Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
व्यापार - उद्योग
(सविस्तर वृत्त)

वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये २३ एप्रिलपासून फायबर्स अॅण्ड यार्न प्रदर्शन
व्यापार प्रतिनिधी:
टेकोया इन्फोटेक या टेकोया ट्रेंड ग्रुपचा एक भाग असलेल्या कंपनीने फायबर्स आणि यार्न या विषयावर विशेष प्रदर्शन आयोजित केलेले आहे. हे चौथे फायबर्स अॅण्ड यार्न २००९ प्रदर्शन २३ ते २५ एप्रिल २००९ या कालावधीत मुंबईतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे भरविण्यात येत आहे.
या प्रदर्शनाच्या आयोजकांच्या म्हणण्यानुसार येणाऱ्या हंगामासाठी उद्योग उत्पादन विषयक कार्यक्रमांची योजना आखतानाच हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे आणि फायबर्स अॅण्ड यार्न प्रदर्शनामुळे या उद्योगांना केवळ यार्न बघायलाच मिळणार असे नाही तर प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या यार्न अॅण्ड फायबरच्या वस्त्रांचे नमुनेही पाहायला मिळतील. परिणामी यार्नचे सोर्सिग करणे या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी सोपे होईल, तसेच आपल्या गरजा ते थेट उत्पादकांकडून पूर्ण करू शकतील.
वस्त्र आणि तयार कपडे उद्योगातील सध्याच्या घसरणीवर मात करण्यासाठी भारतीय वस्त्रांची मूल्य साखळी विशेष आणि नावीन्यपूर्ण यार्नस्च्या माध्यमातून भक्कम करणे आवश्यक आहे. कारण तो वस्त्र आणि कपडे व्यवसायाचा एक प्रमुख अंतर्गत घटक आहे. फायबर अॅण्ड यार्न प्रदर्शनाच्या माध्यमातून टेकोया ही पोकळी भरून काढेल आणि फायबर, यार्न, उत्पादक, विणकाम, हातमाग, तयार कपडे उद्योगांना एक नवीन उंची गाठून देईल.
भारत आणि विदेशातील आघाडीचे विशेष यार्न आणि फायबर्स प्रदर्शनात यंदा लायका यार्न, सिल्व्हर यार्न, सोयाबीन, मिल्क-बांबू फायबर्स (चीन), नायलॉन मायक्रो फायबर्स, मोडाल आणि टेन्सिल फायबर्स, फायर रिटरडट व्हिस्कोस, उच्च दर्जाचे पॉलिएस्टर फायबर्स आणि फिलामेंट्स (फंक्शनल फॅब्रिक्ससाठी); प्युअर सिल्क, लिनेन आणि ज्यूट यार्न, महिलांसाठी फॅन्सी यार्नचे नवे कलेक्शन आणि नीटवेअर उत्पादनेही भारतीय आणि विदेशी प्रदर्शकांसाठी सादर करण्यात येतील.
विविध प्रकारच्या फायबर्स आणि यार्न उत्पादकांना एकाच व्यासपीठावर आणणे, जेणे करून विणकाम, हातमाग आणि तयार कपडे ब्रँड व्यवस्थापक यांना अत्याधुनिक आणि विशेष यार्न कलेक्शन बघण्याची संधी मिळेल आणि आपल्या उत्पादनांचे अनोख्या वस्त्र आणि तयार कपडय़ात त्याचे रुपांतर करण्याची संधी मिळेल, असे मूळ उद्देश या प्रदर्शनाच्या मागे आहेत.