Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

स्वामी समर्थ सेवा केंद्रात उद्यापासून विविध कार्यक्रम
नगर, १५ एप्रिल/प्रतिनिधी

सावेडी रस्त्यावरील श्रीस्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र, गणेश

 

मंदिरतर्फे शुक्रवार (दि. १७)पासून श्रीस्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ एप्रिलपर्यंत हे कार्यक्रम होणार आहेत.
दररोज नित्य स्वाहाकाराने कार्यक्रमांना सुरुवात होईल. शुक्रवारी सकाळी भूपाळीनंतर श्रीगुरूचरित्र वाचनाने सप्ताहास प्रारंभ होईल. शनिवारी (दि. १८) श्रीगणेश व मनोबोध याग होईल. रविवारी (दि. १९) सकाळी चंडियाग व दुपारी बालदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी (दि.२०) श्रीस्वामी याग, मंगळवारी (दि. २१) गीताई याग, बुधवारी (दि. २२) रुद्रयाग करण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. २३) पुण्यतिथीदिनी सकाळी बलीप्रदान, अलंकार पूर्णाहुती असे धार्मिक कार्यक्रम होतील. दत्तपूजनाने सप्ताहाची सांगता होईल.
सप्ताहकाळात अखंड श्रीस्वामी चरित्रवाचन, जप-नामस्मरण होणार आहे. सेवेकरी स्वामीभक्तांनी या सर्व कार्यक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन सेवा केंद्रातर्फे करण्यात आले आहे.