकडे जास्त दिसतो. आज केवळ शहरामध्ये ब्युटीपार्लरचे प्रस्थ वाढले नसून कित्येक निमशहरांमध्ये छोटय़ा गावांतही ब्युटीपार्लर सुरू केले जात आहे. या पार्लरमध्ये
 

केवळ ग्राहकांचा ओघ नसतो तर पार्लरमध्ये शिकण्यासाठीदेखील कित्येक मुली, महिला येतात. अशा प्रकारे ब्युटी पार्लर व्यवसायातून केवळ कामातूनच नव्हे तर प्रशिक्षणामार्फतही अधिक पैसे मिळवता येतात. पार्लर सुरू करणारी महिला ही ब्युटी पार्लरच्या ज्ञानाने युक्त असावी. तिला सर्व सौंदर्यप्रसाधनाची माहिती असावी.
आवश्यक कोर्स
ब्युटी क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी ब्युटी पार्लरचा बेसिक आणि अ‍ॅडव्हान्स कोर्स असे दोन स्वरूपाचे कोर्स करता येतात. बेसिक ब्युटी पार्लर कोर्समध्ये फेशिअल्स, मेकअप ब्लिचिंग, व्ॉक्सिंग, थ्रेडिंग, मॅनिक्युअर, पॅडिक्युअर, हेअर कट असे प्रकार मोडतात. तर अ‍ॅडव्हान्स कोर्समध्ये जनरल अ‍ॅस्थेटिक्स (मशीन ट्रीटमेंट), बॉडीथेरेपी, स्पा ट्रीटमेंट असते.
फेशिअल्स-
फेशिअल्स या प्रकाराला प्रचंड मागणी आहे. चेहरा आकर्षक दिसण्यासाठी वैविध्यपूर्ण मसाजने चेहरा उजळण्याचे काम फेशिअल्समध्ये असते. फेशिअल्सचे विविध प्रकार आहेत. गोल्ड फेशिअल, अ‍ॅरोमा फेशिअल, हर्बल फेशिअल, सिल्वर फेशिअल, डायमंड फेशिअल, पर्ल फेशिअल, फ्रूट फेशिअल आणि असे अनेक प्रकार फेशिअल्समध्ये मोडतात.
ब्लीचिंग, वॅक्सिंग, थ्रेडिंग-
ब्लीचिंगच्या माध्यमातून चेहऱ्यावरील अनावश्यक लव (केस) ट्रीटमेंटने सोनेरी केले जातात. व्ॉक्सिंगच्या माध्यमातून हातापायावरील अनावश्यक केस ट्रीटमेंटने काढून टाकले जातात. थ्रेडिंगने आयब्रो, तसेच फोरहेड, अपरलिप्स हेअर रिमूव्हिंग केले जाते.
मॅनीक्युअर, पॅडिक्युअर-
मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअरच्या साहाय्याने हात आणि पायांची स्वच्छता केली जाते व ते अधिक आकर्षक केले जातात. त्यामध्ये नेलकटिंग, शेपिंग, क्लिनिंग असे अनेक प्रकार मोडतात. तसेच हातपायांना मसाज असतो.
मेकअप-
मेकअपमध्येसुद्धा अनेक प्रकार मोडतात. छोटय़ा समारंभासाठी अगदी साध्या मेकअपपासून, पार्टीवेअर मेकअप, ब्रायडल मेकअप असे अनेक प्रकार मेकअपमध्ये मोडतात. साधा मेकअप शिकून अशा विविध प्रकारच्या मेकअपमध्ये प्रावीण्य मिळवता येते. मेकअपमध्येसुद्धा स्पेशलायझेशन करून मेअकप आर्टिस्ट म्हणून करिअर करता येऊ शकते.
हेअरकट- यामध्ये हेअरस्टायलचे विविध प्रकार येतात. यू कट, ब्लंट कट, डीप यू कट, लेयर कट, व्ही कट, बॉय कट, स्टेप कट असे वैविध्यपूर्ण कट्स असतात. हेअर ड्रेसिंग याचा जर संपूर्ण अभ्यास केला तर त्यात हेअर कटिंग, हेअर स्टायलिंग, कलरिंग, ट्रायकोलॉजी यांसारखे विषय अंतर्भूत होतात. हेअर ट्रीटमेंट, हेड मसाज, ड्रँडफ ट्रीटमेंट अशा ट्रीटमेंटस् असतात. ट्रायकॉलॉजीमध्ये केस आणि डोक्यावरील त्वचा यांचे दोषनिवारण करून केसांच्या समस्या कमी करण्याचे काम केले जाते. हेअर कलरिंग, हेअर पमिंग, हेअर स्ट्रेटिनग असे विषय अतर्भूत होतात.
हेअरड्रेसिंग यामध्ये हेअरस्टाइलचे विविध प्रकार येतात.
मशीन ट्रीटमेंट/ जनरल अ‍ॅस्थेटिक्स-
पिंपल ट्रीटमेंट, चेहऱ्यावरील डाग आणि खड्डे यासाठी पील ट्रीटमेंट, पिंगमेंटशन ट्रीटमेंट शुष्क आणि निस्तेज त्वचा सुधारण्यासाठी खास प्रक्रिया, त्वचा तरुण दिसण्यासाठी फेस बायोलिफ्ट, स्किन टाइप करण्यासाठी टायनटिंग, टोनिंग अशा अनेक प्रक्रियांचा समावेश आहे.
बॉडीथेरपीमध्ये-
बॉडीथेरपीमध्ये बॉडी मसाज, आहार, व्यायाम अशा गोष्टी येतात. यामध्ये अ‍ॅरोमाथेरपी, रिफलेक्सॉलॉजी, अ‍ॅक्युप्रेशर आणि पंक्चर, एम. एल. डी. हॉस्टेनथेरपी, रेकीसारख्या अनेक थेरपी यात शिकवल्या जातात.
पार्लरसाठी जागा-
पार्लरसाठी जवळजवळ ३५० ते ४०० स्क्वे. फूट जागेची आवश्यकता आहे. स्वत:च्या मालकीची जागा घेऊ शकतो वा भाडेतत्त्वावर जागा घेता येते.
आवश्यक मशीन्स-
हेअर ड्रायर ओझोन मशीन, स्टिमर, मायक्रो करंट, व्हायब्रेटर, ब्रशिंग युनिट इ.
व्यवसायाची संधी-
बेसिक ब्युटीपार्लर कोर्स केल्यावरसुद्धा छोटय़ा स्वरूपावर ब्युटी बिझनेस घरच्या घरी करता येऊ शकतो. फेशियल्स, ब्लीच, थ्रेिडग अशा ब्युटी ट्रीटमेंटस् क्वाएंटला घरीसुद्धा तुम्ही देऊ शकता. शिवाय मेहंदीचा कोर्स केला असेल तर लग्नातील नववधूची मेहंदीची ऑर्डर घेऊ शकता. ब्रायडल मेहंदी, ब्रायडल मेकअपची ऑर्डर घेऊनसुद्धा सुरुवातीला कमाई करू शकता येईल व हळूहळू जम बसू लागल्यावर स्वत:चे ब्युटी पार्लर सुरू करता येऊ शकेल.
कौशल्याची गरज व स्कोप-
ब्युटीपार्लर कोर्समध्ये कौशल्याची खूप आवश्यकता आहे. नावीन्यता आणि सराव यांची सांगड घालून तुम्हाला ब्युटी इंडस्ट्रीमध्ये उत्तम व्यवसाय करता येईल. सलून, लेडीज पार्लर, फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेकअप आर्टिस्ट, हेअर ड्रेसर म्हणून काम करता येऊ शकेल.
कोर्सेस -
स्वित्र्झलडच्या सिडेस्को (CIDISCO) संस्थेची आंतरराष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेतली जाते. यामध्ये बेसिक ब्युटी, जनरल अ‍ॅस्थेटिक्स आणि बॉडी हे विषय अंतर्भूत असतात. या कोर्सला जगभर मान्यता आहे.
सीबटॅक (CIBTAC) ही इंग्लंडची परीक्षा असून, बॅब टेक या संस्थेशी संलग्न आहे. तीन महिन्यांत प्राथमिक विषय शिकून ही परीक्षा देता येते. कॉमनवेल्थ देशामध्ये त्याला मान्यता आहे.
ब्युटी आणि डेअर ड्रेसिंग हा सहा महिने पूर्णवेळ किंवा अर्धवेळ कोर्स उपलब्ध आहे.
ब्युटी इंडस्ट्रीतील प्रशिक्षण संस्थांचे पत्ते-
सरलाज् ब्युटी अ‍ॅकेडमी
राम मारुती रोड, ठाणे. निहारिका, पोखरण रोड नं. २, ठाणे
अकबर पीरभाई गर्ल्स पॉलिटेक्निक, मुंबई-९२, डॉ. डी. एन. रोड, मुंबई.
येथे एक वर्षांचा ब्युटी केअरचा डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे.
शहनाज हर्बल वुमेन्स इंटरनॅशनल, मुंबई.
हबीब हेअर अ‍ॅकेडमी
ब्युटी इंडस्ट्री हे एक सृजनात्मक, आव्हानात्मक आणि वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे. ज्यामध्ये व्यवसायास भरपूर वाव आहे. हे उद्योग क्षेत्र झपाटय़ाने विकसित होत आहे. या क्षेत्रामध्ये यश मिळविण्यासाठी जनसंपर्क, सुसंवाद साधण्याचे
कौशल्य, आत्मविश्वास, कल्पकता असणे खूप गरजेचे आहे
सारिका भोईटे-पवार
फोन: ९८१९५९७१३२/ २५३७९९४४.