Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मोटारीच्या धडकेने एकजण ठार
वाडेगव्हाण, १५ एप्रिल/वार्ताहर

नगर-पुणे मार्गावर पारनेर फाटा येथे मोटारीच्या धडकेने एकजण ठार झाला. हा अपघात आज

 

सकाळी १०.१५च्या सुमारास झाला.
पारनेर फाटा येथे रस्ता ओलांडत असताना विलास रामभाऊ झांबरे (वय ५०, रा. वाडेगव्हाण) यांना मोटारीची (एमएच १२ बीवाय ५२०२) धडक बसली. मोटारीचा चालक राजेश विठ्ठल राऊत (रा. चिंचवड, पुणे) जखमी झांबरे यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना वाटेतच झांबरे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चालक पळून गेला.
पारनेर फाटा येथील रहिवासी रामकिसन शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपे पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदविला आहे. सहायक फौजदार सोमवंशी पुढील तपास करीत आहेत.