Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आयुक्त वैद्य आज रुजू होणार!
औरंगाबाद, १५ एप्रिल/प्रतिनिधी

महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून जानेवारीमध्ये बदली झाल्यानंतर श्री. वसंत वैद्य अखेर चार

 

महिन्यांनी, उद्या (गुरुवारी) रुजू होणार आहेत.
कोणत्याही परिस्थितीत रुजू होणार, असे श्री. वैद्य यांनी आधी सांगितले होते. नंतर नकार दिला होता. पुन्हा होकार दिल्यानंतर ते रुजू होणार नाही, असे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले होते. आता ते रुजू होणार नाहीत, असे सर्वानाच वाटत होते. त्यांच्या जागेवर कोणाची बदली होणार याची चर्चा सुरू असताना उद्या ते पदभार स्वाकरणार आहेत. ‘मी येण्याविषयी कोणाला काय वाटले हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी उद्या रुजू होत आहे,’ असे त्यांनी ‘लोकसत्ता’स सांगितले.
पुण्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेल्या वैद्य यांची येथे बदली झाली. जागेवर अधिकारी येताच आपण औरंगाबाद पालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारू असे त्यांनी सांगितले होते. नंतर जसजसा वेळ गेला तसतसे ते येथे येणार नसल्याचे सांगण्यात आले. नंतर त्यांनीही येथे येण्यास उत्सुक नसल्याचे कळविले होते. आता उद्या रुजू होत असल्याचा निरोप त्यांनी प्रभारी आयुक्त उद्धव घुगे यांना दिला. गेल्या चार महिन्यांपासून पालिकेला आयुक्त नव्हता. श्री. घुगे यांच्याकडे अतिरिक्त पदभार होता.
अखेर गुरुवारच!
श्री. वैद्य यांच्यासाठी गुरुवार शुभ असल्याचे समजते. त्यामुळे ते गुरुवारीच येणार असे सांगण्यात येत होते. ‘या गुरुवारी साहेब रुजू होणार,’ असे अनेक आठवडे सांगण्यात येत होते. ती प्रतीक्षाही संपली होती.