Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
  पर्याय अनेक, निर्णय मात्र एक!
  प्राध्यापकापेक्षा प्राथमिक शिक्षक होणे अवघड
  भूगोलाची व्याप्ती अमर्याद
  डीलिंग रूम ऑपरेटर
  बी एम्पॉवरमेंट!
  संशोधन अभिकल्पातील पूर्वग्रह
  ब्युटी इंडस्ट्रीतील व्यवसायाची संधी..
  एअरक्राफ्ट मेटेनन्स इंजिनीअरिंग
  एच. आर. मनुष्यबळ क्षेत्रातील उत्तुंग करिअर
  उद्योग क्षेत्रातल्या व्यवस्थापनातील दरी

 

एअरक्राफ्ट मेटेनन्स इंजिनीअरिंग
हजारो टन वजन प्रचंड वेगाने वाहून नेणारे अवजड विमान आणि त्याचे तंत्रज्ञान अत्यंत संवेदनशील असते आणि म्हणूनच ते कोणत्याही तांत्रिक बिघाडाविना उड्डाण घेण्याच्या स्थितीत १०० टक्के सुसज्ज राहावे, याची विशेष काळजी घेतली जाते. विमानोड्डाण क्षेत्रातील ही महत्त्वाची जबाबदारी ‘एअरक्राफ्ट मेटेनन्स इंजिनीअरिंग (एएमई)’कडून पार पाडली जाते. विमानाची आणि पर्यायाने हवाई प्रवाशांची सुरक्षा ही सर्वस्वी ‘एएमई’वर अवलंबून असते. ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एअरोनॉटिक्स’ ही संस्था गेली २७ वर्षे एएमईच्या प्रशिक्षणात कार्यरत आहे. देशभरात संस्थेच्या कोलकाता, जमशेदपूर, पटना, भोपाळ आणि नवी दिल्ली येथे सात शाखा कार्यरत असून, संस्थेतील अनेक प्रशिक्षणार्थ्यांना भारतीय विमानोड्डाण क्षेत्रात वरिष्ठ
 

पदापर्यंत मजल मारली आहे. ‘आयआयए’कडे हॉकर एचएस-१२५ विमान आणि अनेक प्रकारच्या हेलिकॉप्टर्सचा ताफा आहे. या प्रशिक्षणक्रमासाठी प्रवेशासाठी किमान पात्रता म्हणून उमेदवार १०+२ परीक्षा किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण तसेच फिजिक्स व मॅथेमॅटिक्स विषयासह बी.एस्सी. उत्तीर्ण असायला हवा अथवा इंजिनीयिरग डिप्लोमाधारक असावा. अन्य तपशील www.iiagroup.in या वेबसाइटवर मिळू शकेल.
पर्यटन-व्यवसायविषयक खास उपक्रम
शाळा-कॉलेजना सुट्टय़ा हाच खरे तर आपल्याकडे पर्यटनाचा हंगाम असतो. टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. या पाश्र्वभूमीवर पर्यटन व्यवसायासंबंधी उपक्रम हाती घेऊ इच्छिणाऱ्या होतकरू उमेदवारांसाठी ‘अपना ट्रॅव्हल सव्‍‌र्हिसेस’तर्फे प्रशिक्षणक्रम योजला आहे. शाळा व महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला तरुण वर्ग, व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिला तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या मंडळींसाठी ‘अपना ट्रॅव्हल्स’च्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. पर्यटन व्यवसायासंबंधी प्रॅक्टिकल मार्गदर्शन संस्थेच्या नवी मुंबई, कांदिवली व ठाणे येथील शाखांमध्ये उपलब्ध आहे. संपर्क ई-मेल: vinapna@rediffmail.com


क्लिनिकल रिसर्च क्षेत्रातील करिअर संधींची कवाडे होतकरूंसाठी खुले करणाऱ्या मुंबईतील पवईस्थित ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर ट्रेनिंग इन क्लिनिकल रिसर्च (आयसीटीसीआर)’च्या कार्यकारी संचालिका आणि जोव्हिस क्लिनिकल रिसर्च प्रा. लि.च्या संचालिका डॉ. मेरी फ्रान्सिस यांचा ‘ऑल इंडिया बिझनेस अ‍ॅण्ड कम्युनिटी फाऊंडेशन’कडून या क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘भारत गौरव पुरस्कार’ देऊन न्यायमूर्ती एम. एस. ए. सिद्दिकी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, सोबत माल्टा प्रजासत्ताकाचे उच्चायुक्त विल्फ्रेड केनेली.