Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
विविध

माधवन नायर, बहुगुणा, अभिनव बिंद्रा, हृदयनाथ मंगेशकर यांचा पद्म पुरस्कारांनी गौरव
नवी दिल्ली, १४ एप्रिल/खास प्रतिनिधी
महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंह पाटील यांच्या हस्ते आज इंडियन एक्सप्रेसचे मुख्य संपादक शेखर गुप्ता यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान केला. आज राष्ट्रपती भवनात झालेल्या शानदार समारंभात ६६ पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. मात्र, पद्मश्री पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंह आजच्या समारंभाला गैरहजर राहिले.

सहापक्षीय आण्विक चर्चेवर उत्तर कोरियाचा बहिष्कार
संयुक्त राष्ट्राच्या ठरावावर तीव्र प्रतिक्रिया
सोल, १४ एप्रिल/पीटीआय
उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रकार्यक्रमाविरोधात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने एकमुखी ठराव केल्यानंतर आता सहापक्षीय आण्विक चर्चेतून बाहेर पडण्याचा निर्णय उत्तर कोरियाने जाहीर केला आहे. संयुक्त राष्ट्राचा निर्णय हा उत्तर कोरियाच्या सार्वभौमत्वाला आणि आमच्या नागरिकांच्या आत्मसन्मानाला छेद देणारा आहे आणि म्हणूनच आमच्या आण्विक कार्यक्रमाबाबत सुरू असलेल्या सहापक्षीय चर्चेतून आम्ही बाहेर पडत आहोत.

स्वात खोऱ्यामध्ये शरियत कायदा लागू करण्यासंदर्भातील विधेयकावर असीफ अली झरदारी यांची स्वाक्षरी
इस्लामाबाद, १४ एप्रिल/पीटीआय
पाकिस्तानातील स्वात भागामध्ये शांतता नांदावी यासाठी तेथे शरियत कायदा लागू करण्यासंदर्भात तालिबानी अतिरेक्यांसोबत पाकिस्तान सरकारने एक करार केला होता. या कराराला काही देशांनी केलेल्या तीव्र विरोधाला पाकिस्तानने जुमानले नव्हते. पाकिस्तान पार्लमेंटने या करारासंदर्भातील निजाम-ए-एदल २००९ हे विधेयक मंजूर केल्यानंतर त्यावर सोमवारी रात्री अध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी स्वाक्षरी केली.

बालविवाह नाकारणाऱ्या चिमुरडय़ा रेखाला भेटण्यास राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील उत्सुक
नवी दिल्ली, १४ एप्रिल/पीटीआय
बालविवाह करण्यास ठाम नकार देणाऱ्या व आपला विचार कुटुंबीयांना पटवून देणाऱ्या पश्चिम बंगालमधील पूर्णिया जिल्ह्यातल्या रेखा कालिंदी या अवघ्या १२ वर्षांच्या मुलीला भेटण्याची इच्छा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केली आहे. रेखा कालिंदी ही उदरनिर्वाहासाठी विडय़ा वळते. तिचे लग्न लावायचा तिच्या घरच्यांचा विचार होता. मात्र तिने इतक्या लहान वयात लग्न करायला ठाम नकार दिला.

अमेरिकेने आमच्यावरील र्निबध खैरात म्हणून उठवू नयेत -झ्र्कॅस्ट्रो
हवाना, १४ एप्रिल/वृत्तसंस्था

क्युबावर घातलेले र्निबध अमेरिकेने खैरात केल्याच्या थाटात उठवू नयेत, अशा स्पष्ट शब्दांत क्युबाचे माजी प्रमुख फिडेल कॅस्ट्रो यांनी अमेरिकेला सुनावले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी क्युबन - अमेरिकन नागरिकांवरील प्रवास आणि चलन विनिमयावरील र्निबध उठविल्यानंतर काही तासांतच कॅस्ट्रो यांनी ही प्रतिक्रिया दिली. अमेरिकेच्या जणू परसदारात असलेला चिमुकला क्युबा गेली ५० वर्षे सातत्याने कम्युनिस्ट विचारसरणीचा अवलंब करतो आहे.

निवडणुकीनंतरचे सर्व पर्याय खुले -जयललिता
चेन्नई, १४ एप्रिल/ पीटीआय

निवडणुकांनंतर काय होणार याचं भाकित आजच करणे फार घाईचे ठरेल असे सांगून, अण्णादुमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांनी, आपण सर्व पर्याय खुले ठेवले असल्याचे सांगतानाच ‘चांगला राजकीय नेता कोणतीही शक्यता फेटाळून लावत नसतो ’ असे सांगून एक राजकीय गुगली टाकली आहे.

वृद्ध शीख रुग्णाच्या दाढीचा अमेरिकन रुग्णालयास भरुदड!
न्यूयॉर्क, १४ एप्रिल/पी.टी.आय.

अमेरिकेतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका वृद्ध शीख रुग्णाची दाढी अनवधानाने करण्यात आली. पण शीख पंथाच्या तत्वांना अनुसरून असलेली ही दाढी उतरवल्याबद्दल या रुग्णालयाला तब्बल २० हजार डॉलरची नुकसानभरपाई द्यावी लागली!
प्यारासिंग सहाँरसा हे वयोवृद्ध शीख गृहस्थ अल्झायमर या रोगाने पीडित होते.

अमेरिकेतील रेडिओ जॉकीकडून भारतीयांचा अवमान
वॉशिंग्टन, १४ एप्रिल/वृत्तसंस्था

अमेरिकेतील बेकारीबाबत बोलताना रेडिओ जॉकी रश लिम्बाग याने आऊटसोर्सिगमुळे स्लमडॉग भारतीय या नोकऱ्या पटकावितात, अशी अवमानास्पद शेरेबाजी केल्याने भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आपल्या उद्धट वक्तव्यामुळे आणि उपहासात्मक शैलीमुळे लिम्बाग हा नेहमीच वादंगाच्या भोवऱ्यात सापडत असतो. सध्या ‘स्लमडॉग मिलिऑनर’ चित्रपटाने भारताचे नाव ग्लॅमरच्या दुनियेतही गाजत असल्याने त्याचाच संदर्भ घेत या रेडिओ जॉकीने भारतीयांचीच संभावना ‘स्लमडॉग’ अशी केली. अर्थकारण आणि बेकारीबाबत श्रोत्यांशी संवाद साधताना रश लिम्बाग म्हणाला, आपल्या नोकऱ्या भारतीय पटकावित आहेत. आऊटसोर्सिगमुळे या नोकऱ्या आपल्या तरुणांना मिळणारच नाहीत. ‘स्लमडॉग’ भारतीयाने त्या पटकाविल्या असतील. या ‘स्लमडॉग’ भारतीयांची नोकरीतून हकालपट्टी होईल तेव्हाच आपल्या तरुणांना नोकरी मिळेल. तोवर आपल्या तरुणांनी नुसती वाट पहायला हवी, असे लिम्बाग महाशय उद्गारले.

मनमोहनसिंग हे ‘शेर-ए-पंजाब’; ‘प्राइड ऑफ इंडिया’ - राहुल गांधी
भटिंडा/अमेठी, १४ एप्रिल/पीटीआय

मनमोहनसिंग हे दुबळे पंतप्रधान असल्याच्या भाजपने चालविलेल्या टीकेला राहुल गांधी व प्रियांका गांधी-वढेरा यांनी आज चोख प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचे पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार मनमोहनसिंग हे ‘शेर-ए-पंजाब’ तसेच ‘प्राईड ऑफ इंडिया’ आहेत अशा शब्दांत राहुल गांधी यांचा गौरव केला तर महात्मा गांधी व मनमोहनसिंग यांच्या व्यक्तित्वातील साम्य प्रियांका गांधी-वढेरा यांनी विशद केले. मनमोहनसिंग यांच्यावर हीन टीका करणाऱ्या भाजपवर तुटून पडताना राहुल गांधी पंजाबमधील भटिंडा येथील तलवंडी साबो येथील प्रचारसभेत आज सांगितले की, मनमोहनसिंग हे दुबळे पंतप्रधान नाहीत. लोकसभा निवडणूक लढविणारे काँग्रेसचे उमेदवार व पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचे पुत्र रानिंदरसिंग यांनी प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन राहुल गांधी यांनी मतदारांना केले. दरम्यान मनमोहनसिंग हे दुबळे पंतप्रधान आहेत या भाजपने चालविलेल्या प्रचाराबद्दल अमेठी येथे आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रियांका गांधी यांनी सांगितले की, महात्मा गांधी हे कनवाळू असले तरी ते अत्यंत कणखर व्यक्तिमत्वाचे होते.

कंधमाल : भाजपच्या अशोक साहू यांना अटक
फुलबनी, १४ एप्रिल/वृत्तसंस्था
कंधमाल मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार अशोक साहू यांना आज अखेर प्रक्षोभक भाषण केल्याच्या गुन्ह्यावरून अटक करण्यात आली. मागील तीन दिवस ते ही अटक टाळण्याचा प्रयत्न करीत होते. एका मोटरसायकलवरून काढलेल्या प्रचार सभेत साहू हे कार्यकर्त्यांसमवेत सहभागी झाले असताना आज त्यांना अटक करण्यात आली. १० एप्रिलला त्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणाबद्दल त्यांच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला होता.