Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कोपरगाव पीपल्स बँकेला २ कोटी ४ लाखांचा नफा - ठोळे
कोपरगाव, १५ एप्रिल/वार्ताहर

कोपरगाव पीपल्स बँकेला या आर्थिक वर्षांत २ कोटी ४ लाख रुपये नफा झाला व सर्व

 

आवश्यक तरतुदीनंतर बँकेने ६८ लाख ११ हजार १११ रुपये निव्वळ नफा मिळविला, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष कैलास ठोळे यांनी दिली.
बँकेने १०८ कोटी रुपयांच्या ठेवी मिळविण्यात यश मिळविले आहे. एनपीए फक्त २.०५ टक्क्य़ांपर्यंत खाली आणल्याची माहिती संचालक रतनचंद ठोळे यांनी दिली.
बँकेने ५९ कोटी ३५ लाख रुपये कर्जवाटप केले आहे. ठेवी व कर्ज व्यवहाराबरोबरच सर्व शाखा आधुनिक नेटवर्किंगद्वारे ऑनलाईन (कोअर बँकिंग) केल्या जाणार आहेत. तसेच एसएमएसद्वारे खातेदारांना अधिक सुविधा देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.
देशात श्यामराव विठ्ठल को-ऑप बँकेच्या सर्व शाखांमधून एटीएमद्वारे पैसे मिळण्याची व्यवस्था कार्यान्वित होणार आहे व त्यासाठी बँकेने नवीन संगणकप्रणाली घेतली आहे.
बाजारातील आर्थिक मंदीचा विचार करून कर्जाचे व्याजदर १ एप्रिलपासून कमी करून बँकेने कर्जदारांना दिलासा दिला आहे. बँकिंग क्षेत्राबरोबरच सामाजिक सेवेलाही बँकेने महत्त्व दिले. त्याचा एक भाग म्हणून बँकेच्या सर्व सभासदांचा ५० हजारांचा विमा उतरविला आहे.
बँकेकडे आज १४० कोटी १२ लाख रुपये भागभांडवल असून, पूर्वीपेक्षा त्यात चाळीस टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. बँकेचा स्वनिधी मागील वर्षी ११ कोटी २९ लाख होता. त्यात वाढ होऊन १२ कोटी ८७ लाख रुपये आहे. तसेच बँकेच्या सर्व शाखा नफ्यात असल्याची माहिती ज्येष्ठ संचालक डॉ. कोठारी यांनी दिली.
बँकेने ५ लाखांवरील कर्जासाठी रजिस्टर मॉर्गेस घेतल्याचे उपाध्यक्ष वसंतराव आव्हाड यांनी सांगितले. बँकेच्या प्रगतीत सर्व संचालकांचा व कर्मचाऱ्यांचा वाटा आहे.