Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
  पर्याय अनेक, निर्णय मात्र एक!
  प्राध्यापकापेक्षा प्राथमिक शिक्षक होणे अवघड
  भूगोलाची व्याप्ती अमर्याद
  डीलिंग रूम ऑपरेटर
  बी एम्पॉवरमेंट!
  संशोधन अभिकल्पातील पूर्वग्रह
  ब्युटी इंडस्ट्रीतील व्यवसायाची संधी..
  एअरक्राफ्ट मेटेनन्स इंजिनीअरिंग
  एच. आर. मनुष्यबळ क्षेत्रातील उत्तुंग करिअर
  उद्योग क्षेत्रातल्या व्यवस्थापनातील दरी

 

एच. आर. म्हणजे मनुष्यबळ खात्याबाबत सर्वसाधारण समज खूप आहेत. (त्यापेक्षा गैरसमजही अधिक आहेत.) या खात्याला तसे खास काम नसते. नोकर-भरतीचा सीझन असेल तेव्हा ‘भरती’ आणि एरवी टीपी म्हणजे टाईमपास. पण वरकरणी या खात्याची जबाबदारी महत्त्वपूर्ण अशी आहे, कारण योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे! हे वरकरणी जरी साधे सरळ काम दिसत असलं तरी प्रत्यक्षात ते अवघड आहे. औद्योगिक क्रांतीनंतर फॅक्टरीज वाढल्या, त्यामुळे कामगारसंख्या वाढली. शेती कामगारांऐवजी औद्योगिक कामगारवर्ग शहरा-शहरांतून वाढत गेला. त्याचप्रमाणे ऑफिस कर्मचारीवर्ग वाढत राहिला. अर्थातच त्यांची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या समाज- कल्याणाची, सामाजिक सुरक्षिततेची जबाबदरी घेणं ही कामे आपोआप निघाली. त्याकरिता पूर्वीचं फक्त नोकर-भरती करणारं ‘पर्सोनेल खाते’ जाऊन एक सक्षम मनुष्यबळ खाते विकसित होऊ लागले. ज्यामध्ये नोकरभरती, कर्मचारी आरोग्य, आरोग्य विमा, अपघात-आपत्ती विमा अशी अनेक उपांगे विकसित झाली. अनेक
 

मोठय़ा कारखान्यांबाबतीत औद्योगिक निवासी वसाहती, मुलांसाठी शाळा, स्त्रियांसाठी समाज केंद्रे इ. गोष्टी स्थापन करण्याचा उपक्रम हाती घेतला गेला. अशा कामांसाठी बी.ए./ एम. ए. पदवीधर मंडळींना एच. आर.चे विशेष प्रशिक्षण किंवा सोशल वेल्फेअर विषयातील पदवी वा पदव्युत्तर शिक्षण पुरेसे असायचे. पूर्वी ‘लेबर वेलफेअर ऑफिसर’ या पदाकरिता नेमणुका व्हायच्या.
आज एच. आर. खूप अंगांनी विकसित झालेय, कारण मुळातच उद्योग- व्यवसायातील क्षितिजं प्रचंड प्रमाणात रुंदावलेली आहेत. कारण मुळातच उद्योगधंदा हा आता सरकारी व खाजगी अशा दोन्ही पातळीवर चोहोअंगांनी विकसित पावलेला आहे.
सरकारी कंपन्यांमध्ये ‘नवरत्न’ कंपन्या आहेत, बँका येतात आणि विविध क्षेत्रात, भौगोलिक स्तरावर त्या कार्यरत आहेत. दुसरीकडे खासगी क्षेत्रात परदेशी भांडवल सहभागाने कार्यकक्षा रुंदावलेली आहे. कॉडा सेंटर्स, बीपीओज्, केपीओज, विदेशी कंपन्या, बँका, आणि अनेक प्रकारचे खासगी उद्योग यांकरिता विविध शैक्षणिक गुणवत्तेच्ें व कौशल्ये असलेल्ें मनुष्यबळ लागते. त्यांच्या नेमणुका, त्यांची देखभाल, त्यांच्या बदली- बढतीचे नियोजन व प्रत्यक्षात व्यवस्थापन करण्यासाठी मनुष्यबळ खाते सांभाळणारी ‘कुशल टीम’ जवळ असण्याची किंवा त्यातील अनेक विभाग- उपविभाग कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी कुशल अधिकाऱ्यांची गरज आहे. किंवा ही सर्व कामे कंत्राटी पद्धतीने तरी करून घेता आली पाहिजेत.
एच. आर. मधील नवीन कामे-
जॉब अ‍ॅनेलिसीस, रिस्ट्रक्चरिंग अ‍ॅनेलिसीस, स्किल्स डेव्हलपमेंट, एम्प्लॉयी रिलेशन्स, रिक्रुटमेंट, स्पेशालिस्ट हायरिंग, बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, ट्रेनिंग, कॉम्पेन्सेशन इ. नव-नवीन कामे आता ‘एच. आर.’ या विषयाशी संबंधित म्हणून त्याकडे पाहिले जाते. ही सर्व कामे कार्यक्षमतेने करण्यासाठी तितक्याच तोलामोलाचे कार्यक्षम मनुष्यबळ असायला हवे. कारण प्रभावी संस्था- कंपनीसाठी परिणामकारक मनुष्यबळ धोरण असणं हेदेखील व्यवस्थापनाचा एक प्राणच समजल्ें जाते.
‘एमबीए’ या संकल्पनेचा गेल्या दोन-तीन दशकांत चांगलाच प्रभाव वाढलेला आहे. बिझनेस किंवा अ‍ॅडमिनिस्ट्रेशन तसेच मार्केटिंग-फायनान्स अशी स्पेशलाईज्ड एम.बी.ए. आहेत. त्याप्रमाणे एच. आर. मध्ये स्पेशलायझेशन करण्याला महत्त्व आहे. कारण व्यापार-व्यवसाय वृिद्धंगत झाल्यावर त्यातील मनुष्यबळाचे व्यवस्थापन करण्यासाठी तितकीच अधिकारी व अनुभवसंपन्न माणसे असायला हवीत. एखाद्या फॅक्टरीच्या पर्सोनेल मॅनेजरकडे कॉलसेंटरच्या भरतीची किंवा प्रशिक्षणाची जबाबदारी सोपवल्यावर ती तो नुसतीच पार पाडेल? की ती त्याने सर्वोच्च कार्यक्षमतेने पार पाडावी अशी अपेक्षा असल्यास त्याच्याकडे कॉल सेंटरबाबतीत जे कौशल्य, निपुणता असायला हवी ती नसल्यास काय होईल? या दृष्टिकोनातून प्रत्येक क्षेत्राला पूरक असं मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी एम.बी.ए.- एच.आर. आणि अन्य अभ्यासक्रम सुरू झाले.
एकेकाळी टाटा इन्स्टिटय़ूट किंवा कोलकात्याच्या आयआयपीएममध्येच ‘एच.आर.’मधील विशेष अभ्यासक्रमाची सोय होती. तशी सोय आता अन्यत्रही सुरू झालेली आहे. पुण्यातील सिम्बॉयसिसमध्ये, मुंबईतील वेलिंगकर इन्स्टिटय़ूट, के. जे. सोमय्यातर्फे अगदी सहा महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंतचे ‘एच.आर.’ विषयातील कोर्सेस आहेत. पदवीधर विद्यार्थी एच.आर.मध्ये डिप्लोमा मिळवू शकतात किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाद्वारे पदविका/ पदवी प्राप्त करू शकतात. डिप्लोमा इन एचआरएम हा एक वर्षांचा नियमित बॅचचा तर सण्डे बॅचचा कोर्स उपलब्ध आहे. टाटामधून दोन वर्षांचा मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट व इंडस्ट्रियल रिलेशन्सही करता येतो. पर्सोनेल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन्स याबरोबरीने सोशल सायन्सेस, बिहेविरेयल सायन्स, एच आर, कम्युनिकेशन, पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इ. विषयांचा अंतर्भाव असतो.
एच. आर. आणि सध्याची स्थिती व भवितव्य
कुठलाही उद्योग- व्यवसाय घेतला की त्याच्या व्यवस्थापन प्रक्रियेत मनुष्यबळाचा सहभाग हा अनिवार्यच आहे. कितीही संगणकीकरण झाले, तरीदेखील हे व्यवस्थापन मनुष्यबळाकडेच राहणार. (पुढे रोबोंनी जर का या कामांचा ताबा घेतला तर मात्र गोष्ट वेगळी!)
आपल्याकडे एच.आर. या विषयाला अजूनही स्कोप आहे. कारण दिवसेंदिवस जसा उद्योग बहरतोय, त्यानुसार संकल्पना व व्याप्ती निश्चितच विस्तारते आहे. अजून तरी आपल्याकडे पारंपरिक एच.आर. टिकून आहे, पण बदलत्या काळानुसार धुनिक एच.आर. असणं ही गरज बनलेली आहे. त्यानुसार एम.बी.ए. स्तरावर एच.आर.चा अभ्यासक्रम हा गरजेनुरूप होत चाललेला आहे. स्टॅटिस्टिक्स व मॅथ्स घेऊन तसेच अकाऊंटिंग हा विषय घेऊन डबल एम.बी.ए. होता येते. अशांना ‘कॉम्पेनसेशन स्पेशालिस्ट’ म्हणून नोकरी मिळू शकते. संगणकीशास्त्र शिकल्यावर एच.आर.आय.एस. म्हणजेच 'वुमन रिसोर्सेस इन्फो सिस्टममध्ये पारंगत होता येते. चेंज मॅनेजमेंट, ऑटोमेशन अशा विशेष क्षेत्रात काम करता येते.
विदेशातील एच.आर.- यूकेमध्ये सीआयपीडी म्हणजे चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ पर्सोनेल अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट या संस्थेचे अभ्यासक्रम आहेत. तसेच ए.एस.टी.डी.- अमेरिकन सोसायटी फॉर ट्रेनिंग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट या शैक्षणिक संस्थेने १६ शॉर्ट टर्म कोर्सेस विकसित केले आहेत. सर्टिफिकेट- इम्ण्टॉयी बेनेफिट, कॉम्पेनसेशन प्रोफेशनल्स, बेनिफिट प्रोफेशनल्स, ग्लोबल रेम्युनरेशन, वर्क लाइफ सर्टिफाइड प्रोफेशनल्स.
आपल्याकडे मल्टीनॅशनल कंपन्या आलेल्या आहेत, पण अजून वरील प्रकारची क्वालिफिकेशन्सची - स्पेशलाइज्ड प्रोफेशनल्सची अपेक्षा करीत नाहीत. तोवर आपण स्वत:ला ‘अपग्रेड’ केले तर एच.आर.मधील नवीन पदे विदेशी माणसांकडे जाणार नाहीत. त्यासाठी देशींनी तयार असायला हवे!
राजीव जोशी
rmjoshi52@yahoo.co.in