Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

योग विद्याधामतर्फे योग अभ्यास शिबिरे
नगर, १५ एप्रिल/प्रतिनिधी

योग विद्याधामच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त आजपासून शहर व उपनगरात १६ ठिकाणी मोफत

 

योग अभ्यास शिबिरांना प्रारंभ झाला, अशी माहिती प्रकल्पप्रमुख कृष्णा बागडे यांनी दिली.
केडगाव, व्हीआरडीई, पाईपलाईन रस्ता, भुतकरवाडी, वाडिया पार्क, गंजबाजार, घुमरेगल्ली, सिद्धीबाग, गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी, सहकारनगर, गोकुळनगर आदी १६ ठिकाणी ३० एप्रिलपर्यंत ही शिबिरे चालणार आहेत.
संस्थेने २४ वर्षांत शहरात ३५०हून अधिक योग शिक्षक घडविले. निरोगी सुदृढ शरीरासाठी १८ ते ४० वर्षे वयोगटातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. प्रकाश आढाव यांनी केले. अधिक माहितीसाठी दत्तात्रेय एकबोटे (मोबाईल ९४२२३११४८१), मनीषा लगड (९८५००७९४५०), सिद्धार्थ वाघमारे (९९६०६९४०३९) यांच्याशी संपर्क साधावा.