Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मराठवाडय़ातील सर्व उमेदवारांना.
मराठवाडय़ात रेल्वेचा प्रश्न गंभीर आहेत. मनमाड ते नांदेड हा मार्ग दुहेरी करणार का? रेल्वेचे प्रश्न कोणते याचा ‘निकाल’ लावणार का?

 

मकरंद देशपांडे, औरंगाबाद.
सिंचन वगळता मराठवाडय़ाचा अनुशेष मोठय़ा प्रमाणावर आहे. या प्रश्नावर आपल्या सर्वाची भूमिका काय?
अर्चना बापट, औरंगाबाद.
औरंगाबाद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार उत्तमसिंह पवार यांना.
आर्थिक मंदीत बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी योजना आहेत का?
मिलिंद वैजापूरकर, औरंगाबाद.
औरंगाबाद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना.
खासदार निधीतून रस्ता तयार केला. मात्र हाच रस्ता आमदार निधीतही दाखविण्यात आला आहे. हे कसे?
अभय काळे, औरंगाबाद.
बीड मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपीनाथ मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश आडसकर यांना.
सरकारने बेरोजगारी कमी व्हावी या उद्देशाने सुशिक्षित बेरोजगार संस्था स्थापन केल्या. या संस्थांना काम देण्याचा निर्णय सरकारने घेऊनही प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे कामे मिळत नाहीत. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याला जबाबदार कोण? याविषयी आपण उपाययोजना करणार का?
मनोज कापसे, धारूर.
सरकारकडून विकासासाठी खातेनिहाय निधी पडतो. परंतु अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे निधी परत जातो. आलेला निधी पूर्णपणे खर्च करून विकास साधण्यासाठी प्रयत्न करणार का?
प्रा. श्रीनाथ मुंडे, धारूर.
उस्मानाबाद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांना.
शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित आणि वेळेवर कधीपासून सुरुवात होईल?
शशिकला कुलकर्णी,
उस्मानाबाद.
जिल्ह्य़ातील बेरोजगारीसाठी काय उपाययोजना केल्या आहेत? किती लोकांना नोकऱ्या मिळतील, किती दिवसांत मिळतील?
मंगेश नरगिडे, उस्मानाबाद.