Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशप्रक्रियेस सुरुवात
लातूर, १५ एप्रिल/वार्ताहर

सीबीएसई अभ्यासक्रमाच्या दोन शाळा येथे सुरु करण्यात आल्या आहेत. त्याच्या प्रवेशप्रक्रियेस

 

नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे.
श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेंतर्गत स्व. राजा नारायणलाल लाहोटी सीबीएसई इंग्लिश स्कूल सुरू होत आहे. या शाळेच्या प्रवेशप्रक्रियेचा प्रारंभ नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर इन्नानी होते. सीबीएसई शाळा समितीचे सदस्य आनंद लाहोटी व लक्ष्मीकांत कर्वा म्हणाले, शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्गात ३० विद्यार्थ्यांची क्षमता राहणार आहे. १५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण राहणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला स्वतंत्र संगणक संच पुरविण्यात येणार आहे. हे विद्यालय जून २००९ पासून सुरू होत आहे.
लाहोटी कुटुंबीयांच्या वतीने विद्यालयासाठी २१ लाख रुपयांची देणगी जाहीर केल्याबद्दल लाहोटी कुटुंबीयांचे ज्येष्ठ सदस्य श्रीनिवास लाहोटी यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाने शालेय स्तरावर सीबीएसई बोर्डाशी संलग्नित इंग्रजी माध्यमाची शाळा जून २००९ पासून सुरू करण्यात येत आहे,असे संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील व सहसचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी सांगितले.
पहिली ते सातवी वर्गासाठी प्रवेशपूर्व नोंदणी अर्ज २५ एप्रिल पर्यंत पालकांनी भरून द्यावेत व विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यासह ३ मे रोजी सकाळी १० वाजता शाहू महाविद्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य जाधव यांनी केले आहे.