Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कोपरगावात २६१ मतदान केंद्रे सज्ज
कोपरगाव, १५ एप्रिल/वार्ताहर

शिर्डी लोकसभा निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून २ लाख २१ हजार २९२

 

मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी २६१ मतदानकेंद्रे सज्ज असल्याची माहिती तहसीलदार एस. एस. सोनवणे यांनी दिली.
तालुक्याची लोकसंख्या २ लाख ७७ हजार १८९ असून, १ लाख १३ हजार २३१ पुरुष, तर १ लाख ७ हजार ७३२ स्त्रिया, तसेच ‘सव्‍‌र्हिस व्होटर’ ३९९ अशा एकूण २ लाख २१ हजार २९२जणांना मतदानाचा अधिकार आहे. तालुक्यात २६१ मतदानकेंद्रे असून, ग्रामीण भागात २१०, तर शहरी भागात ५१ केंद्रे आहेत.
तालुक्यातील ७९ गावे अधिक राहाता तालुक्यातील १० गावांचा समावेश झाल्याने गावांची संख्या ८९ आहे. लोकसभा निवडणुकीसाठी २४ विभाग व २ राखीव विभाग असे २६ विभाग केले आहेत. क्षेत्रीय अधिकारी २७, मतदान अधिकारी स्त्रिया १५, शिपाई २६१, २६ केंद्राध्यक्ष राखीव ठेवले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स मतदानयंत्रे २६१ आहेत. मतदारसंघात १७ उमेदवार असल्याने कंट्रोल युनिट २६१, बॅलेट युनिट २६१ वापरण्यात येतील. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एस. जी. गोसावी, एस. एस. सोनवणे, नायब तहसीलदार राजेंद्र नवले, नामदेव वाकचौरे यांच्या अधिपत्याखाली निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. निरीक्षक जी. बोरा यांचे निवडणूक प्रक्रियेवर लक्ष आहे.