Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आठवडच्या यात्रेत पोलिसांनाच मारहाण
नगर, १५ एप्रिल/प्रतिनिधी

यात्रेत मारामारी सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच जमावाने मारहाण केली. नगर तालुक्यातील

 

आठवड येथे मंगळवारी रात्री झालेल्या या घटनेत तीन पोलीस जखमी झाले. या प्रकरणी १८जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
आठवड येथे काल म्हसोबाची यात्रा होती. यात्रेतील तमाशात विष्णू लक्ष्मण लगड गोंधळ घालू लागला. त्यास अशोक उत्तम लगड याने विरोध केला. त्यामुळे दोघांत जुंपली. विष्णूने अशोकला लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचा पाय जायबंदी केला. नंतर दोन गटांत मारामारी सुरू झाली. हा वाद मिटविण्यासाठी नगर तालुका ठाण्यातील हवालदार महंमद शेख, शिपाई बांगर व होमगार्ड गोंधळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, जमावाने त्यांनाच लाथा-बुक्क्य़ांनी मारहाण केली. त्यात ते तिघेही
जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी विष्णू लगड, रेवा मोरे, पोपट लगड, काळू विठ्ठल शिंदे, बाबासाहेब अण्णा थोरात, शिवाजी बाबासाहेब लगड, तसेच इतर १२जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा व मारहाणीबद्दल गुन्हा दाखल केला. आरोपींपैकी विष्णू लगड व बाबासाहेब थोरात यांना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणी अशोक लगड याने विष्णू लगडविरुद्ध आणखी एक फिर्याद दिली आहे.