Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘सुवालाल गुंदेचा यांचे कार्य नव्या पिढीसाठी आदर्शवत’
नगर, १५ एप्रिल/प्रतिनिधी

सलोखा व समाजहित तत्त्वनिष्ठेतून जोपासणारे सुवालाल गुंदेचा यांचे कार्य नव्या पिढीसाठी

 

आदर्शवत असल्याचे प्रतिपादन जैन ओसवाल पंचायत पतसंस्थेचे अध्यक्ष शांतीलाल गुगळे यांनी केले.
अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा यांचा ७५व्या वाढदिवसानिमित्त पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गुगळे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश फिरोदिया होते.
सत्कारास उत्तर देताना गुंदेचा यांनी निस्वार्थीपणे काम केल्यास यश निश्चित मिळते, असे सांगितले. नव्या पिढीने समाजकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. गुगळे, अर्बन बँकेचे प्रभारी अध्यक्ष सुरेश बाफना, प्रकाश फिरोदिया, राजेंद्र चोपडा, संजय बोरा, जवाहर कोठारी यांनी गुंदेचा यांच्या कार्याचा गौरव केला. मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष संजय बोरा, वसंतलाल छाजेड, राजेंद्र चोपडा, अशोक चूग, हिरालाल भंडारी, सुरेश मुनोत, अर्बन बँकेचे संचालक राजेंद्र गांधी, अजित बोरा, अभय पितळे, डॉ. पारस कोठारी, संजय छल्लारे आदी यावेळी उपस्थित होते. अर्बन बँकेचे संचालक शैलेश मुनोत यांनी सूत्रसंचालन केले. विजय कोठारी यांनी आभार मानले. विविध संस्था व संघटनांच्या वतीनेही गुंदेचा यांचा सत्कार करण्यात आला.