Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाचा कोणत्याच पक्षाला पाठिंबा नाही
नगर, १५ एप्रिल/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देण्याचा निर्णय संभाजी बिग्रेड व मराठा सेवा

 

संघाने घेतला. मराठा सांस्कृतिक भवन येथे काल झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मराठा सेवा पतसंस्थेचे अध्यक्ष पोपट काळे होते.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच राजामाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत कोणासही पाठिंबा देण्यात येणार नाही, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रेमानंद रूपवते यांना परस्पर पाठिंबा जाहीर करणाऱ्या पदाधिकाऱ्याविरुद्ध कारवाईच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. ज्या पक्षांना पाठिंबा हवा आहे, त्यांनी शिवराज्य पार्टीकडे तो मागावा. शिवराज्य पार्टी त्याचा निर्णय घेईल, असे सांगण्यात आले. संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष संजीव भोर यांच्यावर विश्वास व्यक्त करण्यात आला.
बैठकीस मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष शरद निमसे, जिल्हाध्यक्ष संभाजी औटी, प्रकाश कराळ, बबन खिलारी, संभाजी बिग्रेडचे राजेश परकाळे आदी उपस्थित होते.