Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आदिवासी जोडप्यांचे सामुदायिक विवाह
डोंबिवली / प्रतिनिधी

शबरी सेवा समितीतर्फे जव्हार तालुक्यातील जंगलपाडा येथे
२५ आदिवासी वधू-वरांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. आदिवासींमध्ये जनजागृती करण्यासाठी गेली अनेक वर्षे समितीतर्फे हे काम आदिवासी भागात केले जाते.
या विवाह सोहळ्यासाठी ‘श्वास’च्या लेखिका माधवी घारपुरे, समितीचे प्रमुख कार्यवाह प्रमोद

 

करंदीकर, रंजना करंदीकर, डॉ. त्र्यंबक मावळंकर,
डॉ. फडके, दीपक नेवासकर,
डॉ. त्रिंबक जोशी, बुधाजी गोंड उपस्थित होते. मंजुताई भट, सुवर्णा निमकर यांनी पौरोहित्य केले. आदिवासी भागात हळदी, गावजेवण, बॅन्डबाजा, मद्यपान यावर अधिक खर्च केला जातो. त्यामुळे अनेकांना परिस्थितीमुळे आपल्या मुलामुलींचे विवाह करणे अशक्य होते. परंपरागत चालत आलेली आर्थिक उधळपट्टीची प्रथा बंद पडून खर्च होणारा पैसा संसारासाठी कारणी लावला तर त्याचा उपयोग होऊ शकतो, हे आदिवासींना पटवून देण्यासाठी अनेक वर्षांपासून समिती आदिवासी भागात स्वखर्चाने सामुदायिक विवाह सोहळ्यांचे कार्यक्रम राबवित आहे.
गेल्या वर्षी ४० वधु-वरांचे सामुदायिक विवाह चाफेवाडी, खोंेडेवाडी येथे पार पडले.
समितीतर्फे वधू-वर जोडप्यांचे धार्मिक विधी पार पाडले जातात. त्यांना संसारोपयोगी वस्तू दिल्या जातात. कोणतीही आर्थिक झळ न लागता हे विवाह सोहळे पार पडत असल्याने आदिवासी बांधव उत्सुकतेने या उपक्रमात सहभागी होत असतो. हनुमंत पारधे हा विद्यार्थी पाडय़ा पाडय़ात जाऊन सामुदायिक विवाहाचे महत्त्व पटवून सांगण्याचे काम करत आहे. कमलाबाई गावित यांनी ‘कोनु बाई नवरा, महादेव नवरा, कोनु बाई नवरी, पारवती नवरी,’ ‘थाटी भरले गे इडे, पाटील मंडपी येवा, मांडव शोभित दिसा,’ यांसारखी लोकगीते गायिली.