Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

डय़ुटीवरून दोन पोलिसांमध्ये हमरीतुमरी
श्रीगोंदे, १५ एप्रिल/वार्ताहर

डय़ुटी बटवडय़ावरून दोन पोलिसांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. तहसील कार्यालयाजवळील

 

तुरुंगासमोर आज दुपारी हा प्रकार घडला. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
पोलीस बी. एल. साळवे हे पोलिसांना डय़ुटी नेमून देतात. एस. एच. सय्यद हे पोलीस कर्मचारी आज दुपारी गार्डवर आले. नंतर या दोघांमध्ये जुंपली. गार्डवर डय़ुटी असताना सय्यद उशिरा आल्याने साळवे यांचा पारा चढला होता. पण सय्यद यांच्या म्हणण्यानुसार त्यापूर्वीची डय़ुटी कुठे बजावयाची, हेही साळवे यांनी सांगितल्यानेच उशिर झाला.
याच कारणावरून दोघांमधील वाद वाढला. वाद एवढा विकोपाला गेला की, साळवे यांनी कमरेचा पट्टा सय्यद यांच्या दिशेने उगारला. त्या वेळी सय्यद घाबरून लोखंडी जाळीच्या दुसऱ्या बाजूला गेले. मात्र, या वेळी या दोघांमध्ये शिवीगाळ झाली. तुरुंगातील कैद्यी हा प्रकार पाहत होते. त्या वेळी अधिकारी हजर नव्हते. घटनेनंतर मात्र कमालीची गुप्तता पाळण्याचा प्रयत्न झाला.